Рет қаралды 66,729
कुणाचा डाएट किती प्रभावशाली आहे? वजन कमी करण्यासाठी नक्की कुठला आहार घ्यावा? दररोजच्या जेवणात कुठल्या भाज्या, फळं आणि कडधान्य असायला हवीत? मला अमुक भाजी आवडत नाही, मग त्याने काही बिघडेल का? आहाराची धोकादायक पातळी कुठली आहे? मला सतत काहीतरी खावंसं वाटतं-हे कुठल्या आजाराचं लक्षण आहे का? खूप प्रयत्न करूनही वजन घटत नाही किंवा वाढतही नाही, मग चुकतंय नक्की कुठं? मला भविष्यात कुठलाही आजार होऊ नये म्हणून काय आहार असावा? आधुनिक जीवनशैली आणि व्यायामाच्या कमतरतेचा आहारावर होणारा परिणाम काय असतो? कामाच्या व्यापामुळे आहाराकडे दुर्लक्ष केल्याने होणाऱ्या समस्या कशा टाळाव्यात?
'वजन वाढवा - वजन घटवा’ याच्याही पुढे जाऊन आहाराबद्दल जागरुकता आणि साक्षरता निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका आणि आहारतज्ज्ञ अमृता देशपांडे यांची मुलाखत.