ऊन ऊन खिचडी (Un Un Khichadi)| Marathi Kavita | Spruha Joshi | Poems

  Рет қаралды 291,178

Spruha Joshi

Spruha Joshi

Күн бұрын

आपल्या KZbin Channel वरील कवितांच्या फर्माईशींमधील प्रमोद सोनार यांची एक फर्माईश अशी होती की 'ऊन ऊन खिचडी' ही कविता ऐकायला मिळावी. त्याचा विडिओ तुच्यासोबत share करतेय. कविता सादरीकरण आवडलं तर नक्की कळवा.
ऊन ऊन खिचडी साजुकसं तुप,
वेगळं राहायचं भारीच सुख.
एक नाही दोन नाही माणसं बारा,
घर कसलं मेलं ते बाजारच सारा.
सासुबाई- मामंजी,नणंदा नी दीर,
जावेच्या पोराची सदा पीर पीर.
पाहुणे रावणे सण नी वार,
रांधा वाढा जीव बेजार.
दहा मध्ये दिलं ही बाबांची चुक,
वेगळं राहायचं भारीच सुख.
सगळ्यांना वाटतं माझ घर प्रेमळ,
प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू,
अन् एवढासा जीव झाला तरी विंचु तो विंचु.
चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी,
वीतभर लाकडाला हातभर झिलपी.
बाबांची माया काय मामंजीना येते,
पाणी तापवलं म्हणुन साय का धरते?
बहीण अन् जाऊ यात अंतरच खुप,
वेगळ राहायचं भारीच सुख.
दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा,
दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा.
दोघांनी रहायचं, छान छान ल्यायचं,
गुलुगुलु बोलायचं नी दुर दुर फिरायच.
आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी,
फिटतील साऱ्या बाई आवडी निवडी.
दोघांचा असा स्वयंपाकच काय?
पापड मेतकुट अन् दह्याची साय ,
त्यावर लोणकढ साजुक तुप,
वेगळं राहायचं भारीच सुख.
रडले पडले नी अबोला धरला,
तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला.
पण मेलं यांच काही कळतच नाही,
महिन्याचा पगार कसा पुरतच नाही.
साखर आहे तर चहा नाही,
तांदुळ आहेत तर गहु नाही.
ह्यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी,
घोटभर पाणि द्यायला पण बायकोच हवी
बाळ रडल तर ते खपायचं नाही,
मिनीटभर कसं त्याला घ्यायचही नाही.
स्वयपाक करायला मीच,
बाळ रडलं तरी घ्यायचं मीच.
भांडी घासायची मीच,
अन् ह्यांची मर्जी पण राखायची मीच.
जिवाच्या पलीकडे काम झाल खुप,
वेगळं रहायच कळायला लागल सुख.
सासुबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या,
सकाळचा स्वयंपाक निदान
करत तरी होत्या
मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे,
बाजारहाट करायला भावजी जायचे.
कामात जावेची मदत व्हायची,
नणंद बिचारी ऊर नीपुर निस्तरायची.
आत्ता काय कुठल्या हौशी नी आवडी,
बारा महिन्याला एकच साडी.
थंडगार खिचडी, संपलय तुप,
अन् वेगळं व्हायचं कळलय सुख!!
प्राध्यापक मो.दा.देशमुख
#SpruhaJoshi #Marathi #Kavita
------------------------------------**************************----------------------------
DISCLAIMER : This is the official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
___________________________________________________________________
Follow for regular updates about my work on
👉 Facebook : / spruhavarad
👉 Twitter : / spruhavarad
👉 Instagram : / spruhavarad

Пікірлер: 1 200
@sudhabhat171
@sudhabhat171 6 ай бұрын
डोळे तुझे खूपच बोलके, शब्दा शब्दतले भाव फार बोलके, मानेचा मुरका, फारच छान, कवितेत भरलाय स्वतःचा प्राण,जुनीच कविता पण स्टाईल नवी, सादर करायला स्पृहाच हवी!!!
