घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत

  Рет қаралды 2,665,923

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका शक्तीमान वीराचा इतिहास आणि दुर्दैवी अंत
आफजलखानाचे शीर कापणाऱ्या संभाजी कावजींना शिवरायांनी सैन्य पाठवून का मारले?
घोडा चारी पाय धरुन उचलणारे...जावळी मोहिमेत एका मोरेला मारणारे... शिवरायांनी फाडलेल्या, पळून चाललेल्या अफजलखानाचे मुंडके छाटणारे संभाजी कावजी!
पण याच संभाजी कावजींना नंतरच्या काळात शिवरायांच्या आज्ञेने मारण्यात आले
हे सर्व कसे, कुठे, केव्हा आणि का घडले?
संभाजी कावजींचे गाव, आडनाव, समाधी, स्मारक यासह हा थरारक इतिहास सादर झाला आहे. अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#SambhajiKavji # संभाजी कावजी #HistoryDeath

Пікірлер: 2 100
@vinodkulkarni1365
@vinodkulkarni1365 5 ай бұрын
माझा राजा शिवछत्रपतींनी किती यातना सहन करुन हिंदू धर्माचे रक्षण केले हिंदवी स्वराज्य स्थापना केले, जेव्हा जेव्हा महाराजांचे पराक्रमी इतिहास बघायला भेटतो तेव्हा नकळत डोळ्यातून अश्रू आणि मनात अतिशय दुख होत, 😭😭
@maliksayyed9022
@maliksayyed9022 Ай бұрын
महाराजांचा संघर्ष हा धर्मासाठी नव्हता तर स्वराज्यासाठी होता, स्वाभिमानासाठी होता. त्यामुळेच संभाजी कावजी सारख्या अंगरक्षकला देखील जेव्हा तो गद्दार झाला तेव्हा महाराजांनी प्रतापराव गुजरकरवी ठार केले..
@akralvikral4725
@akralvikral4725 9 ай бұрын
शिवाजी महाराजांनी दिल्लीवर देशावर राज्य केले असते तर भरतखंड कुठे उच्च स्थानी नेऊन ठेवला असता याचे विचार मनात येतात. अजून 20 वर्षे तरी स्वराज्य महाराजांच्या हाताखाली असायला पाहिजे होते.
@MarutiBedarkar
@MarutiBedarkar 9 ай бұрын
L😊
@ganeshjadhav4727
@ganeshjadhav4727 9 ай бұрын
Khare ahe. Thorle Raje 20 varsh ani Dhakle 40 varsh jagle aste tar appla itihas ha vegala asta.
@vasantkamble5482
@vasantkamble5482 9 ай бұрын
स्वराज्य मिळविले असते ठिक आहे, परंतू नंतर ते टिकवून ठेवण्यासाठी त्याच तोलामोलाचा कोणीतरी हजर असावा लागतो.कोणी तसा होता का?
@vasantkamble5482
@vasantkamble5482 9 ай бұрын
​@@ganeshjadhav4727हा पराक्रमी/तो पराक्रमी असे काही नसते. सर्वात पराक्रमी ती नियती असते.ती नियती ठरवते कोणाला कुठे पाठवायचे ते,त्याच्याकडून कोणते कार्य करून घ्यायचे ,जय पराजय कोणाचा करायचा ते.तीच खरी पराक्रमी असते.बाकी सर्व भ्रम असतो. तोच इतिहास असतो. थोडक्यात खऱ्या कर्त्याला सर्वजण विसरतात,दुःखाचे खरे कारण ते विसरणे असते.
@saradarghavane524
@saradarghavane524 9 ай бұрын
​@@MarutiBedarkarpp
@Measurement_metrology
@Measurement_metrology 9 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज किती हुशार आणि दूरदृष्टी ठेवत होते आणि भावनिक न होता स्वराज्य कसे सुरक्षित राहील याला किती महत्व देत होते हे यावरून दिसते
@manishdeshpande6253
@manishdeshpande6253 5 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 6 ай бұрын
प्रवीण भोसले सर खूप खूप धन्यवाद देशातील सर्व शालेय विद्यार्थी यूवा तरूणांनासाठी अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय आपण जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩 संभाजी कावजीना शत शत नमन 🙇‍♂️🙏
@abhijitjoshi2220
@abhijitjoshi2220 23 күн бұрын
Bhosàle kakatumchy
@gundopantjoshi7138
@gundopantjoshi7138 3 ай бұрын
माहिती अगदी शेवट पर्यंत ऐकली जाते.इतक्या प्रभावी पणे आपण ती मांडता सर.अप्रतिम.संभाजी कावजी बद्दल इतकी विस्तृत आणि अभ्यासपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद.
@radhikamahankal9939
@radhikamahankal9939 9 ай бұрын
मला खरंच संभाजी कावजी त्यांची कथा माहित नव्हती मी शिक्षिका आहे मी माझ्या शाळेत नक्कीच तुम्ही सांगितलेली संभाजी कावजी ची कथा सांगेन खूप सुंदर माहिती दिली सर
@blackarmy6306
@blackarmy6306 9 ай бұрын
आपण नांदेड जिल्ह्यात शिकवता का ??
@ravipradhan4770
@ravipradhan4770 9 ай бұрын
नका सांगू नाहीतर तुम्हाला गद्दरांचा त्रास होईल
@patilrahul515
@patilrahul515 8 ай бұрын
कथा नाही इतिहास सांगा
@upendrakamble3731
@upendrakamble3731 8 ай бұрын
राधीके तुझा संकल्प खुपच म्हणजे विश्वसुंदरीहुनही सुंदर आहे ! आई तुला त्रिवार नमन करतो !
@rahulbhopi4118
@rahulbhopi4118 8 ай бұрын
Aapla adhi ughadlela itihasachi shalet mulana sangitla pahije
@rekhataibhuyar3748
@rekhataibhuyar3748 9 ай бұрын
खूप सखोल माहिती आहे ही असा इतिहास सांगणारे लोक आता कमी झालेत समाजाला खरी माहिती मिळत नाही याची खंत वाटते खूप छान इतिहास सांगणारे सरांना शत शत प्रणाम 🙏💐
@vilasvaydande2676
@vilasvaydande2676 9 ай бұрын
भोसले साहेब धन्यवाद आपन अतिशय छान पद्धतीने माहित नसलेला ऐका महान वीराची गाथा लोकांसमोर मांडल्याबद्दल
@SamadhanpatilA
@SamadhanpatilA Ай бұрын
आमचा इतिहास च असा आहे की नुसत मावल्यांची जरी नाव आल तरी अंगावर् काटे आल्या शिवाय राहनार नही🚩🚩🚩 गर्व आहे मराठी असल्या चा जय शिवराय🚩🚩🚩🚩
@prabhakarkulkarni9774
@prabhakarkulkarni9774 8 ай бұрын
संभाजी कावजींबद्दल आपण दिलेली माहिती अतिशय चित्तथरारक तसेच स्फुरणदायी आहे. जय भवानी जय शिवाजी !
@AshokK.RajeNaik
@AshokK.RajeNaik 7 ай бұрын
आणि तितकीच लज्जित पण आहे, अखेरीस गद्दार म्हणजे गद्दार..!
@ApurvaJagtap-x9f
@ApurvaJagtap-x9f 5 ай бұрын
Jay bhavani jay shivaji
@sudhiremahajan
@sudhiremahajan 9 ай бұрын
खरच दुर्दैवी! संभाजी कावजींनी साक्षात शिवछत्रपतींच्या व हिंदवी स्वराज्याच्या विरोधात शायस्ताखानाला जाऊन मिळणे म्हणजे 'विनाशकाले विपरित बुध्दी'.
@bapubeloshe4503
@bapubeloshe4503 7 ай бұрын
मला पटलं नाही
@parag_Parag
@parag_Parag 4 ай бұрын
मानवी मनाचा कांगोरा आहे... जाब विचारला म्हणजे माझ्या वरिल विश्वास कमी झाला व माझ्याविषयी संशय उत्पन्न झाला आता मी ही नोकरी सोडतो... माझ्या प्रत्यक्ष अनुभवाचे ही उदाहरण आहे... नाण्याची दुसरि बाजू ही पण आहे कि शाहीस्ता जेवढा क्रूर महाराष्ट्रात मानला जातो तेवढा बंगाल मध्ये नाही मानला जातं... निदान बंगाली मुस्लिम बांधव त्याला खुप मानतात दोन्ही देशांचे
@GaneshLaghute-p1g
@GaneshLaghute-p1g 4 ай бұрын
Sambhajicha kahitari kut plan asel swarajya chya hitasathi pan gairsamaj jhala
@GaneshLaghute-p1g
@GaneshLaghute-p1g 4 ай бұрын
@sam1994989
@sam1994989 9 ай бұрын
सर्वच मराठे जर शिवरायांच्या बरोबर लढले असते तर इतिहास वेगळाच झाला असता .
@ramdeokarumdyu5999
@ramdeokarumdyu5999 7 ай бұрын
जय शिवराय, जय कावजी.
@prathamthakare84018
@prathamthakare84018 7 ай бұрын
प्रत्येक यशस्वी व्यक्ती ला मागे खेचण्यात कोणी तरी असतोच
@theorder1548
@theorder1548 7 ай бұрын
आपने सही कहा/लेकिन इसे कारण हिंदुओंका मराठोंका इस्लामका अज्ञान/अगर कुरान को जानते मोहम्मदबिनकासिमके जिहादी हमले केसमय 711 में तो हिंदुस्तानमें कुरान का प्रवेश नही होता/आज हिंदुवंशविच्छेदि काफिरवादी देश हिन्दू मानवता विरोधी इस्लामके सर्वपक्षीयहिन्दुनेता बिनामांगे तैनाती फौज बने है/अन्यथा देशकी हिंदुओंकी ये स्थिति नही होती/ इस्लामके तैनाती फौजिय सर्वपक्षीयहिंदु नेताओको रोकना पहला काम कर्तव्य आज बना है/सावधान देशवासियों हिंदुओं /बचा हुवा देश का हिंदुओंका अस्तित्व रखने
@maheshswami4353
@maheshswami4353 6 ай бұрын
इथच मराठी माणूस कमी पडतो ऐकी नाही .
@eknathshelat7582
@eknathshelat7582 4 ай бұрын
आता तरी सगळेच मराठे राज ठाकरे यांच्या बाजूने कुठे उभे आहेत
@sukhdevpansare8977
@sukhdevpansare8977 9 ай бұрын
पुराव्यासह खरा इतिहास जनतेस माहित होत आहे . हे फार महत्वाचे . आपले धन्यवाद .
@balkrushnakadam4863
@balkrushnakadam4863 3 ай бұрын
भोसले सर आपणास खुप खुप धन्यवाद. जय भवानी जय शिवराय आणि जय हो हिंदवी स्वराज्य.
@Varhadipunekar26
@Varhadipunekar26 8 ай бұрын
महापराक्रमी असला तरी शाहिस्तेखान ला भेटून फितुरी नव्हती करायची कावजी यांनी
@vkarale46
@vkarale46 9 ай бұрын
अंगावर काटा येतो स्वराज्याचा राजाचा आणि निष्ठावंत मावळ्यांचा इतिहास ऐकताना,मुजरा राजं 🙏
@appasahebkale7293
@appasahebkale7293 8 ай бұрын
L
@mr.trustworthy
@mr.trustworthy 9 ай бұрын
गद्दारीला माफी नाही. मग कोणीही असो: जावळीचे मोरे, संभाजी कवाजी की अनाजी पंत
@user-96k
@user-96k 9 ай бұрын
रागा रागात निघून गेले.. गद्दार नाही झाले पण शक्यता नाकारता येत नव्हती.. स्वराज्याचे डावपेच जवळच्या व्यक्तींकडे असतात... स्वराज्यापुढे कुणीही नाही.
