Рет қаралды 229,752
#BolBhidu #PappuKalani #AjitPawar
पप्पू कलानी, ते नाव ज्यावर खुनाचे डझनभर आरोप झाले, ज्याच्यासाठी जेलमधून निवडून येणंही अवघड नव्हतं, ज्याच्यावर एकाही खुनात थेट समावेश असल्याचा आरोप सिद्ध झाला नाही आणि ज्याच्या नावाभोवती आजही उल्हासनगरचं राजकारण फिरतं. सध्या पप्पू कलानीचं नाव पुन्हा चर्चेत आलंय, ते राजकीय भेटीमुळं. पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानी यानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उल्हासनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर पंचम कलानी सुद्धा उपस्थित होत्या.
या भेटीनंतर चर्चा रंगली पप्पू कलानी कुटुंबीय अजित पवार गटाला पाठिंबा देणार का ? दोन आठवडे आधी अशाच चर्चा कलानी कुटुंबीय शरद पवार गटाला पाठिंबा देणार का अशा रंगल्या होत्या, ज्याचं कारण ठरलेलं आमदार रोहित पवार यांनी कलानी कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट. पप्पू कलानी सुरुवातीपासूनच शरद पवारांचा निकटवर्तिय म्हणून ओळखला जातो, पण सध्या त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा पाठिंबा नेमका कुणाला हा प्रश्न ऐरणीवर आलाय, ज्याचं कारण आहे पप्पू कलानीची ताकद. ही ताकद समजते पप्पू कलानीचा इतिहास जाणून घेतल्यावर. हाच इतिहास पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/