Рет қаралды 531,193
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा एक निकष राज्य सरकारने बदलला आहे. कटुंबनिहाय कर्जमाफीऐवजी व्यक्तिनिहाय कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या सहकारमंत्र्यांनी सभागृहात यासंदर्भात निवेदन दिले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कुटुंबनिहाय दीड लाखाच्या मर्यादेची कर्जमाफीची अट होती. त्यानुसार कुटुंबाची थकबाकीची एकूण रक्कम दीड लाखांपेक्षा जास्त असल्यास त्यांना दीड लाखांवरील रक्कम आगाऊ भरल्यानंतर सरकारकडून दीड लाखांचा कर्जमाफीचा लाभ देण्याचा निकष होता. आता सरकराने याप्रकरणी कुटुंबाची अट शिथील केली असून, कुटुंबातील अर्ज केलेल्या प्रत्येक कर्जदारास वैयक्तिक दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल.