Рет қаралды 13,315
#manikraokokate #bharatraokokate #sinnarvidhansabha #hellomaharashtra
सिन्नर विधानसभा मतदारसंघात 2009, 2014 आणि 2019 अशा तीन निवडणुकांमध्ये विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे विरुद्ध ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे व त्यांचे सुपुत्र राजाभाऊ वाजे अशी ‘काँटे की टक्कर’ बघायला मिळाली. अशीच सरळ लढत आगामी निवडणुकीतही होईल, अशी चिन्हे असताना अनपेक्षितपणे राजाभाऊ वाजे यांना महाविकास आघाडीची नाशिक लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि ते विजयी झाले. त्यामुळे आता कोकाटे विरुद्ध वाजे हा थेट सामना होणार नसल्याचे चित्र दिसत आहे.. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीतून अनेक इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. त्यात किमान एक डझन इच्छुक उमेदवार हे सध्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात दिसत आहेत.. मतदारसंघात कितीही पडझड झाली तरी नव्या दमाने राजकीय आखाडा गाजविण्याची क्षमता असणाऱ्या आमदार कोकाटे यांच्यासमोर उमेदवार कोण? हे पाहणे कुतुहलाचे ठरणार आहे. त्यामुळे सिन्नरचे राजकीय चित्र लोकसभेनंतर काय असेल आणि पाचव्यांदा सिन्नरची आमदारकी माणिकराव कोकाटे जिंकतील का ? हे आपण सविस्तर पाहणार आहोत...