@arvindjoshi4654
@arvindjoshi4654 Жыл бұрын
स्पृहा अतिशय उत्तम कविता आहे आणि तुझे साभिनय कविता वाचन तर अप्रतिमच आहे, खरं तर स्पृहा नावाचं अष्टपैलू व्यक्तिरत्न आम्हाला लाभलं हे आमचे भाग्यच म्हणावे..तुझे लोकमान्य मालिकेतील अभिनय आणि मराठी उच्चारण पाहून आणि ऐकून असं वाटतं की सत्यभामाबाईच्या व्यक्तिरेखेला दुसरं कोणी असूच शकत नाही...तुला खूप खूप शुभेच्छा, 👌🙏
@anitabodas2722
@anitabodas2722 4 жыл бұрын
अगदी उन उन खिचड़ी साजुक तूप, स्पृहा तुझ्या कवितेची मज्जाच खूप .
@latasuryawanshi5481
@latasuryawanshi5481 4 жыл бұрын
स्पृहा कवितेचे शब्द जेवढे छान आहेत त्यापेक्षा तुझे सादरीकरण खूप सुंदर आहे परत परत तुझ्या कविता ऐकाविशी वाटते,,.
@kanchanraje1579
@kanchanraje1579 3 жыл бұрын
माणसाने किती गोडगोड दिसावं आणि त्याहून गोड बोलावं बाई !!! love you Spruhaa. अशीच रहा!!
@shrutisawant7320
@shrutisawant7320 3 жыл бұрын
खुप छान कविता अन् सादरीकरण सुद्धा👌👏
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 4 жыл бұрын
मी हैदराबादला असतो.सध्या बंगलोरला असतो. माझ्या मुलीने लहानपणी हैदराबाद ला गणेशोत्सवात ही कविता सादरकेली होती. त्यावेळी तिच्या "तांबे बाई" ह्यांनी छानपैकी बसवून घेतली होती. तिनं सुद्धा छान हावभावासाहित सादर केली होती. खूप,खूप आभार तुमचे. आतां मुलगी दिल्लीला रमली. पण तुमच्या सादरीकरणाणे माझ्या डोळ्यातील मित्रासमवेत तुम्हीं तिला पुनः तुमच्या शब्दानीं आमंत्रण दिलं.💐💐
@aryachanakyanagarjyesthnag8640
@aryachanakyanagarjyesthnag8640 4 жыл бұрын
अगदी खरं 👌
@amrutaphadke851
@amrutaphadke851 4 жыл бұрын
नेहेमी प्रमाणे सुंदर वाचन
@shailasarode5733
@shailasarode5733 4 жыл бұрын
किती सुंदर कविता आहे, एकत्र आणि वेगळ्या संसाराचे चित्र हुबेहूब उभे केलेस ते तुझ्या उत्कृष्ट सादरीकरणाने.. खूप मस्त स्पृहा 👍👍
@punerikokani9296
@punerikokani9296 4 жыл бұрын
स्पृहा ताई एकदम अप्रतिम कविता गं. सुंदर सादरीकरण
@girishmurudkar6410
@girishmurudkar6410 4 жыл бұрын
स्पृहा!! एक तरल कवियत्री!!! अभिनेत्री म्हणून ती उत्तम आहेच; पण संवेदनशील उच्च अभिरुचीचे तिचे हे अंग ,जास्त भावते!!! स्पृहा च्या मधाळ आवाजातली ही ऊन ऊन खिचडी चवदार लागली👌👌!!!
@kanchandanavale6051
@kanchandanavale6051 4 жыл бұрын
Mast
@manishaphansekar9238
@manishaphansekar9238 4 жыл бұрын
छान सादरिकरन तू वाचताना तुजा बरोबर घड्तय अस वाटलं.
@स्नेहल-ज2घ
@स्नेहल-ज2घ 4 жыл бұрын
@@manishaphansekar9238 हे इथं म्हणू नको. इथून काढ आणि मुख्य कॉमेंट भागामध्ये बोल म्हणजे स्पृहा ताईंना कळेल आणि त्या वाचतील. सादरिकरन नसते, सादरीकरण असते. तुजा नाही, तुमच्या.
@sagarhange1205
@sagarhange1205 3 ай бұрын
वा वा स्पृहा खूपच छान खूपच सुंदर सादरीकरण.. एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करणारी कविता..
@chhayaawate6010
@chhayaawate6010 4 жыл бұрын
खूप खूप सुंदर , अग मीं ही कविता D, ed ला असताना ऐकलेली लिहून ही घेतलेली पण डायरी हरवली 🤦‍♀️😥, पण आज अचानक ऐकायला मिळाली आणि तुझ्या गोड अभिनयाने पहायला ही मिळाली. 😘😘खूप छान सादर केलीस 👌👍😄. आता शेअर करते सगळ्यांना. 😄👍
@dadak3141
@dadak3141 2 жыл бұрын
एक कवयत्री म्हणून माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे... मी जर मुलगी असतो, तर कदाचित यापेक्षा वेगळ्या भावना व्यक्त केल्या नसत्या...😀 दिसण्यात तु छानच आहेसच आणि वरद-स्पृहा ही जोडी मला नक्कीच आवडते... Best wishes for you... एक राहिलं... तूझ्या तोंडून ही कविता ऐकली की एक तरी बुक्की तुला घालावी असं बऱ्याच वेळा वाटतं... 😂
@sharvarikulkarni9513
@sharvarikulkarni9513 4 жыл бұрын
वा मस्त 👌👍 कविता.सादरीकरण खूप छान.अनुबंध कार्यक्रम खूप खूप मस्त 👌
@pragatithakur7119
@pragatithakur7119 3 жыл бұрын
स्पृहा, मस्तच आहे कविता अणी तू सुधा 😍😍
@arunnadkarni5675
@arunnadkarni5675 4 жыл бұрын
संसाराचा खरा अर्थ सागणारे विचार या कवितेत फारच सुंदर मांडले आहे.... अरुण नाडकर्णी ...(पुणे,)
@nishaborgaonkar4907
@nishaborgaonkar4907 4 ай бұрын
तोडे लहान मुलींनी पायात घालायचे तोडे..यावर होती ती कथा.अतिशय छान सादरीकरण होते.मला हवीय ती कथा
@rupaliprabhughate3171
@rupaliprabhughate3171 4 жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण ....मी प्रथमच ऐकली... कविता आणि सादरीकरण अप्रतिम....
@ShobhanaWalimbe
@ShobhanaWalimbe 10 ай бұрын
सुंदर सादरीकरण. खूप वर्षानी पुन्हा एकदा ऐकायला मिळाली. विसुभाऊ च्या तोंडून ऐकली होती. खूप छान!
@snehapotnis5400
@snehapotnis5400 4 жыл бұрын
उत्तम सादरीकरण स्पृहा ..खूप छान वाटले कविता ऐकून ...काही वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये रंकाळा महोत्सवात विसूभाऊंनी ही कविता ऐकवली होती .
@prakashkorde537
@prakashkorde537 4 жыл бұрын
स्पुहा तुझी ऊन ऊन खिचडी व काय वाढले पानावर या कविता खुप आवडल्या.तुझे सादरीकरण बघताना मला प्रा.लक्षमण देशपांडे यांच्या वराड निघालय लंडनला ची आठवण झाली. फारच सुंदर.ऊन ऊन खिचडी या कवितेचे कवि आहेत प्रा.मोरेश्वर देशमुख आहेत.
@arundhatimhalgi
@arundhatimhalgi 4 жыл бұрын
प्रा मोरेश्वर दामोदर देशमुख हे कवी आहेत.... काव्यवाचन अप्रतिम केलं आहेस..अभिनंदन स्पृहा माझी पण ही खूप आवडती कविता आहे .. शाळेत असताना मी बरेच वेळा सादर केली होती.
@bhuvneshdeshmukh7232
@bhuvneshdeshmukh7232 3 жыл бұрын
शब्दांच्या तोडीचे expressions ... कमाल
@shubhangigholap2363
@shubhangigholap2363 4 жыл бұрын
खूपच सुंदर स्पृहा. तुझ्या कवीता व तु आम्हा सर्वांन्ना खूपच आवडतेस.
@prachijoshi1523
@prachijoshi1523 3 жыл бұрын
कविता सादरीकरण अप्रतिम व कविता त्याहून सुंदर......
@dhananjaythakar9104
@dhananjaythakar9104 4 жыл бұрын
भावपूर्ण सादरीकरण! ऐकताना डोळ्यातून पाणी कधी आलं कळलच नाही. खूsप छान..
