Рет қаралды 213
Google map link - maps.app.goo.g...
/ akashchavhan_insta
पळसदेव हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. जुने पळसदेव गाव उजनी धरण जलाशयात बुडाल्यामुळे नव्याने वसवलेले हे भीमा नदीकाठी असलेले गाव आहे.पुण्यापासून पळसदेव गाव १२० किमी.वर आहे.खुप जुने व प्राचीन शिव मंदिर आहे इतिहासात त्याचे उलेख आहे प्रति काशी विश्वदेव त्याचे महत्त्व आहे. उन्हाळ्यात धरणाचे पाणी आटले की पाण्याखाली बुडालेले पळसदेवाचे मंदिर दिसू लागते. पुणे-सोलापूर रस्त्यावर भिगवण हे प्रसिद्ध गाव आहे. या गावापासून काही अंतरावर पळसदेव गावाचा फाटा फुटतो. गावातून गेलेला तो रस्ता थेट पुढे कच्चा होत थेट उजनी नदीच्या पात्रात पोहोचतो. एका छोट्याशा होडीप्रवासाने पाण्यातून वर आलेल्या पळदेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचता येते. या मंदिराशेजारी आणखी एक मंदिर आहे, पण कोणत्या देवाचे ते समजत नाही. समोरच्या टेकाडावर एक रिता गाभारा असलेले मंदिर आहे. या मंदिराभोवती कातळी भिंतींवर रामायण कोरले आहे.
हे मंदिर यादवकालीन असावे. त्याच्या पक्क्या विटांनी बांधलेली शिखरे आजही टिकून आहेत. मंदिर आवारात सतीशिळा, वीरगळ, (भंगलेला) घोडा, मारुतीची मूर्ती, दीपमाळेचे अवशेष्भक्कम विटांची भग्न ओवरी असे अनेक अवशेष पाणी ओसरले की पाहता येतात. मंदिरासमोरची विटांची ओवरी ही फलटणकर निंबाळकरांनी बांधली असे सांगितले जाते. मूळ मंदिरातील काही मूर्ती नव्याने बांधलेल्या मंदिरात ठेवल्या आहेत.
मंडळी, आजच्या प्रवासात निसर्गाची गोडी आणि धार्मिक अनुभव एकत्र घेतले. या तलावाच्या मध्यात असलेल्या पालसदेव मंदिराचं दर्शन घेताना भक्तीचं वेगळं रूप पाहायला मिळालं."इतिहास जाणून घेतला आणि या ठिकाणची शांतता अनुभवली. तुम्हीपण इथे नक्की भेट द्या. आता निरोप घेतो.
पण लक्षात ठेवा, आपल्याला आजच्या क्षणाचा आनंद घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून, आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, आणि तुम्ही जिथे जाल तिथे हेच लक्षात ठेवा: ‘सुख म्हणजे धावणं नाही, तर तुमचं मन शांत करणं आहे.
#pune #kolhapur #maharashtra #hindutemple #historical #tourism #touristplace #maharashtradesha #temples #maharashtrian #histoire #india #nature #beuty