मराठी भाषा दिन : मराठी शाळा की इंग्रजी शाळा, मुलांनी मातृभाषा का निवडावी? | Marathi Medium schools

  Рет қаралды 65,675

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 241
@omkarshinde_2290
@omkarshinde_2290 4 жыл бұрын
मी माझा मोठा भाऊ दोघे सुद्धा मराठी माध्यमात शिकलो . भावाने मागच्या वर्षी उच्च शिक्षण घेण्या साठी जर्मनीच्या नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेतला . तो आता तिकडे त्याच्या वर्ग मध्ये नेहमीच चागलं गुण मिळवतो . १० वी नंतर थोडी अडचण आली पण एवढं काही वाटल नाही . लोक इग्रजी ला भाषा म्हणून पाहत नाही तर देव म्हणून पाहतात 😂 इग्रजी एक भाषा आहे , आणि ती भाषा मी फुकट शिकलो 😂 लाखो रुपयांचा फी भरून ते वय नाही घालवले . लोक जपानी , फ्रेंच , रशियन भाषा १ते २ वर्षात पैसे देऊन शिकतात . तसाच इग्रजी सुधा एक भाषा आहे . त्या साठी नको ते वेडपट चाळे नको . जो अभ्यास करतो त्याला कोणताही अडचण येत नाही . आज माझ्या मध्ये आणि इग्रजी पोरं मध्ये लय मोठा फरक आहे . अहो मला इग्रजी बोलता येत आणि लिहत येत . पण त्या इग्रजी च्या पोरांना जोडा शब्द लिहाता येत नाही .😂 शेवटी या जगाच्या सपर्धेत मी मराठी माध्यमाच्या कुठे मागे आहे ? आई बाबा बोलणारे पोर अनेकजण मांमी ड्याडी बोलणाऱ्या पेक्षा हुशार आणि सुसंसकृत आहेत. ( आता माझ्या मराठी चुका शेधून मला शिव्या घालू नका . 😂 मराठी कीबोर्ड ने लय उशीर लागतो लिहायला . )
@vikrantdhanavade8005
@vikrantdhanavade8005 4 жыл бұрын
सहमत.. language आणि knowledge यातला फरक लक्षात घ्यायला हवा. इंग्रजी बोलता येणं म्हणजे ज्ञानार्जन नाही. वर फेकलेला दगड खाली का येतो किंवा उन्हाळ्यात गाडीच्या चाका मध्ये हवा कमी का ठेवतात किंवा फक्त आवाजाचा वापर करून समुद्राची खोली कशी समजते , मावळताना सूर्य लाल च का दिसतो, आशासंबंधित कित्येक प्रकारचे ज्ञान तुम्ही तुम्हला हव्या त्या सोप्या भाषेत शिकू शकता. इंग्रजी बोलता आलं म्हणजे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात असे नाही. फुकटचा सल्ला - google indic इन्स्टॉल करा. मराठी टाइपिंग पण सोप्प होईल.. 😁
@shriyakochale3216
@shriyakochale3216 3 жыл бұрын
I am also agree with you coz i m also learn in marathi n successfully completed pg in economics n management from top college .i was no any problem for picking English language after 12th even or my professional life coz i am upgraded myself time to time
@Lolhahahaqwrry
@Lolhahahaqwrry 3 жыл бұрын
@@shriyakochale3216 aai ga.. I am also agree.. kay ga tujhi english
@harshaldicholkar4419
@harshaldicholkar4419 2 жыл бұрын
@@Lolhahahaqwrry तुम्हाला भावना समजल्या तेवढं खूप झालं. बाकी UK मधील ख्रिश्चन पण चुकीचे व्याकरण वापरतात
@niharikaseducationalvideo7343
@niharikaseducationalvideo7343 2 жыл бұрын
सर पुण्यात मराठी माध्यमाची कोणती शाळा चांगली आहे Reply kara plz
@siddhiharayan
@siddhiharayan Жыл бұрын
मराठी शाळा फार महत्त्वाची आहे , मातृभाषेतून मुलांवर चांगले संस्कार घडविता येतात.
@AamhiPharmacist
@AamhiPharmacist 4 жыл бұрын
जर इंग्रजी चांगलं येण्याची आवश्यकता आहे तर तो एक इंग्रजी विषय तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने शिकता येईल त्यासाठी पूर्ण माध्यम इंग्रजी करण्याची आवश्यकता नाही आज जगातील कित्येक देश आहेत जे इंग्रजी ऐवजी स्वतःच्या मातृभाषेला महत्व देतात रशिया,चीन,जपान, जर्मनी, रशिया... आणि स्वतःच्या मातृभाषेत संकल्पना खूप अधिक चांगल्या पद्धतीने समजतात,आकलन क्षमता अधिक असते. आज कित्येक मोठे अधिकारी,शास्त्रज्ञ,डॉ यांचं शिक्षण मराठीतच झालेलं आहे
@aniketmalap5596
@aniketmalap5596 4 жыл бұрын
अस असत तर आज सगळ्यांना इंग्रजी आली पाहिजे होती कारण हा विषय तर असतो सगळ्या मराठी शाळेत पण जेव्हा पूर्ण माध्यम इंग्रजीत केल जात तेव्हा ते नवीन नवीन शब्द मुलांच्या कानावर पडत असतात. आणि लहान पणी मूलं नव्या गोष्टी लवकर स्वीकारतात जे पुढे जमत नाही. म्हणून मुलांना आवर्जून इंग्रजी शाळेत टाकावं. उगा कोणी नेता मराठी बद्दल बोलतोय पण त्यांची मुलं जातात का हो मराठी शाळेत. तुमच्या मुलांचं भविष्य तुमच्या हातात आहे. -हे माझे वयक्तिक विचार आहेत कदाचित कोणाला आवडलं नसेल.
@xyz_4
@xyz_4 4 жыл бұрын
राज्यभाषा / मातृभाषा (मराठी) व इंग्रजी एवढ्याच पुरेश्या आहेत. आणि हो, रशिया, चीन, जपान...हे सर्व देश त्यांच्या एकाच भाषेला महत्व देतात, पण त्यांना सुद्धा शाळांमध्ये इंग्रजी शिकवतात. इतर जगाशी व्यवहार करताना त्यांना इंग्रजी वापरावी लागते.
@vimalfoodworldm1122
@vimalfoodworldm1122 4 жыл бұрын
जपानी लोकानी जपानी भाषेमध्ये शिकून जगाला technology दिली , बऱ्याच जपानी लोकांना इंग्लिश येत ही नाहीआणि भारती लोक इंग्लिश भाषेंत शिकून, विदेशी कॉर्पोरेट कंपन्यांना कारकून दिले त्यामुळे जर आपण आपल्या भाषेत ज्ञान घेतलो तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू जे आपण आहोत
@roshangavit6869
@roshangavit6869 4 жыл бұрын
そうですね。!