@samrudhdipansare6689
@samrudhdipansare6689 4 жыл бұрын
Bharich...khup chhan kavita aani sadarikaran..👌👌
@Prajakta0412
@Prajakta0412 4 жыл бұрын
व्वा!! स्पृहाताई काय अप्रतिम सादरीकरण केलंस गं!🤩🤩 कसं काय जमतं गं तुला, कवितेतील शब्दांना आपलसं करायला? खूप खूप खूप छान !!!! तू सादर केलेली कुठलीही कविता मला आवडते. तुझ्या तोंडून कविता ऐकताना त्या कवितेचं वेगळचं रूप समोर येतं. अशाच अनेक कविता तुझ्याकडून ऐकण्याची इच्छा आहे.🤗
@kishorehunnargikar811
@kishorehunnargikar811 4 жыл бұрын
सुंदर कविता, सुंदर सादरीकरण. घरोघरी आवडेल विशेषत: वेगळं राहणाऱ्या जोडप्यांना.
@aryachanakyanagarjyesthnag8640
@aryachanakyanagarjyesthnag8640 4 жыл бұрын
खूप सुंदर 👌
@adityagamer1486
@adityagamer1486 4 жыл бұрын
Un un khichadi khichadi var tup hi kavita majhe aajoba mala sangayche
@verolord1377
@verolord1377 4 жыл бұрын
याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात जे तुम्ही करत आहात
@krishnashetty5142
@krishnashetty5142 3 жыл бұрын
Khoop chan.Spruha tuna sadarikaran pan mastach.
@SONIYAWADHAI
@SONIYAWADHAI Ай бұрын
खूब सुंदर सादरीकरण ताई जोशी ताई तुम्ही मला खूब आवडता खूब छान........
@yogitakulkarni268
@yogitakulkarni268 4 жыл бұрын
विसुभाऊंच्याच कार्यक्रमात सादर होणारी कविता...रावणाच्या घरी यायचे पाहुणे दहा दहा तोंडांनी या या म्हणे ही कविता ऐकायला मिळाली तर खूप आनंद होईल.
@pragatikaranjkar4371
@pragatikaranjkar4371 Жыл бұрын
अप्रतिम कविता,सुंदर वाचन,त्यामुळेच ती समजायला सोपी वाटली.प्रत्येक महिलेचं दुःख
@mugdhadabholkar991
@mugdhadabholkar991 4 жыл бұрын
स्पुहा तू एक अतिशय गोड मुलगी आहेस.😘 एकदम सुंदर सादरीकरण केलंस.कवितेतील भाव मनापर्यंत पोहचले.वा मस्त
@ashwinitamhankar2365
@ashwinitamhankar2365 3 жыл бұрын
सुरेख कविता खूपच सुंदर सादरीकरण !
@nehk2380
@nehk2380 4 жыл бұрын
कित्ती सुंदर लिहिलं आहे आणि तू बोलली सुद्धा खूप छान ..☺️☺️
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 2 жыл бұрын
स्प्रूहा खरच सुंदर कविता सादर केलीस .नविन लग्न झालेल्या मुलींना हा चांगलाच ढोस आहे .धन्यवाद तुझे सर्वच कार्यक्रम पहावेसे वाटतात .खुपच सुंदर
@madhumatiwaradpande3715
@madhumatiwaradpande3715 4 жыл бұрын
माझी पण अत्यंत आवडती कविता ! आपण इतकी अप्रतिमरित्या सादर केलीत की बस्स ! खूप खूप धन्यवाद ! You are simply great!🙏🏻
@satishpatankar5010
@satishpatankar5010 Жыл бұрын
ही खूप आवडती कविता आहे उत्कृष्ट सादरीकरण
@madhurijape8065
@madhurijape8065 Жыл бұрын
अग किती छान सादर केली.. ...कवितेचे बोल...तुझ्या सादरीकरणाने जास्त भावले....तुझ्यावरचे भाव.....तुझे शब्दाचे टोन....अग काय ते व्यक्त होता येत नाही....खुप..खुप छान. मला खुप आवडतेस g स्पृहा तु.एक इच्छा आहे...आयुष्यात एकदा तुला भेटण्याची.
