Рет қаралды 121,372
🌲 नवीन फळझाडे लागवडी नंतरचे वार्षिक नियोजन 🌳
प्रा.विनायक ठाकूर
मित्रानो फळझाडांची लागवड शक्यतो जून मध्ये पाऊस सुरू झाल्यावर किमान 2 फूट माती खोल ओली झाल्यावर करावी
2 ते 10 वर्षेर्जगणाऱ्या झाडांसाठी 1.5 फूट लांब,रुंद,खोल खड्डा खोदावा.
10 ते 30 वर्षे आयुर्मान असणाऱ्या झाडांसाठी खड्डा 2.5 x 2.5 x 2.5 फूट खोदावा 50 ते 60 वर्षे आयुर्मान असणाऱ्याअसणाऱ्या झाडांना 3 x3x3 फूट खड्डा खोदावा .
जमिनीच्या प्रकारानुसार खड्डा कमी-जास्त खोल खोदावा.सहज टिकाव मारल्यास जर ते 2 ते 3 इंच खोल गेल्यास 3 ते 3.5 फूट खड्डा खोदावा जर 6 इंच टिकाव गेल्यास 1.5 फूट खोदावा.
पहिल्या 1 फूट थरातील माती वेगळी ठेऊन भरते वेळी ती प्रथम घालून मग काडीकचरा ओला सुका पाला,10 kg शेणखत, 1ते 1.5 kg s.s.p,100gm क्लोरोपायरोफॉस पावडर ,घालून खड्डा भरून घ्यावा.
झाडाच्या उंची नुसार दक्षिण उत्तर दोन खुंट रोवून इंग्रजी H प्रमाणे एक किंवा दोन ठिकाणी उंची नुसार बांधावे मुळा जवळ भर देऊन खोडाला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी.
(ज्यांना आपली फळबाग सेंद्रिय पद्धतीने करायची आहे त्यांनी पहिल्या वर्षी वाढी साठी काही रासायनिक खते व औषधें वापरावी व हळूहळू कमी करून 100% सेंद्रिय बनवावी )
लागवड करताना किंवा लागवड करून झाल्या वर औषध C.O.C. कॉपर ऑक्सी क्लोराईड
copper oxychloride
प्रमाण _2 gm 1 ltr पाण्यातून मुळाजवळ द्यावे.व पानांवर फवारणी करावी.
लागवडी नंतर 20 दिवसांनी (NPK) 18:46:0 D.A.P.(डाय अमोनियम फॉस्फेट) प्रति झाड 100 ते 200 gm गोलाकार दयावे.
लागवडी नंतर 1 महिन्याने हयुमिक एसिड 2ml 1लिटर पाण्यातून मुळांना द्यावे.नंतर 10 दिवसांनी
औषध_C.O.C. कॉपर ऑक्सी क्लोराईड
copper oxychloride
प्रमाण 2 gm 1 ltr पाण्यातून मुळाजवळ द्यावे.व पानांवर फवारणी करावी.
लागवडी नंतर 1.5 महिन्याने. triacantanol
प्रमाण 3 ml
प्रति 1 ltr पाणी घेऊन फवारणी व ड्रीचिंग करावे.लागवडी
नंतर 2 महिन्याने
औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
प्रमाण - 1 ml/g.m.
5 ltr पाण्यातून फवारणी करावी.
लागवडी नंतर 3 महिन्याने 20:10:10 (NPK) या विद्राव्य खताची फवारणी करावी 5gm 1लिटर पाणी
लागवडी नंतर 4 महिन्यांनी पुन्हा 18:46:0 D.A.P.(डाय अमोनियम फॉस्फेट) प्रति झाड 100 ते 200 gm गोलाकार दयावे.
5 व्या महिन्यात हयुमिक एसिड 2ml 1लिटर पाण्यातून मुळांजवळ द्यावे.
6 महिन्यानंतर प्रतिझाड 10 gm युरिया पाण्यातून महिन्यातून एकदा द्यावे.
जमिनीच्या मगदुरा नुसार /व रोपाच्या गरजे नुसार पाणी दयावे.
पाण्याचा ताण असल्यास प्रतिझाड 2 ते 3 kg. कोकोपीट वापरावे.
संभाव्य व अचानक येणाऱ्या कीड व रोगांपासून रोपांचे व पालवीचे संरक्षण करावे त्यासाठी योग्य त्या कीटक व बुरशी नाशकांचा वापर करावा ( अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड,या यु-ट्यूब चॅनल वरील व्हिडियोस मार्गदर्शक ठरतील )
व गरजे नुसार छाटणी करावी.
पाण्याचा व जमिनीचा PH 6.5 ते 7.5 असावा गरजे नुसार चुना,व जिप्सनचा वापर करावा.
सन स्ट्रोक पासून झाडाची काळजी घेणे. ऑक्टोबर नंतर बुंध्या जवळ मल्चिंग करावे.
पावसाळा संपल्यावर खोडाला बोर्डोपेस्ट, लावावी.
जून ते मे पर्यंत झाडाला पाण्याचा ताण देऊ नये.
झाडावर विपरीत परिणाम दिसल्यास खालील कृषि तंत्र निकेतन ग्रुप वर फोटो अपलोड करून सल्ला घ्यावा.
फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)
www.facebook.c...
यू ट्युब लिंक
/ @krushitantraniketan-d...
आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,नारळ सोलणी यंत्र
नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच.
संपर्क
श्री.सुधाकर सावंत - 7039169662
श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
श्री.निलेश वळंजू - 9604410063
श्री.भार्गव - 9405398618
श्री.विनायक ठाकूर (ऑफिस) - 9373770485
शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App ग्रुप ला खालील लिंक वापरून सामील व्हा.
शेळी पालन chat.whatsapp.... कुक्कुटपालन chat.whatsapp.... फळबाग लागवड chat.whatsapp....
कृषि तंत्र निकेतन गृफ- 1
chat.whatsapp....
🔹!! धन्यवाद!!🔹
*श्री.विनायक ठाकूर
कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.*
लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
शेतीविषयक ह्या लिंक पहा
श्रद्धा रोपवाटिका - 2023
• श्रद्धा नर्सरी 2023 वे...
नर्सरी झाडे 2022
• रोपवाटिका (नर्सरीतील क...
श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
• श्रद्धा रोपवाटिका वेंग...
महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
• महाराष्ट्रात लागवडीयोग...
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
• महाराष्ट्रात लागवडीयोग...
नर्सरी झाडे 2022
• रोपवाटिका (नर्सरीतील क...
नारळ लागवड व संपूर्ण व्यवस्थापन
• नारळ लागवड व संपूर्ण व...
नारळ लागवड
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
नारळ लागवड 1वर्ष नियोजन
• नारळ रोप लागवड 1 वर्ष ...
नाराळ जातींची लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
नारळ काढणी यंत्र (शिडी)
• नारळ काढणी यंत्र (शिडी...
कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.