@rohithabbu
@rohithabbu 4 жыл бұрын
अगदी बरोबर..
@rohithabbu
@rohithabbu 4 жыл бұрын
इंग्रजी इंग्रजी... करूनच आपण आपल्याच मराठी भाषेची वाट लावत चलो आहे..
@aniketmalap5596
@aniketmalap5596 4 жыл бұрын
आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा तरी कुठे मराठीत बोलतो. इंग्रजी शाळा काळाची गरज आहे. आणि सरकारने इंग्रजी शाळा जास्तीत जास्त काढल्या पाहिजेत.
@KunalVijay799
@KunalVijay799 4 жыл бұрын
भाऊ पण आपला देशाची व्यवस्था जपान इतकी चांगली आहे का।मराठी भाषय मध्ये किती आधुनिक ज्ञान असणारी पुस्तके उपलब्ध आहेत।आपण विज्ञान 100 टक्के मराठीत शिकू शकतो का।
@bhaveshjojo
@bhaveshjojo 4 жыл бұрын
पहिली ते चौथी संस्कृत आणि मातृभाषा (मराठी/ मल्याळम ई.) याच शिकवायला पाहिजे. संस्कृत भाषा शिकल्याने उच्चारण सुधारते, आत्मविश्वास वाढतो आणि जिभेला वळण लागते. इतकेच नाही तर संस्कृत भाषे मुळे मेंदूचा विकास होतो. संस्कृत च्या जोडीला मातृभाषा असल्यास मुलांना योग्य मार्गदर्शन मिळते. इंग्रजी भाषा ५वी पासून शिकवणे सुरू करायला हवी. लहान मुलांची मराठी भाषेशी नाळ तुटत चालली आहे हे पाहून वाईट वाटतं.
@udayrajpatil9437
@udayrajpatil9437 4 жыл бұрын
मल्याळम किती लोक बोलतील महाराष्ट्रात🤔
@sohailshaikh1334
@sohailshaikh1334 4 жыл бұрын
संस्कृत तर शिकायलाच पाहिजे कारण त्यामुळे मनुसमॄतित काय लिहून ठेवलय हे एससी एसटी आणि ओबीसी बहुजन समाजाच्या मुलांना कळेल..
@bhaveshjojo
@bhaveshjojo 4 жыл бұрын
@@sohailshaikh1334 मनु स्मृती चा मराठी अनुवाद सुद्धा उपलब्ध आहे. पण तुम्ही लांडे अभ्यास अध्ययन कधी तरी करता का? तुम्हाला त फक्त फुकट च पायजे...😂😂😂
@sohailshaikh1334
@sohailshaikh1334 4 жыл бұрын
@@bhaveshjojoअरे जोश्या.. गांडीतून हग तोंडातून नाही.. मि मनुसमॄति च्या विरुद्ध एक ही शब्द बोललो नाही.. पण तुझी insecurity च दाखवते की डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुसमॄति ला जाळून योग्यच केल.. 😁
@sohailshaikh1334
@sohailshaikh1334 4 жыл бұрын
@AJIT JADHAV मनुसमॄति प्रोग्रेसिव्ह असती तर डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जाळलीच नसती.. मनुसमॄति नेच माणसांना माणूस समजू नये अशी शिकवण दिलिये.. कुरान ने नाही..
@amitbhore3886
@amitbhore3886 4 жыл бұрын
इंग्रजी ही एक केवळ भाषा समजावी ज्ञान नाही. आपण जश्या इतर भाषा शिकतो तसच इंग्रजी ही समजावी. आणि वैक्तीत रित्या मला अस वाटत जर मातृभाषेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले तर मूल ते सगळ ज्ञान लवकर आत्मसात करतात. गरज आहे चांगल्या आणि दर्जेदार मातृभाषेतील शिक्षणची.
@aniketmalap5596
@aniketmalap5596 4 жыл бұрын
माफ करा पण मला नाही पटलं! आजकाल खूप सार ज्ञान हे इंग्रजी भाषेत आहे. आणि प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून दिल तर त्यां लहान मुलांचंच नुकसान आहे. त्यांना सहज इंग्रजी स्वीकारता येणार नाही.
@nishantbhandarkar17
@nishantbhandarkar17 4 жыл бұрын
@@aniketmalap5596 मातृभाषेतून शिक्षण दिल्याने‌ मुलांचे नुकसान होते हा गैरसमज आहे.
@aniketmalap5596
@aniketmalap5596 4 жыл бұрын
@@nishantbhandarkar17 पण त्यांना पुढे जाऊन इंग्रजी स्वीकारण्यात अडचण होते.
@nishantbhandarkar17
@nishantbhandarkar17 4 жыл бұрын
@@aniketmalap5596 😂😂😂😂😂
@aniketmalap5596
@aniketmalap5596 4 жыл бұрын
@@nishantbhandarkar17 मुलांना लहान पणापासूनच इंग्रजीची सवय लावावी. स्पर्धेच्या युगात खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आजकाल खूप सारी पालकं हे आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत घालतात. 😊 परंतु जे गरीब मराठी मुलं आहेत त्यांचं वाईट वाटतं एवढंच.😔 फक्त सरकार ने मराठी शाळा सोडून इंग्रजी शाळा सुरू करावी.
@sohailshaikh1334
@sohailshaikh1334 4 жыл бұрын
मराठी मध्ये सेमी ईंग्रजी हा चांगला पर्याय आहे.. फक्त ईंग्रजी शाळेतल्या मुलांना मोठे झाल्यावर सुद्धा कळत नाही की आपली प्रादेशिक ओळख काय आहे किंवा आपण कोण आहोत आणि दुसरीकडे फक्त मराठी शाळेतल्या मुलांना जग कुठे चाललय, सध्या शिक्षणाचे, व्यवसायाचे वारे कुठल्या दिशेने वाटताहेत हे कळायला अडचणी येतात
@bharatesir
@bharatesir 4 жыл бұрын
इंग्रजी शाळा म्हणजॆ....पालकांना लुटणारी शाळा...
@priyankachoudhary7865
@priyankachoudhary7865 2 жыл бұрын
एकदम बरोबर
@sanveeanvivideos6076
@sanveeanvivideos6076 2 жыл бұрын
Khar ch he brobr ahe
@anandpanchange2125
@anandpanchange2125 Жыл бұрын
Marathi shala Manje Career la 🔥 lavnari shala
@aniketkheratkar8069
@aniketkheratkar8069 Жыл бұрын
इंगीलिष मिडीयम वाल्याला महाराजांचा इतिहास विचार काही येत नाही त्यांना... थोडक्यात ते त्यांच्या पुस्तकात नाही
@rightwing4015
@rightwing4015 4 жыл бұрын
मराठी हि आई आहे, आणि आई बरोबर असेल तर जगही जिंकता येतं....
@sadhukalindar983
@sadhukalindar983 3 жыл бұрын
वा रे पठ्या
@therock-th1cc
@therock-th1cc 2 жыл бұрын
😅👎
@manishmohite5515
@manishmohite5515 4 жыл бұрын
विषय हा भाषेच्या मोठेपणाचा नाही तर उदात्तिकरणाचा आहे. इंग्रजी च उदात्तीकरण हे जागतिकीकरणामुळे झालय हे मूळतः लक्षात घ्यायला हवे. जेव्हा आपण आपली अर्थव्यवस्था व्यापारासाठी खुली केली तेव्हा इंग्रजी चा अधिक प्रभाव पडला नंतर अनेक देशी विदेशी कंपन्या या आंतरराष्ट्रीय व्यापारात मग्न झाल्या यातूनच इंग्रजी ही अनेक कम्पन्यामध्ये व्यावहारिक भाषा म्हणून उदयास आली . आज बहुतेक स्पर्धापरिकक्षांमध्ये सुद्धा इंग्रजी हा विषय सक्तीचा आहे म्हणजे सरकार सुद्धा याला अपवाद नाही. नोकरीच्या वेळी द्यायच्या मुलाखती या आज बहुतांश रित्या इंग्रजी मधून होतात. थोडक्यात या उदात्तिकरणाला आपणच वाट मोकळी केली. इंग्रजी भाषा नक्कीच वंदनीय आहे कारण बरेचसे साहित्य आज इंग्रजी मध्ये उपबद्ध आहे पण येणाऱ्या काळात तरी आपण नीट पावले उचलली तरच मराठी भाषेला तीच वैभव टिकवता येईल. मी सुद्धा मराठी माध्यम शाळेत शिकलोय आणि आज मला इंग्रजी बोलण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही. आणि कोणालाही त्याच्या मातृभाषेपेक्षा इतर भाषेची गोडी जास्त वाटत असेल तर ती लाजिरवाणी बाबच आहे.
@professor.....1386
@professor.....1386 3 жыл бұрын
खर ज्ञान हे मातृभाषेतुनच ग्रहण केल जाऊ शकत.... इंग्रजी ही आवश्यक च आहे पण तिच्याकडे एक भाषा म्हणून बघावी
@bhagwatgambhire6388
@bhagwatgambhire6388 4 жыл бұрын
मी स्वतःला भाग्यवान समजतो कि माझं पदवी पर्यंत शिक्षण मराठी माध्यमात झालं , आणि मी इंग्लिश बोलू शकतो,लिहू शकतो
@tejasgopale1009
@tejasgopale1009 4 жыл бұрын
Bbc team,"nice interview." I'll suggest you to get interview of those kids of them and you'll come to know the difference between their behavior and i.q. I bet 💯 on the kid one in studying in Marathi medium will score better.
@ajde69
@ajde69 4 жыл бұрын
इंग्रज़ी आणि मराठी दोन्ही येणे गरजेचे आहे. मराठी माध्यमाच्या शाळेतील मुलांना सुद्धा चांगले इंग्रज़ी येणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्यात या दोन भाषा आवश्यक आहेत. हिंदी शिकवण्याची काही आवश्यकता नाही. ती राष्ट्रभाषा नाही.
@ashokpatil4930
@ashokpatil4930 4 жыл бұрын
चेन्नई ,कर्नाटक, केरळ वगैरे बऱ्याच राज्यामध्ये प्रथम मातृभाषेला स्थान आहे आणि नंतर ईतर भाषेला . महाराष्ट्रात मराठी भाषेला प्रथम प्राध्यान्य दिले म्हणून तुम्हाला काय अडचण झाली ? बाकी भाषा शिकण्यास कोणाला अडविलेले नाही .
@aniketmalap5596
@aniketmalap5596 4 жыл бұрын
त्यांनी पहिलेच ओळखले होते की हिंदी मूळे त्यांच्या भाषेला दुय्यम दर्जा मिळेल म्हणून त्यांनी पहिलेच हिंदीचा विरोध सुरू केला आपल्या कडे तसं झालं नाही त्याचे परिणाम आता बघा.
@sharpshootersushil2245
@sharpshootersushil2245 4 жыл бұрын
Good Job Great news today
@pratikkarluke6547
@pratikkarluke6547 4 жыл бұрын
मुलगा जन्माला आला की सर्वप्रथम "आईच" म्हणतो "मॉम" म्हणत नाही यावरून असे विचार खंडित येते की _ इंग्रजी कितीही आघाडीवर असे ती आपल्या मातृभाषा मायबोलीची जागा घेऊ शकत नाही. 🙏 मी मराठी माध्यम 🙏
@hanamantraut7129
@hanamantraut7129 4 жыл бұрын
In english medium marathi should be a compulsary subject so he can write read and communicate through marathi
@AamhiPharmacist
@AamhiPharmacist 4 жыл бұрын
जर इंग्रजी चांगलं येण्याची आवश्यकता आहे तर तो एक इंग्रजी विषय तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने शिकता येईल त्यासाठी पूर्ण माध्यम इंग्रजी करण्याची आवश्यकता नाही आज जगातील कित्येक देश आहेत जे इंग्रजी ऐवजी स्वतःच्या मातृभाषेला महत्व देतात रशिया,चीन,जपान, जर्मनी, रशिया... आणि स्वतःच्या मातृभाषेत संकल्पना खूप अधिक चांगल्या पद्धतीने समजतात,आकलन क्षमता अधिक असते. आज कित्येक मोठे अधिकारी,शास्त्रज्ञ,डॉ यांचं शिक्षण मराठीतच झालेलं आहे
@xyz_4
@xyz_4 4 жыл бұрын
State Board English medium schools have Marathi as a compulsory subject, but the Central Government Boards like CBSE/ ICSE only have Bollywood language & English as compulsory languages and keep state languages as optional, which is fundamentally wrong, which would lead to promotion of only Bollywood language to the future generations. Article 343 needs to be ammended & all the rest of our 21 official languages need to be added to Central Government languages. Only then, everyone will have equal opportunity to flourish & preserve their cultures.