@Social77
@Social77 9 ай бұрын
अथवा शिर्के
@SHAMRAO408
@SHAMRAO408 9 ай бұрын
कावजी महाराजांच्या सेनेत होते. ते महाराजांना सोडून मुघलांना जाऊन भेटले. म्हणुन त्यांना आपण गद्दार म्हणु शकतो. पण मोरे जावळीचे राजे होते. ते महाराजांच्या स्वराज्यात कधीच नव्हते. त्यामुळे मोरे गद्दार होते म्हणने चुकीचे आहे. संपूर्ण जावळी महाराजांच्या ताब्यात येण्यापूर्वी कित्येक वर्षे आधी मोरे यांची होती. मोरे घराण्याचा इतिहास जाणीवपुर्वक इतिहासातून वगळला गेला किंवा लिहिला गेला नाही. आणि लिहिला गेलाय तोही नकारात्मक. आजही आपण आपली मालकी हक्क असलेली मालमत्ता किंवा गावाकडे शेताच्या बांधावरून भांडताना बघतो. इतिहासपण हाच आहे. मोरे जावळी द्यायला तयार नव्हते म्हणून महाराजांनी जावळी लढाई करून जिंकली.
@abc39722
@abc39722 9 ай бұрын
​@@user-96k ती गद्दारीच होती भाऊ. महावीर संभाजी कावजी खाल्ल्या भाकरीला विसरले स्वतःच्या वैयक्तिक नात्यांसाठी हेच खरे आहे. ऐकायला वाईट वाटते, अर्थात.
@padmanabha6832
@padmanabha6832 9 ай бұрын
संभाजी कावजी यांचे व्यक्तीमत्व आणि योगदान, तसेच इतर माहिती आम्हाला मिळाल्या मुळे भोसले सरांचे खुप खुप धन्यवाद... 🙏🙏
@sonaienglish8323
@sonaienglish8323 8 күн бұрын
सर मी एक शिक्षक असून आपण दिलेली माहिती आम्हास खरोखरच नवीन आहे तशीच आमच्यासाठी उपयुक्त आहे आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा
@naturepic2111
@naturepic2111 7 күн бұрын
आज सुध्दा शिवरायाच्या ही विचार आचरणात आणणे आवश्यक आहे.
@ShivKumar-lq7sr
@ShivKumar-lq7sr 9 ай бұрын
👃🏾 धन्यवाद सर. कुसंगतीचा परिणाम. बुऱ्हाणपूरला जाऊन जे दुसऱ्या सत्तेत सामील झाले ते कावजी यांचे मित्र होते. त्यांनीच कावजिंचे कान भरले असतील. मोगल सैन्यात लक्षावधी राजपूत सैनिक होते. शिवराय काय अचाट धीर स्थिर बुद्धीचे होते हे हया वरून लक्षात येते.
@lokeshfule7113
@lokeshfule7113 9 ай бұрын
संभाजी कावजी या पराक्रमी शूरविरास मानाचा मुजरा . इतिहासातील माहिती चे नवे पान आहे . धन्यवाद .
@narayanghuge3751
@narayanghuge3751 9 ай бұрын
संभाजी कावजी, संताजी घोरपडे यांच्या सारख्या महापराक्रर्मी वीरांना नियतीने शेवटी अन्यायच केला याचे अतिशय दुख वाटते.
@TheMahesh1234
@TheMahesh1234 9 ай бұрын
आणि रायगड बांधणारे हिरोजी इंदुलकर यांचा सुद्धा.....
