Рет қаралды 147,000
►KZbin - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade
► KZbin - kzbin.info....
► Facebook - / prashil.amba. .
► Instagram - / prashilambade
--------------------------------------------------------------------------------------------------------
सुधागड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. पूर्वी या गडाला भोरप[१] असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत.
इतिहास
सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. [संदर्भ हवा] पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली.[संदर्भ हवा]
शिवाजी महाराजांनी १६५७-५८ मध्ये जेव्हा आदिलशाही मुलुख जिंकला त्या वेळी सुधागडावर हा किल्ला स्वराज्यात सामील झाला असावा.नारो मुकुंद सबनीस यांच्या कडे गड होता.[२] शिवरायांनी या गडाचे भोरपवरून सुधागड असे नामकरण केले. राजधानीसाठी याही गडाचा विचार शिवरायांनी केला होता, असे सांगितले जाते.
इ.स. १६९४ साली याबाबत असा उल्लेख आढळतो की, 'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.'[३]
गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या गावातच छत्रपती संभाजी राजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजी राजांनी सुधागड परिसरात असणार्या परली गावात हत्तीच्या पायी दिले.
गडावर जाण्याच्या वाटा
सवाष्णीचा घाट : तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावी यावे. अथवा पाली गाव ते धोंडसे गाव हे अंतरही १२ कि.मी. आहे. पालीहून धोंडसे गावी यावे. तिथून गडावर जाण्यासाठी ३ तास लागतात.या वाटेने आपण दिंडी दरवाजात येतो.
नाणदांड घाट : एकोले गावातून घनगड डावीकडे ठेवून मावळतीकडे निघावे. पुढे पाऊण तासाने नाणदांड घाटात पोहोचतो. पुढे एक बावधान गाव आहे. तेथून पाच्छापूरची दिशा धरून ठाकूरवाडीत यावे आणि मग गडमाथा अवघ्या दोन तासात गाठता येतो.
----------------------------------------------------------------------------------------------------------
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name. inaudio - Infraction - Alioth
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#SarasgadFort #Raigad #SudhagadFort #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------