@aniketmalap5596
@aniketmalap5596 4 жыл бұрын
सरकारने इंग्रजी शाळा काढल्या पाहिजेत तरच गरीब मुलांचा फायदा होईल.
@asmitapatil9393
@asmitapatil9393 4 жыл бұрын
हिंदी शिकण्यासाठी आपल्याला हिंदी शाळेत जावं लागलं नाही ..आपण ती हिंदी चित्रपट गाणी ऐकून/ बघूनच शिकली... तसच इंग्रजी शिकण्यासाठी काही इंग्रजी शाळेत जायची गरज नाही. हिंदी ऐवजी इंग्रजी ला एंटरटेनमेंट भाषा...किंवा द्वितीय भाषा म्हणून वापरली तर ....तीही सहज शिकू शकतो...त्यासाठी इंग्रजी शाळेत जाण्याची गरज नाही. लहानपणी मातृभाषेतून विज्ञान , गणित शिकल्यामुळे त्या गोष्टी सहज डोक्यात बसतात...आणि पाया पक्का होतो. त्यामुळे प्रथम भाषा : मराठी आणि द्वितीय : इंग्रजी असावी.
@aniketmalap5596
@aniketmalap5596 4 жыл бұрын
@@asmitapatil9393 फक्त चित्रपट पाहून शिकता येत नाही आपल्या भोवतालचा environment तसं असावं लागतं. आणि त्यासाठी चांगल्या इंग्रजी शाळांचा उपयोग होईल.
@aniketmalap5596
@aniketmalap5596 4 жыл бұрын
@@asmitapatil9393 Sorry तुमचं नाय पटतं. लोकांना misguide करू नका. जर तुम्हाला वाटतं की मराठी शाळेत शिकून स्पर्धेच्या जगात टिकता येत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या family तील मुलांना टाका परंतु नेत्यानं प्रमाणे करू नका . मराठी मराठी करायच आणि स्वतःच्या मुलांना इंग्रजीत टाकायचं.😊
@asmitapatil9393
@asmitapatil9393 4 жыл бұрын
@@aniketmalap5596 आमच्या घरात कोणीही इंग्रजी शाळेत शिकत नाही....आणि यापुढे सुद्धा शिकणार नाही. ☺️
@aniketmalap5596
@aniketmalap5596 4 жыл бұрын
@@asmitapatil9393 माझ्याशी वाद घालवून उगाच नका त्या मुलांचं भविष्य खराब करुत. 😆इंग्रजी ही काळाची गरज आहे. काळा प्रमाणे बदलावे माणसाने😄
@shivrajgujar1
@shivrajgujar1 2 жыл бұрын
People love Marathi and will send their children to Marathi medium schools if they teach English as a priority subject. Marathi ani English donhi bhasha compulsory kara Maharashtrat.
@vivek5841
@vivek5841 4 жыл бұрын
इंग्लिश मध्ये शिकल्यास concept क्लिअर होतं नाही. थोडक्यात एवढ्या लहान वयात english पाठांतर करू शकतो पण आकलन होतं नाही... त्या मुळे english medium पेक्षा दर्जेदार मराठी मेडीयम कितीतरी पटीने चांगली.
@xyz_4
@xyz_4 4 жыл бұрын
Article 343 needs to be ammended & all the rest of our 21 official languages need to be added to Central Government languages. Only then, everyone will have equal opportunity to flourish & preserve their cultures. Mothertounge & English is enough.
@निखिल.पृ.सुर्वे
@निखिल.पृ.सुर्वे 4 жыл бұрын
अपेक्षा एवढीच की फी वाडीवर रडत बसू नये कारण जमिनीवर शाळा आहे पण त्या जमिनींचे भाव आकाशाला भिडले आहेत. व आपल्या कडे शाळा विकायची मुभा आहे . पण आराखड्यात बदल करून दूसर काही. करायची मुभा नाही आहे.
@rizwanatar9380
@rizwanatar9380 4 жыл бұрын
माझ्या मते महाराष्ट्रातील मुलांनी मराठी माध्यमातूनच शिक्षण घेतले पाहिजे...
@vikrantdhanavade8005
@vikrantdhanavade8005 4 жыл бұрын
सहमत.. language आणि knowledge यातला फरक लक्षात घ्यायला हवा. इंग्रजी बोलता येणं म्हणजे ज्ञानार्जन नाही. ती फक्त भाषा आहे, ज्ञान नाही. वर फेकलेला दगड खाली का येतो किंवा उन्हाळ्यात गाडीच्या चाका मध्ये हवा कमी का ठेवतात किंवा फक्त आवाजाचा वापर करून समुद्राची खोली कशी समजते , मावळताना सूर्य लाल च का दिसतो, आशासंबंधित कित्येक प्रकारचे ज्ञान तुम्ही तुम्हला हव्या त्या सोप्या भाषेत शिकू शकता. इंग्रजी बोलता आलं म्हणजे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात असे नाही.
@tusharsontakke4975
@tusharsontakke4975 4 жыл бұрын
किती छान वाटतं कोरोना च्या अगोदरच्या बातम्या ऐकून
@justice_to_palghar_sadhus2553
@justice_to_palghar_sadhus2553 4 жыл бұрын
मराठी 👍
@kundanwadile124
@kundanwadile124 4 жыл бұрын
Marathi is best.
@varhaditales
@varhaditales 4 жыл бұрын
प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच झालं पाहिजे
@Parag-by5jm
@Parag-by5jm 28 күн бұрын
माझ्या english medium शाळेत " वधनि कवळ घेता ", "पसायदान ","मनाचे श्लोक " या सर्व प्रार्थना होत.. मला माझ्या मातीशी जोडून ठेवण्याचा काम माझ्या English medium शाळेने केलं याच मला अभिमान आहे...
@akshaystark1936
@akshaystark1936 5 ай бұрын
मराठीच नाही पण कुठलीही प्रादेशिक भाषा ही फक्त भाषा नाही तर व्यक्तीची ओळख आहे. उगाच दुसरी कुठली भाषा शिकवणे म्हणजे भविष्यातील कारकून बनवण्याचा कारखाना आहे
@ankushkengar3667
@ankushkengar3667 4 жыл бұрын
जगातील सर्व भाषेचे ज्ञान मुलांना आसले पाहिजे.
@shitalkulkarni9400
@shitalkulkarni9400 Жыл бұрын
माझी नणंद मराठी मिडीयम मध्ये शिकली आणि आज ती अमेरिकेत जॉब करते ते पण गव्हर्नमेंट आणि तिच्या बरोबरीचे cbse मध्ये शिकलेले इथे भारतातच आहे बेरोजगार त्या वेळेस तर इंग्लिश 5 वी पासून असायचे.
