Рет қаралды 69
जय भीम,
ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका अंतर्गत असलेल्या टिटवाळा विभागातील भारतीय बौद्ध महासभेच्या नालंदा शाखेने आज दिनांक २६ जानेवारी २०२५ या दिवशी भारताचा ७६व्या प्रजासत्ताक दिन सिद्धार्थ बुद्ध विहार मांडा टिटवाळा या ठिकाणी साजरा केला .
भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा महिला विभाग अध्यक्षा आदरणीय शिलाताई तायडे यांच्या हस्ते राष्ट्र ध्वज वंदन करण्यात आले.
आंबेडकर नगर शाखेचे अध्यक्ष आदरणीय पंकज जाधव गुरुजी यांनी उपस्थित समता सैनिक दलाचे नेतृत्व केले.
७६व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नालंदा शाखेने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सिद्धार्थ बुद्ध विहार मांडा टिटवाळा या ठिकाणी केले होते.
या शिबिरासाठी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन,साई सिटी हॉस्पिटलच्या डॉ.श्रद्धा केदार यांच्या नेतृत्वात 12 तंत्रज्ञांचा समूह आरोग्य तपासणीसाठी उपस्थित होता.
आजच्या या शिबिरा अंतर्गत अनेक उपासक उपासिकांना कमी दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले,तसेच एकूण १५ उपासक उपासिकांना डोळ्याचे गंभीर आजार असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. या शिबिरामध्ये ईसीजी चाचणी द्वारे ह्रदय रोग,तसेच विशेष उपकरणांच्या सहाय्याने दम्याची तपासणी सुद्धा करण्यात आली. शिबिरामध्ये उपस्थितांच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी, रक्तदाब अशा विविध चाचण्या करण्यात आल्या.सर्व चाचण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी चाचण्यांचे अध्ययन करून उपस्थीतांना त्यांच्या शरीराची वैद्यकीय परिस्थिती सोप्या भाषेत समजावून सांगितली , तसेच आवश्यक त्या उपासक उपासिकांना पुढील वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा सल्ला देण्यात आला.
सदर कार्यक्रमास टिटवाळा विभागातील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय के.एल. उघडे गुरुजी, वंचित बहुजन आघाडी नेते किशोर गायकवाड,युवा अध्यक्ष आदरणीय भावेश जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया टिटवाळा शहर अध्यक्ष आदरणीय विजय जी भोईर साहेब,युवा अध्यक्ष सनी जाधव, सम्यक संबोधी प्रतिष्ठान चे सदस्य,तसेच इतर अनेक मान्यवर या शिबिरास उपस्थित होते. एकूण ८० उपासक उपासिकांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला.