Рет қаралды 129,634
Matar Kheema Recipe | How To Make Kheema | Mutton Kheema | Recipe By Gharcha Swaad
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Buy Meyer Pans: bit.ly/2DFyOBX
[ Use Code: GS15 ] and get 15% Discount
साहित्य - ५०० ग्रॅम मटण खीमा, ५० ग्रॅम मटार (ओला वाटाणा), २ कांदे बारीक चिरलेले, १ टोमॅटो बारीक चिरलेला, २ तेजपत्ता. १ मसाला वेलची, १ tsp जीरे, १ हिरवी वेलची, ५ लवंग, ६ काळीमिरी, १ चक्रीफूल, १" दालचीनी, १ कप हिरवी पेस्ट ( ८ लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, ४ हिरव्या मिरच्या, १½" आले.), १ tsp धणे पावडर, ½ tsp हळद, २½ घरगुती लाल मसाला, २ tblsp भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ८ tblsp तेल, कोमट किंवा गरम पाणी आणि चवीनुसार मीठ.
Homemade Red Masala Recipe - • Agri Koli Homemade Mas...
कृती - एका भांड्यात तेल गरम करून त्यात खडा गरम मसाला १ मिनिटे परतवावा. आता यात बारीक चिरलेला कांदा कांदा घालून मऊ करून घ्यावा. कांदा मऊसर झाल्यावर त्यात टोमॅटो घालावं आणि दोन्ही साहित्य गळेपर्यंत चांगलं शिजवून घ्यावं. आता यात हिरवं वाटण घालून २/३ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावं. परतून झाल्यावर यात मटणाचा खीमा घालावा, सोबत ½ ग्लास कोमट किंवा गरम पाणी आणि एकजीव करून घ्यावं. आता वर झाकण ठेवून १० मिनिटे वाफेवर शिजवून घ्यावं. १० मिनिटांनी झाकण उघडून परतून घ्यावं. त्यानंतर यात भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्यावं. आता पुन्हा आता वर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ काढून घ्यावी. ५ मिनिटांनी झाकण उघडून पेरून घ्यावं, त्यानंतर यात मटार घालावे आणि थोडे कोमट पाणी घालून एकजीव करावं आणि मंद आचेवर १० मिनिटे पुन्हा वाफ काढावी. १० मिनिटांनी झाकण उघडून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करून घ्यावी. आता गॅस बंद करून घ्यावा आणि गरमागरम मटार खीम्याचा आस्वाद कोणत्याही भाकरी सोबत घ्यावा. धन्यवाद !
#matarkheema #muttonkheemarecipe #kheemarecipe
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com