@ShrikantPanmand-bc1sq
@ShrikantPanmand-bc1sq 2 ай бұрын
Tila sang ata tikdech raha mhanun😆
@AcentHinduism
@AcentHinduism 4 жыл бұрын
Ek manalaa chan watat aahe aani ek dokyala aykawach trr konach .....
@jackpot2013
@jackpot2013 4 жыл бұрын
हा video इंग्रजी भाषेला waaw देण्या करिता banawlela दिसतो.
@shivrajshinde1738
@shivrajshinde1738 4 жыл бұрын
या विडिओ मधून काय समजायचं आम्ही? Confusion अजून वाढलाय..
@sarveshdhavale9487
@sarveshdhavale9487 4 жыл бұрын
Hahaha I pity on the people who thinks just by going to English medium school their child will learn fluent English When you learn something in your mother tongue it's become easier to understand and after understanding if you know even little bit of English you can do great in your life Don't give priority to English over knowledge
@abhijeet__patil_641
@abhijeet__patil_641 3 жыл бұрын
Italian , japanese, Germans laughing at corner 😥
@sk.p2588
@sk.p2588 4 жыл бұрын
I think both languages important
@yogeshpalkar1919
@yogeshpalkar1919 Жыл бұрын
Kindly like to share my experience i have studied in English Medium. But in my life my handwriting and spelling there lots mistakes. Only i can speak English well because I have worked on my self development in my college. But I know English is world language but nowadays American and British English is different. In daily life we are using English which is not properly speaking. So mother tongue language more important for us . 🙏
@FfgggGggff-mn3ng
@FfgggGggff-mn3ng 7 ай бұрын
इंग्रजी ही फक्त भाषा आहे ..ते ज्ञान नाही...मराठी मध्ये शिकून पण इंग्रजी चांगली करता येते....उगाच भेदभाव करू नका तुम्हाला कुणी अधिकार दिला हा भेदभाव करायचं....कृपया हे थांबवा...शिक्षण हे शिक्षण असत...
@yogi2673
@yogi2673 4 жыл бұрын
प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच हवं एव्हाना मी तर म्हणतो की उच्च शिक्षण हे सुद्धा बोली भाषेत हवं एकंदरीत पाहायचं झालं तुम्ही एक तर बोली भाषा बदल करून टाका सगळीकडे इंग्लिश राबवा नाही तर सरळ सरळ सगळं शिक्षण हे बोली भाषेत द्या . साधं बघा ना CAT ला कॅट च म्हणाना उगाच CAT म्हणजे मांजर म्हणून आपण त्यांना लहानपणी च द्विधा मनस्तीती टाकतो. बोलण्या सारखं खूप आहे पण BBC ने त्याची दखल घेतली पाहिजे😅
@Shrikant_Darade
@Shrikant_Darade 4 жыл бұрын
सहमत सर्व सरकारी शाळा एकतर इंग्रजी करून टाका नाहीतर व्यवसायिक शिक्षण आणि उच्च शिक्षण मराठीत करून टाका.
@aniketmalap5596
@aniketmalap5596 4 жыл бұрын
मला तरी वाटतं सर्व सरकारी मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा सुरू करायला पाहिजेत. कारण गरीब मुलांना त्याचा फायदा होईल.
@yogi2673
@yogi2673 4 жыл бұрын
@@aniketmalap5596 थोडा वेगळा विचार करा आणि सगळीकडे मराठी च राहू द्या
@aniketmalap5596
@aniketmalap5596 4 жыл бұрын
@@yogi2673 फक्त गरिबांनीच का वेगळा विचार केला पाहिजे. एकतर ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना अडणीच ठरवलं जात आणि ज्यांना येत ते महा ज्ञानी! मी सुद्धा सरकारी शाळेतून शिकलोय तरी तेव्हा एवढ्या इंग्रजी शाळांची क्रेज नव्हती. परंतु तरीही माझ्या सारख्या अनेक मुलांना अडाणीच समजलं जातं. मला फक्त एवढंच वाटतं की तेव्हा माझ्या घरची परिस्थिती तशी नव्हती पण जर सरकारने इंग्रजी शाळा सुरू केल्या तर त्याचा अनेक मुलांना फायदा होईल. नायतर एक केलं पाहिले उद्या पासून इंग्रजी आणि हिंदी बॅन केली पाहिजे महाराष्ट्रात.
@rajatgoswami7032
@rajatgoswami7032 2 ай бұрын
इंग्लिश मुळे लहान वयात विषय आकलन होत नाही बरोबर.... भाषा येणे म्हणजे ज्ञान प्राप्ती ही गल्लत झाली आहे
@xyz_4
@xyz_4 4 жыл бұрын
State Board English medium schools have Marathi as a compulsory subject, but the Central Government Boards like CBSE/ ICSE only have Bollywood language & English as compulsory languages and keep state languages as optional, which is fundamentally wrong, which would lead to promotion of only Bollywood language to the future generations. Article 343 needs to be ammended & all the rest of our 21 official languages need to be added to Central Government languages. Only then, everyone will have equal opportunity to flourish & preserve their cultures. Only mothertounge & English is enough.
@hemantpandit363
@hemantpandit363 Жыл бұрын
@homosphonesbriefhistoryofh7019
@homosphonesbriefhistoryofh7019 4 жыл бұрын
एखाद्या हिब्रू ला नाही आली इग्रजी तर चालेल पंरतु एखाद्या भारतीयला नाही आलि तर तो अशिक्षित....
@शिवप्रभू
@शिवप्रभू 10 ай бұрын
मुद्दा भाषेचा नाही, मुद्दा स्वाभिमानाचा आहे, राष्ट्रसन्मानाचा आहे🇮🇳. लोकांना इंग्रजी म्हणजे सर्वस्व वाटू लागलय पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा इंग्रजी फक्त जॉब साठीच शिकली जाते कारण इंग्रजी भाषेत दुसरे काहीच नाही. भाषा जेव्हा एते तेव्हा त्या भाषेचे संस्कार, संस्कृती, आणि विचार एतात, आणि इंग्रजांची संस्कार म्हणजे सत्यानाश😅 अध्यात्म, ज्ञान, प्राप्त करायचे असेल तर मातृभाषा किव्वा स्थानिक भाशाच सर्वोत्तम. Convent,english मध्ये शीकुन तुम्ही फक्त basterd होऊ शकता 😮😅😂😂. आचार्य प्रशांत यांचे matrubhase बद्दल ऐका🙏
@aniket631
@aniket631 4 жыл бұрын
इंग्रजांना हाकलून लावणारे स्वातंत्र्यवीर मातृभाषेत शिकले होते..... काही मुले इंग्रजी शाळेत असण्याचे कारण, दुसर्‍यांचा आहेना.. मग आपला पण तिकडेच पाहिजे. हि मनोवृत्ती
@gajanankharsikar9748
@gajanankharsikar9748 4 жыл бұрын
How china done magic develop uheir countrieywithout english
@diprovert1334
@diprovert1334 2 жыл бұрын
Fluent English nasel yet tar khup veglya najrene baghtat lok... Khas karun City madhe job karat asal tar...
@sanjayyedme934
@sanjayyedme934 Жыл бұрын
पण अजूनही पालकांना कळलेलं नाही.॰ग्रामिण भागात मराठी शाळा बंद होतं आहेत.सगळ्यांना इंग्रजी माध्यम पाहिजे.
@Tatyabakale2505
@Tatyabakale2505 4 жыл бұрын
अंग्रेजी भाषा A for Apple से शुरू होती है और Z For Zebra बनाती है । मगर हमारी मातृभाषा अ for अनपढ से शुरू होती है ज्ञfor ज्ञानी बनाती है। मुझे नहीं लगता और कुछ ज्यादा बताने की जरूरत है ।😇
@aniketmalap5596
@aniketmalap5596 4 жыл бұрын
ये सुनने के लिए अच्छा है । लेकिन ज्ञान पाने के लिए A for Apple और Z for zebra की जरूरत होती है।
@Tatyabakale2505
@Tatyabakale2505 4 жыл бұрын
@@aniketmalap5596 भई जापनी और चीनी आपनी मातृभाषा का इस्तेमाल कर के ही महान होगये उनको ना पडी अंग्रेजी की जरूरत .......आपकी सोच में ही अंग्रेजी की लाचारी है।
@Tatyabakale2505
@Tatyabakale2505 4 жыл бұрын
@Suhas Mali तु प्रांतवादि आहेस मी देश हितवादी .....मग ज्या भाषेत देशाला समजेल त्या भाषेत मी बोलणार
@aniketmalap5596
@aniketmalap5596 4 жыл бұрын
@@Tatyabakale2505 फक्त जपान आणि चीन कश्याला असे खूप सारे प्रगत देश आहेत जे त्यांची मातृभाषे सोबत मोठे झालेत.कारण काय ? तर ती तिथे सक्तीची आहे.आपल्याकडे आहे का? तिथे सगळी कामे त्यांच्याच भाषेत केली जातात. आपल्याकडे साधं बोलणं सुद्धा होत नाही. मग उगाच कश्याला दुसऱ्याचं सांगायचं.
@asmitapatil9393
@asmitapatil9393 4 жыл бұрын
@@Tatyabakale2505 प्रत्येक राज्याची रचना भाषावार का झालेली आहे? आम्ही महाराष्ट्रात राहतो आणि मराठी ... हीच आमची मातृभाषा आहे. हिंदी काही राष्ट्रभाषा नाही..किंवा जास्त लोकांना कळते असाही नाही...हेच वाक्य दक्षिणेकडे जाऊन बोल... हिंदी साधी कोणाची मातृभाषा सुधा नाही. ती राष्ट्रभाषा कुठून होईल. StopHindiImposition
@siddheshwarjadhav3279
@siddheshwarjadhav3279 Жыл бұрын
मातृभाषेला प्राधान्य द्यावे मात्र कॉम्प्युटर साठी इंग्रजी आवश्यक
@कवितेतलपलेलीगोष्ट
@कवितेतलपलेलीगोष्ट 4 жыл бұрын
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी | माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका || भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे | गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतिचे शिर कापु नका || - कवीवर्य कुसुमाग्रज
@theinsanechief5007
@theinsanechief5007 4 жыл бұрын
मला तर हे ऐकुन आश्चर्य वाटत की भारत हा अमेरिका नंतर इंग्रजी बोलणारा दुसरा देश आहे. ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे. आपल्याला इंग्रजी फक्त दक्षिण भारतातल्या लोकांमुळे शिकावी लागते.
@asmitapatil9393
@asmitapatil9393 4 жыл бұрын
आणि हिंदी का लादली गेली आपल्यावर..ती नाही का उत्तर भारतीयांमुळे शिकावी लागत...इंग्रजीमध्ये शिकल्यामुळे आज दक्षिणेकडच्या राज्याचे लोक सीईओ म्हणून गूगल , मायक्रोसॉफ्ट अश्या मोठ्या कंपनीमध्ये आहेत...ती उत्तर भारतीयाची हिंदी का शिकावी आपण...त्यांचीच राज्य स्वतःची मागास आहे...हिंदी शिकण्याचा फक्त एकाच ठिकाणी फायदा होतो...."पाणीपुरी दे दो भैय्या" म्हणायला....प्रथम स्थान मातृभाषे ला आणि द्वितीय भाषा इंग्रजी शिकावी.
@स्वराज्य-छ1थ
@स्वराज्य-छ1थ 3 жыл бұрын
@@asmitapatil9393 अगदी बरोबर👌🏽👍
@gangaramjadhav1725
@gangaramjadhav1725 4 жыл бұрын
मराठी छान
@desaipoultry
@desaipoultry 4 жыл бұрын
जागतिक भाषा गरजेची परंतू लोकास सांगे ब्रम्हद्यान_-- परंतू संबधित बीबीसी चे दिगद्रशकांची मूल कोणत्या मध्यमांत जातात ते सांगाव?
@releasedrawing5724
@releasedrawing5724 4 жыл бұрын
Marathi is must .only English hi business language ahe aple marathi ai vadil nalayk ahet I know English kalachi garaj ahe pan attache ai vadil he aplya mulanshi English hindi madhe boltat . He as ka . Tar mulana Marathi kadhi yenar . English kadhihi shiku shakto pan Marathi nahi
@gameshorts3007
@gameshorts3007 4 жыл бұрын
Lal dress wali bai barobar bolat ahe.....
@pravinmanwar2794
@pravinmanwar2794 4 жыл бұрын
Both marathi and english
@KunalVijay799
@KunalVijay799 4 жыл бұрын
सन्मान कोणाला भेटतो मराठी बोलणार्याला का इंग्रजी बोलणार्याला,,,,,,?
@savitrishirsat2385
@savitrishirsat2385 5 ай бұрын
, पहिली ते दहावी आहे का प्ले ग्रुप पासून आहे इंग्लिश शाळा
@enlightentheworld100
@enlightentheworld100 4 жыл бұрын
आई वडिलांनी संस्कार चांगले लावा । मराठी English काही फरक पडत नाही
@gameshorts3007
@gameshorts3007 4 жыл бұрын
Aho punyat Bal shikshan New India asha kiti tari shala ahet English medium sathi
@sagarkadam1985
@sagarkadam1985 4 жыл бұрын
मी पन माझ्या मुलाला इंग्लिश शाळेत घातल आहे पन आता मात्र त्याचा पश्चाताप होत आहे
@asmitapatil9393
@asmitapatil9393 4 жыл бұрын
बरोबर आहे... या शिकण्यासाठी आपल्याला हिंदी शाळेत जावं लागलं नाही ..आपण ती हिंदी चित्रपट गाणी ऐकून/ बघूनच शिकली... तसच इंग्रजी शिकण्यासाठी काही इंग्रजी शाळेत जायची गरज नाही. हिंदी ऐवजी इंग्रजी ला एंटरटेनमेंट भाषा...किंवा द्वितीय भाषा म्हणून वापरली तर ....तीही सहज शिकू शकतो...त्यासाठी इंग्रजी शाळेत जाण्याची गरज नाही. लहानपणी मातृभाषेतून विज्ञान , गणित शिकल्यामुळे त्या गोष्टी सहज डोक्यात बसतात...आणि पाया पक्का होतो. त्यामुळे प्रथम भाषा : मराठी आणि द्वितीय : इंग्रजी असावी.
@vsardar
@vsardar 4 жыл бұрын
हे सुमार दर्जाचे आकलन सर्वांना माहिती आहे तुम्ही नवीन काय सांगीतले.
@sampatwakade6372
@sampatwakade6372 Жыл бұрын
Marti is best language
@dakshatasamarth1829
@dakshatasamarth1829 2 жыл бұрын
tumhi English medium mdhe ghatale tri ya माध्यमातून शिकून येणारी मुल त्याच कॉलेज ला जातात जिथे मराठी माध्यमाची मुल असतात.....मग तुमचे बोर्ड कोणतेही असोत
@ronalronal4224
@ronalronal4224 4 жыл бұрын
इंग्रेजी आमचा छन्द्द असु शकतो मात्रभाषा नाही मात्रभाषा मराठीच राहिल ....
@kunaljadhav16
@kunaljadhav16 4 жыл бұрын
Garibani Swatchi Muley Marathi Shalet shikavit Mhanje Shikshakana Pagar Miltil wa Tya Pagar Madhun Shikshak swatachi Muley English Medium madhe shikawatil, karan Shikshakan swatawar bharosha naahi aani Tyanchyaa Gunwatewar shankaa aahe mhanun te Tyachi Mule English Medium madhe Shikawata, Pahile Shikashakani Swatachi Muley English Medium madhe shikavavit
@tejas7151
@tejas7151 4 жыл бұрын
Comments madhe marathi prem dakhavnare sarva lok aplya mulanna English shalet shikavtat.
@suhas8868
@suhas8868 2 жыл бұрын
he ekdam barobar bole
@sanghamitrasuryawanshi2355
@sanghamitrasuryawanshi2355 Жыл бұрын
हे सगळे खरे आहे पण ष्रश्न असा आहे की जे इंग्रजी शिक्षक आहेत त्यांना नीट इंग्रजी येत का?आणि जे मराठीत शिकवतात त्यांना नीट मराठी येत का?सरकारी शाळेत मुक्त असून नीट शिकवले जात नाही,आणि खाजगी शाळेत पैसे भरुन पण शिक्षण नीट नाही.
@bhuvanmore7516
@bhuvanmore7516 4 жыл бұрын
मातृभाषा मध्ये शिक्षण हे गरजेचे आहे इंग्लिश हि आपली भाषा नाही
@KunalVijay799
@KunalVijay799 4 жыл бұрын
कोण्याही भाषेची पॉवर ही तिच्याशी जुडलेल्या अर्थव्यवसतेवर वर असते। मराठी तुम्हाला एक माणूस म्हणून चांगला बनवेल पण पैसा नाही देऊ शकत।कारण महाराष्ट्र मध्ये सुद्धा मराठी पेक्सा इंग्लिश जास्तपैसा कमवून देते।
@laxmambhusanar7088
@laxmambhusanar7088 2 жыл бұрын
मराठी शाळा चांगली आहे पण ग्रामीण भागामध्ये शिक्षण मिळत नाही
@shreyabhosale3666
@shreyabhosale3666 Жыл бұрын
बरोबर
@rajeshdongre4296
@rajeshdongre4296 3 ай бұрын
माझा मुलाला मी Z P मद्ये शिकवेल आज माझा मुलगा वसमत मध्ये p s i आहे
@samadhansakhare4130
@samadhansakhare4130 2 жыл бұрын
इंग्लिश भाषा कमजोर आहे, विचार करता येतो का इंग्लिश मध्ये 😃
@AmolPatil-cc6xz
@AmolPatil-cc6xz Жыл бұрын
aarara
@atulgosavi9080
@atulgosavi9080 5 ай бұрын
You both are confused.... एकदा ठरवा तुमचं डिबेटचा टॉपिक, English medium Vs Marathi Medium हा आहे की, स्टेट बोर्ड Vs CBSE बोर्ड हा आहे....
@savitrishirsat2385
@savitrishirsat2385 5 ай бұрын
माझा मुलगा चार वर्षाचा आहे त्याला टाकायचे इंग्लिश स्कूलमध्ये
@vinayshende8090
@vinayshende8090 3 жыл бұрын
Only marathi
@samadhansakhare4130
@samadhansakhare4130 2 жыл бұрын
मराठी बोलता इंग्लिश मीडियम शाळा का?
@vinayakkale9962
@vinayakkale9962 4 жыл бұрын
Marathi hi Aapli matrubhumi Aahe ticha sanman kela pahije..marathi shalet valan lagat English Medium made mhatarpanacha Aadhar satavto
@KunalVijay799
@KunalVijay799 4 жыл бұрын
आता इंलिश अघोषित राष्टीय भाषा झाली आहे।
@sojwaltiwalkar8379
@sojwaltiwalkar8379 4 жыл бұрын
English
@marathasarakar3173
@marathasarakar3173 4 жыл бұрын
Hindavi swarajyat rahayache asel tar Marathi bhasha alich pahije !
