Palasnath Temple Palasdev | पळसनाथ मंदिर पळसदेव | उजनी धरणाच्या पाण्याखाली बुडालेले पळसदेवाचे मंदिर

  Рет қаралды 3,362

weekendtravels.in

weekendtravels.in

3 ай бұрын

उन्हाळ्यात उजनी धरणाचे पाणी आटले की पाण्याखाली बुडालेले पळसदेवाचे मंदिर दिसू लागते. पुणे-सोलापूर रस्त्यावर भिगवण हे प्रसिद्ध गाव आहे. या गावापासून काही अंतरावर पळसदेव गावाचा फाटा फुटतो. गावातून गेलेला तो रस्ता थेट पुढे कच्चा होत थेट उजनी नदीच्या पात्रात पोहोचतो. एका छोट्याशा होडीप्रवासाने पाण्यातून वर आलेल्या पळदेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचता येते. या मंदिराशेजारी आणखी एक मंदिर आहे, पण कोणत्या देवाचे ते समजत नाही. समोरच्या टेकाडावर एक रिता गाभारा असलेले मंदिर आहे. या मंदिराभोवती कातळी भिंतींवर रामायण कोरले आहे. उजनी धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली की हे मंदिर नागरिकांचे आकर्षण असते. दरवर्षीप्रमाणे धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे हे मंदिर आता दिसू लागले आहे. हे मंदिर पुरातन असून स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. साधारणत: ११ व्या शतकात या मंदिराची निर्मिती करण्यात आली. मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधण्यात आले आहे. या मंदिराचा उल्लेख ज्ञानेश्वरीतही करण्यात आला आहे. धरणाच्या निर्मितीपासून हे मंदिर पाण्यात आहे. तरीही ते आजही टिकून आहे. मंदिराची पूर्ण रचना केवळ २७ दगडी नक्षीदार खांबांपासून तयार करण्यात आलेली आहे. शिखर भागाकडे प्रवेश करण्यासाठी छोटेसे दार आहे. शिखर भागात सतत सूर्यप्रकाश खेळता राहावा, याकरिता चारही बाजूंनी मोठमोठे छिद्र आहेत. मंदिराच्या आवारात जुन्या झाडांची खोडे स्थितप्रज्ञ सारखी कणखरपणे उभी दिसतात. मंदिराच्या सभोवताली भव्य दगडी तटबंदी आहे. तिची बऱ्यापैकी पडझड झाली असली तरी दिमाखदार आस्तित्व आजही कायम आहे. बाहेरून गाभाऱ्यात पहिले असता आतमध्ये फक्त गाळ शिल्लक आहे. मंदिरातील शिवलिंग गावकऱ्यांनी स्थलांतरित करून आता गावामध्ये नवीन मंदिर उभारलं आहे. मंदिरात देवाची मूर्ती नसली तरी देवत्वाच अस्तित्व अजून टिकून आहे. मागच्या बाजूला शंकराची एक भग्नावस्थेतील मूर्ती पाहायला मिळते. कळसाच्या आत गेल्यावर एका विस्मयकारक शांततेचा अनुभव आपल्याला येतो.
या मंदिरासमोरच किनाऱ्याजवळ एक श्रीराम मंदिर आहे. या मंदिरावर रामायणातील प्रसंग कोरलेले आढळतात. राम मंदिर पळसनाथ मंदिरापेक्षानंतर बांधले आहे. साधारण पंधराव्या शतकात बांधले असावे. उन्हाळ्यात या मंदिरात पायी जाता येते. पळसदेव गावात काही मंदिरे आहे. अगदी नवीन बांधलेल्या मंदिरांजवळ पुरातन जैन प्रतिमा आढळतात. त्यामुळे पळसदेव हे गाव बरेच जुने असावे.
प्रचंड मोठा पाण्याचा फुगवटा असलेले उजनी धरण १९८० मध्ये बांधून पूर्ण झाले. भीमा नदीमधून वाहून येणारे पाणी अडवणे असा या धरणाचा उद्देश होता. थंडीपासून म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून भिगवणजवळ बरेच स्थलांतरित पक्षी येण्यास सुरुवात होते. त्यात फ्लेमिंगो हा भारतात आढळणारा सर्वात मोठा पक्षी तसेच भोरड्या म्हणजे रोझी स्टारलिंग या पक्षांचा आभाळात होणारा विलक्षण विहार ज्याला ‘मरमरेशन’ असे म्हणतात, तो पाहता येतो. काही पक्षी स्थलांतर करून येतात, त्यातले काही आता इथेच वर्षभर राहताना आढळतात.
उथळ पाण्यामुळे इथे फ्लेमिंगो पक्षी बऱ्याच संख्येने येतात. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण चाल, लांब सडक मान आणि त्यांचे उडणे या सर्व गोष्टी अतिशय रुबाबदार आणि प्रेक्षणीय असतात. भोरड्या साधारण ऑगस्ट सप्टेंबरकडे पूर्व युरोप आणि पश्चिम मध्य आशियातून येतात. या पक्षांना मधुसारिका, पळस मैना अशी नावे आहेत. खूप जास्त संख्येने असलेला त्यांचा कळप आकाशात विविध आकार करीत उडत असतो. त्यांचे ते विहरणे पाहणे हा अत्यंत वेगळाच आणि आनंददायी अनुभव असतो.
पळसनाथ मंदिर पळसदेव
places to visit near pune
temples in maharashtra
temples near pune
tourist attraction
underwater temple
palasnath temple palasdev
ujjani dam
ujjani dam back waters
palasdeo temple palasdev maharashtra
palasnath temple indapur
maharashtra trekking places
hidden waterfall sahyadri
maharashtra travel
trending tourist places
satara travel
satara tourist places in marathi
summer tourist places in satara
pune places
places to visit in maharashtra in summer
best staycation in maharashtra
places to visit in thane
maharashtra waterfall
tourist place near solapur
tourist places near solapur
maharashtra tourist places
summer tourist place
places to see in summer
treding tourist places
maharashtra trekking places
trending tourist places
maharashtra beautiful places
summer tourist places in satara
places to visit in maharashtra in summer
pune tourist places in marathi
pune travel
pune spots
best staycation in maharashtra
places to visit in thane
pune places
maharashtra trip plan
solapur tourist places in marathi
pune tourist places in marathi
summer tourist places in pune
summer tourist places in solapur
#bhigwan #temple #templesinindia #underwater #palasnath #solapur #nearpune #ujjani

Пікірлер: 7
@dayanandbharti3331
@dayanandbharti3331 3 ай бұрын
Jay bhim
@rohitchavan96k
@rohitchavan96k 2 ай бұрын
❤❤
@weekendtravelsin
@weekendtravelsin 2 ай бұрын
धन्यवाद मित्रा 😊 🙏
@BhatakantiWithShaileshVlogger
@BhatakantiWithShaileshVlogger 3 ай бұрын
मस्त भावा
@weekendtravelsin
@weekendtravelsin 3 ай бұрын
धन्यवाद मित्रा 🙏
@jayadventures7258
@jayadventures7258 3 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ
@weekendtravelsin
@weekendtravelsin 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻😇
Sri-Vidya Foundation Course | Mrs. Radha Marthi | #SangamTalks
1:09:23
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 35 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 43 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 10 МЛН