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 3 жыл бұрын
ही कविता मोरेश्वर दामोदर देशमुखांनी लिहीली आहे आनि वि. सु. भाऊ सादर करायचे.... फार सुंदर आठवण
@purushottampeshave317
@purushottampeshave317 2 жыл бұрын
सादर करण्याची पध्दत खूप छान
@chandrakantdhamal1061
@chandrakantdhamal1061 Жыл бұрын
खुपच छान कविता आणि सादरीकरणही.
@kishorkatkar3234
@kishorkatkar3234 4 жыл бұрын
Khup Chan...👌
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 4 жыл бұрын
स्प्रुहा फारच छान विडंबन काव्य नविन लग्न झालेल्या मुलींचे डोळे उघण्यास छान डोळ्यात अंजन घातलेस धन्यवाद
@sangeetakulkarni8724
@sangeetakulkarni8724 4 жыл бұрын
फारच सुंदर सादरीकरण मो दा देशमुख यांची कविता आहे
@googleuser354
@googleuser354 3 жыл бұрын
स्पृहाचे सादरीकरण म्हणजे नंबर एक.👌🏻👌🏻👌🏻
@sudhakulkarni1503
@sudhakulkarni1503 Ай бұрын
खुप सुंदर
@yoginigunde1837
@yoginigunde1837 4 жыл бұрын
Spruha Tai khupch chhhannnnnnnnnnn❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@manalighag1873
@manalighag1873 4 жыл бұрын
खूपच छान सादर केलीस कविता स्पृहा....
@anannyavaishampayan7183
@anannyavaishampayan7183 4 жыл бұрын
पाणी तापवलं म्हंजे साय का ठरते??????............. awesome ❤️❤️
@shrutichavan193
@shrutichavan193 Жыл бұрын
छानच ! कविता व सादरीकरण 👌👌👌👌👌
@nutangupte6506
@nutangupte6506 4 жыл бұрын
Khup chhan kavita Ani expressions suddha khupach sunder👍
@summaiyabagwan6072
@summaiyabagwan6072 4 жыл бұрын
ऊन ऊ न खिचड़ी साजुक तूप कवितेचा अर्थ समजला खुप बाय कांचीच असते सदा चूक आणि म्हणून वेगळ राहन्याचे कळते सुख खुपच सुंदर आहे कविता स्पृहा जी 1 nu
@amodpathradkar982
@amodpathradkar982 4 жыл бұрын
Hi Spruha हे विडंबन काव्य माझे आजोबा श्री मो.दा.देशमुख (मोरेश्वर दामोदर देशमुख ) ह्यांनी लिहिलेले आहे. ते ४१वे विदर्भ साहित्य संमेलन, चंद्रपूर येथे अध्यक्ष पदी होते. आनंद वन वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील नाटककार म्हणून प्रसध्द होते. श्री.विसु भाऊ यांना कार्यक्रमात हे काव्य म्हणण्याची परवानगी दिली होती. श्री.विसु भाऊ १९८४ पासून ते हे काव्य म्हणत आहेत.
@sadabehere
@sadabehere 4 жыл бұрын
👌👏👍
@aryachanakyanagarjyesthnag8640
@aryachanakyanagarjyesthnag8640 4 жыл бұрын
@@adityagamer1486 खूप सुंदर 👌
@creatoraadiraj8284
@creatoraadiraj8284 4 жыл бұрын
@@aryachanakyanagarjyesthnag8640 काय झाल
@aryachanakyanagarjyesthnag8640
@aryachanakyanagarjyesthnag8640 4 жыл бұрын
@@creatoraadiraj8284 कविता आणि माहिती खूप सुंदर 👌
@sandhyasaratkar8248
@sandhyasaratkar8248 4 жыл бұрын
खूप सुंदर रचना
@nabhathakur1387
@nabhathakur1387 3 жыл бұрын
कविता खूप छान आणि सादरीकरण अगदी सुंदर
@ashwininaik951
@ashwininaik951 4 жыл бұрын
Khup sunder 👌 presentation....tumchya kavita eikun Kavita Vachan avdu lagla
@vaidehivanarse
@vaidehivanarse 2 жыл бұрын
स्पृहा किती छान सादर करतेस तू कविता. ही कविता मी खुप वेळा ऐकली आहे.मला खुप आवडते ही कविता . तु सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात तू एक जेवना वरची कविता सादर केली होती .ती परत एकदा सादर कर अशी माझी विनंती आहे.मला आत्ता ती आठवत नाही.
