Markandeya Fort (मार्कंड्या किल्ला) II Drone Shots II

  Рет қаралды 73,811

Sameer Hajare (Sam)

Sameer Hajare (Sam)

3 жыл бұрын

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडापासून सुरु होणार्‍या डोंगररांगेत अनेक किल्ले वसलेले आहेत. सप्तशृंगी गडासमोरच दिसणार्‍या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रावळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पूरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो
शहाजाहानच्या काळात दक्षिणसुभा औरंगजेबाच्या ताब्यात होता. औरंगजेबाने अलिवर्दीखानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिकण्याचा हूकूम दिला. इ.स. १६३९ मध्ये अलिवर्दी खानाने वर उल्लेख केलेले सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख आपल्याला इंद्राई किल्ल्यावर पाहाता येतो.
वणी - दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. त्यात मार्कंड्याचा समावेश होता. महाराजांच्या निधनानंतर मुघलांनी हे किल्ले जिंकून घेतले.
मार्कंड्या व रवळ्या - जावळ्या किल्ल्याच्या मध्ये जी खिंड आहे, ती मुलनबारी या नावाने ओळखतात. या खिंडीतून मार्कंड्या गडावर चढताना पहिला टप्पा पार पडल्यावर आपण पठारावर येतो, ही गडाची माची आहे. माचीवरुन बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवर दगडात कोरलेल्या; बांधलेल्या पायर्‍या दिसतात. या वाटेवरच डावीकडे एका कातळकड्या खाली कातळात कोरलेल्या दोन गुहा दिसतात. त्यांना "ध्यान गुंफा" म्हणतात. येथून वर चढताना उजव्या हाताला बुरुजाचे व डाव्या हाताला तटबंदीचे अवशेष दिसतात. हा पायर्‍यांचा टप्पा संपला की, समोरच सप्तशृंगी गड दिसतो. तो पाहून , डाव्या बाजूच्या कातळात खोदलेल्या वाटेने बालेकिल्ल्यावर जाता येते. येथे पहिल्या टप्प्यावर एका घुमटी खाली कोरलेले टाकं पाहाता येते. या टाक्याला "कमंडलू तीर्थ" म्हणतात. या टाक्यात पिण्याचे पाणी बारामाही असते. दुसर्‍या टप्प्यावर एका रांगेत खोदलेली तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. त्यांच्या बाजूलाच एक सुकलेल टाक आहे. गडाच्या सर्वोच्च टोकावर मार्कंडेश्वराच मंदिर आहे. मंदिरात मार्कंडेय ऋषींची मूर्ती व शिवलींग आहे. गडाच्या या सर्वोच्च टोकावरुन सप्तशृंगी गड, रवळ्या जावळ्या, धोडप हे किल्ले दिसतात.
#अहिवंतगड #सप्तशृंगी #मार्कंड्या #रावळ्या-जावळ्या #Ravlya #Javlya #Ravlya Javlya #कण्हेरा #मोहनदरी #markandya #ahivant #achala #dhodap #धोडप #maharashtratourism #Maharashtra Tourism #MTDC #trekking #sahyadri #Incredible India #incredibleindia

Пікірлер
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
rajgad~Capital Fort Rajgad Dussehra Simollaghan Campaign
22:15
Janardan konduskar
Рет қаралды 106
Rajgad Fort | Journey with Public Transport | We used different route | Part 1
12:39
भटकंती ग्रुप - Bhatkanti Group
Рет қаралды 10 М.
Rajgad Fort Trek I Night Trek I JB Vlogs
18:00
JB Vlogs
Рет қаралды 25 М.
Rajgad to Torna Range Trek | राजगड ते तोरणा ट्रेक | Rajgad fort pune | Torna fort
11:17
𝗔𝗱𝗶𝘁𝘆𝗮 𝗢𝘂𝘁𝗱𝗼𝗼𝗿𝘀 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹
Рет қаралды 3,9 М.