छान 👌🌹 कृपया खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत - 1. बांधावरील बुटके नारळ लागवडीचे अंतर किती असावे आणि पूर्ण शेतात नारळ लागवडीचे अंतर किती असावे? एकरी किती झाडे बसतात? 2. जमीन काळी असेल तर एका माडाची एका आठवड्यात पाण्याची गरज किती असते? 3. नारळ लागवड करताना खड्डे भरताना वाळू टाकावी काय? 4. अहिल्यानगर (अहमदनगर)च्या वातावरणात बुटक्या जातीच्या नारळाची कोणती variety आपण सुचवाल? 5. नारळ झाडाला कार्बन क्रेडिटचे पैसे मिळतात का? मिळाले तर किती वर्षांनी आणि किती वर्षापर्यंत मिळतात? 6. काळ्या मातीत बांधावर नारळ लागवड करताना कोणती काळजी घ्यावी? सधन्यवाद!🙏🌹 आपलाच, बप्पासाहेब कणसे, ता. शेवगाव, जिल्हा - अहिल्यानगर. Mob -7276619000.
@OrganicKatta4 ай бұрын
1. झाडांची सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत ३० फुट आणि जर बांधावर लागवड करायची असेल तर दोन रोपांत २५ फुट आंतर ठेवले तरी चालेल. ३० फुट आंतर ठेवल्यास एकरी ४० झाडे बसतात. दोन रोपातील आंतर हे झाडाच्या जातीवर आणि मातीच्या प्रकारानुसार कमी जास्त होऊ शकते. 2. जमीन जर काळी असेल तर नारळाला पाण्याची गरज हंगामानुसार बदलते. उन्हाळ्यात साधारणपणे १०० लिटर तर हिवाळ्यात ५०-६० लिटर पाणी आठवड्याला देणे गरजेचे असते. 3. नारळ लागवड करत असेल जमीन अगदीच चिबड पाण्याचा निचरा न होणारी असेल तर त्याच वेळी खड्डे भरताना वाळू टाकावी अन्यथा गरज पडत नाही. किंवा आपल्याकडे पाण्याचे प्रमाण अगदिच कमी असेल तर अशा वेळी बारीक वाळू खड्डे भरताना तळाशी टाकावी. 4. कोलंबस, बानावली या बुटक्या जाती खोबर आणि पाणी या दोन्हीं गोष्टींसाठी अहिल्यानगर मध्ये लागवड करू शकता. 5. कार्बन क्रेडीट हे नारळाच्या झाडांसाठी घेता येत नाही. 6. काळ्या मातीत बांधावर झाडे लावली तर किमान झाडाभोवती आळे करता येईल एवढी जागा असावी. अन्यथा मुळ्या उघड्या पडून तितकं उत्पादन मिळत नाही.
@kansepatil4 ай бұрын
@organicKatta सप्रेम नमस्कार 🙏 आपण दिलेल्या माहितीबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🌳
@dr.manikraosonawane92334 ай бұрын
मेडम नमस्ते खुप छान माहिती दिली आहे त्या बद्दल खुप खुप धन्यवाद पण रोप लावतांना किती बाय किती वर रोपे लावायची /ऐका ऐकरात किती रोपे लावायची ते पण सांगायचे राहिले च परत तेवढे माहिती जरूर सांगावी ही विनंती
@OrganicKatta4 ай бұрын
झाडांची सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत ३० फुट आणि जर बांधावर लागवड करायची असेल तर दोन रोपांत २५ फुट आंतर ठेवले तरी चालेल. ३० फुट आंतर ठेवल्यास एकरी ४० झाडे बसतात. दोन रोपातील आंतर हे झाडाच्या जातीवर आणि मातीच्या प्रकारानुसार कमी जास्त होऊ शकते.