@Geometrical-patterns
@Geometrical-patterns 4 жыл бұрын
मस्तय ..!!!☺️👌
@dr.vilaspawar9402
@dr.vilaspawar9402 11 ай бұрын
आजची सकाळ छान कवितेने सुरू झाली. कवितेचे सादरीकरण अतिशय सुंदर.
@sunandagurav6269
@sunandagurav6269 4 жыл бұрын
ऊन ऊन खिचडी.......... शिकवून गेली जीवनाचं खरं रूप सादरीकरण with full expression स्पृहा 😘
@bipinapte774
@bipinapte774 3 жыл бұрын
वा ताई सुंदर सादरीकरण,मी ही कवीता पहिल्या वेळेसच ऐकली खुप छान वाटली. जमले तर औदूंबर या बालकवींच्या कवीतेचे सादरीकरण करा हि विनंती
@nileshshinde1821
@nileshshinde1821 2 жыл бұрын
स्पृहाजी तुम्ही खुप छान कविता वाचन करता . मो. दा . देशमुख यांची ही कविता वेगळे राहिल्याने काय काय होते . एकत्र राहणे हेच किती चांगले आहे याचे दर्शन घडवते❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
@mayurapalande8981
@mayurapalande8981 4 жыл бұрын
Khuuuuuuuup Chan Kavita.. aani kammal sadar kelis tu❤️👍superlike👍
@aryachanakyanagarjyesthnag8640
@aryachanakyanagarjyesthnag8640 4 жыл бұрын
खूप सुंदर 👌
@shwetabhandare7307
@shwetabhandare7307 4 жыл бұрын
सादरीकरण खूपच छान 👌👌मज्जा अली
@adityapawar5211
@adityapawar5211 4 жыл бұрын
Amazing 😍 And that line.. "पाणी तापवल म्हंजे साय का धरते?"😍
@sanikayadav6563
@sanikayadav6563 4 жыл бұрын
या ओळीचा अर्थ कळू शकेल ?
@aryachanakyanagarjyesthnag8640
@aryachanakyanagarjyesthnag8640 4 жыл бұрын
👌
@bhavanamistry6023
@bhavanamistry6023 3 жыл бұрын
What does exactly this line mean?
@sanjaydeshpande3219
@sanjaydeshpande3219 2 жыл бұрын
@@sanikayadav6563 that means no cream on water
@sanikayadav6563
@sanikayadav6563 2 жыл бұрын
@@sanjaydeshpande3219 ok
@dipalipande772
@dipalipande772 2 жыл бұрын
Spruha tu khupach god aahes .tuza kawita kathan mala farach awadal.
@swapnmarathi35
@swapnmarathi35 4 жыл бұрын
वा खूप छान एक्सप्रेशन आणि प्रेझेन्टेशन पण खूपच छान तुमच्या तली रमाबाई उंच माझा झोका या भूमिकेची आठवण झाली धन्यवाद स्वप्न मराठी यूट्यूब चैनल कडून आपणास खूप खूप शुभेच्छा
@sandhyakhanapurkar170
@sandhyakhanapurkar170 4 жыл бұрын
खरच खूप छान आहे कविता 👍👍
@aryachanakyanagarjyesthnag8640
@aryachanakyanagarjyesthnag8640 4 жыл бұрын
खरंच खूप सुंदर सादरीकरण 🙏🙏🙏
@shreeram8985
@shreeram8985 3 жыл бұрын
स्पृहा तुझं ते निरागस बोलकं कवितेतुन अवतरण़ खुप मनाला भावतं असं आम्हांला आंनद दे
@vinayajadye63
@vinayajadye63 4 жыл бұрын
खूप सुंदर स्पृहा ! भावपूर्ण सादरीकरण 👌🏻👌🏻, कविता खूपच मार्मिक आहे.
@jagrutipatil5744
@jagrutipatil5744 4 жыл бұрын
मी 5th मध्ये असताना हि कविता शाळेत सादर केली होती आणि खूप जणांची दाद मिळवणली होती आज 14 वर्षांनी त्या आठवणी ताज्या झाल्या....thanku so much spruha ताई....तू great aahes yar खरच......nayika mhanun,कवी म्हणून तर तू नीपून आहेसच पण एक व्यक्ती म्हणून देखील तू ग्रेट ग्रेट आणि ग्रेट च आहेस....we all lu😘
@mrinalini7155
@mrinalini7155 2 жыл бұрын
Lovely poem. And your expression in reading as well as body language really brings it to life.💓💓
@ShripatiNaik-jz3uc
@ShripatiNaik-jz3uc 11 ай бұрын
कविता एकुनमनप्रसन्नझाले
@abhijitamb
@abhijitamb 4 жыл бұрын
I had a previledge to attend visubhau's program and this was presented. It received once more if I remember correctly. I still remember this program. Spruha can think of a similar program for the next generation. I am sure there'll be a great response
@ninadgupte8686
@ninadgupte8686 3 жыл бұрын
ही कविता मो.दा.देशमुख यांनी लिहिलेली आहे.
@vidyaapte
@vidyaapte Жыл бұрын
मजा आली ऐकायला . अभिवाचन सुंदर😊
@arunpadhave122
@arunpadhave122 9 ай бұрын
कविता किती जरी सुंदर असली तरी ती सादर करता आली पाहिजे तुम्ही खूप छान सादर केली तुमचे चेहरा वरील हावभावानेच कवितेचा अर्थ समजतो खूप छान स्पृहा ताई
@rupalichannawar7632
@rupalichannawar7632 4 жыл бұрын
Awesome 😊
@manasvidalvi1705
@manasvidalvi1705 Жыл бұрын
स्पृहा दीदी खूप छान. अगदी सत्य परिस्थितीवर प्रकाश टाकलास.
@ashapande4394
@ashapande4394 4 жыл бұрын
Amazing expression. Spruha tai🌹🌹🌹
@medhamanerikar4781
@medhamanerikar4781 11 ай бұрын
काय ते दिसणं,काय तो लूक. कविता ऐकणं म्हणजे भारीच सुख. पाडगावकरांची प्रेम म्हणजे.....कविता तुझ्या बोलक्या डोळ्यानी ऐकायची आहे.
@SpecialKitchenMarathi
@SpecialKitchenMarathi 3 жыл бұрын
I love this poem and nice expressions 👍👍... ही कविता मो. दा. देशमुख यांची आहे.
@gaurianekar470
@gaurianekar470 2 жыл бұрын
Khup Sundar kavita aani tyahipeksha Sundar saadarikaran!
@swatisurangalikar322
@swatisurangalikar322 4 жыл бұрын
ही कविता वैदर्भीय लेखक कवी श्री. मो. दा. देशमुख यांची आहे. मी 70-80 च्या दशकात बरेचदा सादर केलीय नागपूरात. स्वाती सुरंगळीकर
@milindvyavahare3514
@milindvyavahare3514 4 жыл бұрын
Thanks for information 😊🙏
@aryachanakyanagarjyesthnag8640
@aryachanakyanagarjyesthnag8640 4 жыл бұрын
Good that you clarified 👍
@sharadvedpathak82
@sharadvedpathak82 4 жыл бұрын
खुप सुंदर कविता आणि आपले सादरीकरण सुध्दा ताई .
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 4 жыл бұрын
वा !!! काय सादरीकरण !! 🤣🤣 मी वेगळी झालेली आहे ना !! मग पटतंय बाई अगदीच !!😃😃
@pratibhamahure711
@pratibhamahure711 3 жыл бұрын
फारच सुंदर कविता आहे स्पृहा ताई आणि तुमच्या मुखातून ऐकताआणखीच गोड झाली
@diptikulkarni7618
@diptikulkarni7618 4 жыл бұрын
खूप खूप छान कविता ❤️ आणि अप्रतिम सादरीकरण स्पृहा ताई 😘 ऐकतच राहावे असे वाटत आहे.🤗🤗
@sunitasane6551
@sunitasane6551 6 ай бұрын
किती छान कविता व सादरीकरण!
@JVP1234
@JVP1234 4 жыл бұрын
What a beautiful expressions......And Presentation really awesome.....U deliver every word direct to our hearts..... Great 👌👌👌
@verolord1377
@verolord1377 4 жыл бұрын
मराठी टाईप करायला लाज वाटत्या काय??
@JVP1234
@JVP1234 4 жыл бұрын
@@verolord1377 इंग्रजी मधून कमेंट केली म्हणून ना कवितेस कमीपणा येतो आणि ना मराठी भाषेस आणि लाज तर तुम्हांला वाटायला पाहिजे खोटं नाव वापरून दुसऱ्याला ट्रोल करायला
@sunitapatil5331
@sunitapatil5331 Жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण 👌👌👌👌
@usharamesh2332
@usharamesh2332 4 жыл бұрын
Beautifully presented by you
@saritahasurkar1577
@saritahasurkar1577 2 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण दिदी👌👍👏👏
@leenakelkar6725
@leenakelkar6725 4 жыл бұрын
Very beautifully recited.
@madhavithakoor9973
@madhavithakoor9973 Жыл бұрын
कविता छान आहे सादर करण्याची पद्धत उत्तम आहे.
@balasahebjoshi2653
@balasahebjoshi2653 2 жыл бұрын
खूप सुरेख , उत्तम प्रकारे निवेदन साद्रिकरण
@68atul
@68atul 4 жыл бұрын
फारच मस्त कविता आहे. मी पहिल्यांदाच ऐकली. खूप मजा आली. स्पृहा, आपण सादर पण खूप छान केली. अशाच नवीन कविता आम्हाला ऐकवा. विंदांची " तेच ते" म्हणून एक कविता आहे. जर आपण सादर केलीत तर आवडेल. अतुल दिवाकर, ( जिथे काही नाही उणे ) अर्थात पुणे
@ajaykumarchavan2160
@ajaykumarchavan2160 4 жыл бұрын
अप्रतिम कविता खूप खूप सुंदर
@learnlanguageswithyogee9509
@learnlanguageswithyogee9509 4 жыл бұрын
Masta... and the way you recite it... also masta!!
@AnilJagatap-i4f
@AnilJagatap-i4f 7 ай бұрын
❤ए स्पृहा तूझे गोड ,मनमोहक आवाज आणी सुंदर रूपड मनाला घायाळ होतय गो👗🧚💕🫀👌💋🤝🫠👌
@shwetaachrekar2258
@shwetaachrekar2258 4 жыл бұрын
Your facial expression ultimate which made listening more interesting 😇👌
@aryachanakyanagarjyesthnag8640
@aryachanakyanagarjyesthnag8640 4 жыл бұрын
Actually
@sheetaltanksale6033
@sheetaltanksale6033 4 жыл бұрын
खूप छान मस्त सादरीकरण मला खूप आवडली कविता
@MS_Bhise07
@MS_Bhise07 3 жыл бұрын
Words will fall short when describing your talent👌👌
@nileshan.chaudhari4262
@nileshan.chaudhari4262 4 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण स्पृहाजी
@ashamahajan3718
@ashamahajan3718 4 жыл бұрын
Love this poem...
@varshalipatil4339
@varshalipatil4339 3 жыл бұрын
Mast Kvita aahe ma'am......
@kavitamehendale2920
@kavitamehendale2920 4 жыл бұрын
स्पृहा ,ऊन ऊन खिचडी ,कविता आवडली.सादरीकरणही.
@mohinidutal6352
@mohinidutal6352 4 жыл бұрын
Khup mast kavita aahe ...Aani tumhi khup chhan aani god padhatine sadar keli aahe
द्वारका | Prabha Ganorkar | Spruha Joshi Poems
6:55
Spruha Joshi
Рет қаралды 69 М.
The Lost World: Living Room Edition
0:46
Daniel LaBelle
Рет қаралды 27 МЛН
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН
Хаги Ваги говорит разными голосами
0:22
Фани Хани
Рет қаралды 2,2 МЛН
I'VE MADE A CUTE FLYING LOLLIPOP FOR MY KID #SHORTS
0:48
A Plus School
Рет қаралды 20 МЛН
17th Pushp Vyakhyanmala - Sankarshan Karade
27:53
K. K. Wagh College of Pharmacy
Рет қаралды 117 М.
Spruha Joshi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:01:23
Sulekha Talwalkar
Рет қаралды 207 М.
The Lost World: Living Room Edition
0:46
Daniel LaBelle
Рет қаралды 27 МЛН