@ganeshlahane45
@ganeshlahane45 4 жыл бұрын
दुसर्या ताईंचं खरय इंग्रजी हे गरजेचं होउन जाते
@asmitapatil9393
@asmitapatil9393 4 жыл бұрын
हिंदी शिकण्यासाठी आपल्याला हिंदी शाळेत जावं लागलं नाही ..आपण ती हिंदी चित्रपट गाणी ऐकून/ बघूनच शिकली... तसच इंग्रजी शिकण्यासाठी काही इंग्रजी शाळेत जायची गरज नाही. हिंदी ऐवजी इंग्रजी ला एंटरटेनमेंट भाषा...किंवा द्वितीय भाषा म्हणून वापरली तर ....तीही सहज शिकू शकतो...त्यासाठी इंग्रजी शाळेत जाण्याची गरज नाही. लहानपणी मातृभाषेतून विज्ञान , गणित शिकल्यामुळे त्या गोष्टी सहज डोक्यात बसतात...आणि पाया पक्का होतो. त्यामुळे प्रथम भाषा : मराठी आणि द्वितीय : इंग्रजी असावी.
@shaikhaltamash6946
@shaikhaltamash6946 4 жыл бұрын
Jai lok marathi school madhe shikawtat taynchi mula English medium madhe taktat ani lokana marathit taknaiyache salae detat. Marathi bhashicha upyog phakta rajkarna sathi kartat Marathi manoos jaga ho ya deshacha dhaga ho😅😄
@asmitapatil9393
@asmitapatil9393 4 жыл бұрын
हिंदी शिकण्यासाठी आपल्याला हिंदी शाळेत जावं लागलं नाही ..आपण ती हिंदी चित्रपट गाणी ऐकून/ बघूनच शिकली... तसच इंग्रजी शिकण्यासाठी काही इंग्रजी शाळेत जायची गरज नाही. हिंदी ऐवजी इंग्रजी ला एंटरटेनमेंट भाषा...किंवा द्वितीय भाषा म्हणून वापरली तर ....तीही सहज शिकू शकतो...त्यासाठी इंग्रजी शाळेत जाण्याची गरज नाही. लहानपणी मातृभाषेतून विज्ञान , गणित शिकल्यामुळे त्या गोष्टी सहज डोक्यात बसतात...आणि पाया पक्का होतो. त्यामुळे प्रथम भाषा : मराठी आणि द्वितीय : इंग्रजी असावी.
@shaikhaltamash6946
@shaikhaltamash6946 4 жыл бұрын
@@asmitapatil9393 Hollywood picture hindi dubbed astat mag, aadhi hindi ch marathi mansachiya dokiya waroon jatae mag ti American & British English tar Ani apli mansae bhaltae ch prakar kartat Hollywood movie bhagitaliya war Marathi manoos jaga ho ya desha cha dhaga ho
@sachinchoramale459
@sachinchoramale459 2 жыл бұрын
आता जी मुलं आपलं देश चालवत आहेत MPSC UPSC मधून निवड झालेत ते सर्व इंग्लिश मेडीयम मधून आलेत का तर नाही ते ग्रामीण भागातील मराठी शाळेतून आलेत.इंग्लिश फक्त एक भाषा आहे नोकरी नाही.मुलांना आपल्या बोली भाषेत शिकून मुलांना चांगलं वेक्त करता येतं
@dhirajgaund
@dhirajgaund 4 жыл бұрын
नुसत बोलयच पन सगळ्याना english शीवाय पर्याय नाही माहित आहे😂
@aniketmalap5596
@aniketmalap5596 4 жыл бұрын
बरोबर.
@mangeshmore9029
@mangeshmore9029 4 жыл бұрын
We must ask why we send them to school ? It is just waste of millions of hours that they can enjoy
@kdmptk
@kdmptk 4 жыл бұрын
Hindi bolacha thambva.
@sujalpednekar6820
@sujalpednekar6820 3 жыл бұрын
सहमत भाऊ.....जय मराठी 🚩🚩
@स्वराज्य-छ1थ
@स्वराज्य-छ1थ 3 жыл бұрын
अगदी बरोबर
@world_conquerer
@world_conquerer 4 жыл бұрын
English shikwa higher education English madech available ahe
@pri.k2961
@pri.k2961 2 жыл бұрын
Right, english आणि मराठी शाळा दोन्ही चांगल्या आहेत. पण 10 नंतर सर्व शिक्षण इंग्लिश मध्ये होते तेव्हा मात्रा अडचण येते. मग नंतर job वागते साठी पण english लागते
@shaileshshinde3163
@shaileshshinde3163 4 жыл бұрын
मराठी
@vaidiR4141
@vaidiR4141 4 жыл бұрын
Marathi .sarvangin vikasa Sathi matrubhashetla shikshan uttam
@ranojip513
@ranojip513 4 жыл бұрын
Marathi
@YogeshPatil-oj6be
@YogeshPatil-oj6be Жыл бұрын
#Balachikalajisonalip
@amitathakur5581
@amitathakur5581 4 жыл бұрын
Convet school faqta payse banavanaych factari aahay.tyat kahi sansakar,jivan jaganyach calla nahi. Aj dipreation diywoorss baddala he sanskar wadhalet.matit ruzaayache assel tar marati shikka.
@desaipoultry
@desaipoultry 4 жыл бұрын
टिलक चा संबंध काय? मी मराठी माणूस परंतू इंग्रजीच योग्य
@Mathew_8275
@Mathew_8275 4 жыл бұрын
English medium madhe taka ani 5th pasun Marathi compulsory Kara, mug English phud phud bolnar
@ganeshk3230
@ganeshk3230 4 жыл бұрын
bbc dalbhadri lok tumhi fakta gairsamaj pasrava samaja madhe language varti jast focus na karta shalet kai shikavla jata hyachya varti jaast focus kela pahije kontya pan medium chi shala aso apla culture deep madhe shikavla pahije mughal alya nantr cha itihas shikavtat tyachya agodarcha itihas pan shikavla pahije basic current affairs pan sangitla pahije mulanna asa barach kahi changes ghadvun anyachi garaj ahe education system madhe pan he lok tumhala language language chya vadat adkavnar ani jithe changes anaychi khari garaj ahe tithe lakhsa ch deu denar nahi ashe atlya gati chi he lok ahet
@vaibhavjadhav5143
@vaibhavjadhav5143 4 жыл бұрын
Marathi medium ch best ahe
@gameshorts3007
@gameshorts3007 4 жыл бұрын
Marathi mule vikas hoto asa Kahi nahi.... Ulat Marathi mulanmadhye nyungandch nirman hoto.....
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,3 МЛН
Trapped by the Machine, Saved by Kind Strangers! #shorts
00:21
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 40 МЛН
Geography | CTQs Series for RRB-JE CBT-1 | Lecture-9 | MADE EASY
1:59:38
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,3 МЛН