@nikscskpremi
@nikscskpremi 9 ай бұрын
​@@TheMahesh1234 हिरोजी इंदुलकर काय झाले होते 🙄
@Sairamkrishnahari
@Sairamkrishnahari 9 ай бұрын
राजकारण बाकी काय महाराज ग्रेट होते पण तिथे सुद्धा चमचे होतेच
@madhukarmalode7742
@madhukarmalode7742 4 ай бұрын
गद्दाराला माफी नाही. 👍
@PrajaktaDhawale-h2d
@PrajaktaDhawale-h2d 3 ай бұрын
Maharaj durdrishti hote tyanni kunavr annyay nhi kela
@snehalatalele6939
@snehalatalele6939 4 ай бұрын
😊Kavagini जर मित्राचे eykale नसते तर आज आपण त्यांना खूप मानले असते.
@tejasdalavi1993
@tejasdalavi1993 2 ай бұрын
गद्दारी नंतर स्वतःच्या पराक्रमा ची किंमत शून्य होते,,,राजांच्या पुढे पर्याय नव्हता,,,फक्त रयते साठी आणि स्वराज्यासाठी मग तो कोणीही असो,,,शिक्षा दिलीच पाहिजे
@kirankulkarni318
@kirankulkarni318 9 ай бұрын
सर हा धगधगता इतिहास अगदी जिवंत करून डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा केलात त्याबद्दल खूप धन्यवाद 🌹🚩
@bhausahebchitrak4369
@bhausahebchitrak4369 9 ай бұрын
मला पहिल्याच वेळेस हा इतिहास माहीत झाला तुमच्या मुळे याच्या आगोदर माझ्या वाचनात सुद्धा आला नव्हता छान माहिती 🙏
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 9 ай бұрын
शिवाजी राजांच्या काळात गद्दरीला माफी नव्हती मग तो स्वतः चा मेहुणा का असेना,नियम तो नियम.पण तरीही अश्या पराक्रमी विराचा हा दुर्दैव अंत ऐकून मनाला वाईट वाटलं.
@vijaypatil2913
@vijaypatil2913 23 күн бұрын
खरं तर वीर संभाजी कावजी यांचं व्यक्तिमत्व आज समजलं. धन्यवाद सर. मला असंही वाटतं की, ज्यावेळी संभाजी कावजी यांना संपवण्यासाठी महाराजांनी आदेश दिला असेल त्यावेळी त्यांच्या मनाला खूप यातना झाल्या असतील. पण स्वराज्यासाठी ते आवश्यक होते. भोसले सरांनी जी अमूल्य अशी माहिती दिली त्यातून खूप ज्ञान मिळाले व मिळत रहावे. आणि खरच माणूस जरी चुकला तरी त्याचे कर्तुत्व महान व अविस्मरणीय आहे. जय शिवराय जय संभाजी कावजी.
@TheShashin
@TheShashin Ай бұрын
विलक्षण थरारक अनुभव. मी काही ऐतिहासिक प्रसंगनिष्ठ गीत रचना केल्या आहेत. आपली भेट झाली तर त्या रचना आपल्या निदर्शनास आणता येतील.
@ajaykulkarni5977
@ajaykulkarni5977 9 ай бұрын
हि माहिती ( इतिहास) शाळेत फारसा खोलात जाऊन शिकवला जात नाही.आपण फारच मोलाची अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद अशीच माहिती कायम नवीन रूपात समोर. आणत चला.❤❤❤❤❤❤
@bhagyatasane1597
@bhagyatasane1597 8 ай бұрын
आपल्याला मुघलांचाच इतिहास आणि गुणगान शिकवले गेले. कॉंग्रेसचे कारस्थान
@sudeshbhagat1976
@sudeshbhagat1976 8 ай бұрын
Shalet tevde lecture milt nahi...itr vishyana vel detat...tyt itr activities suddha ahet so ichha asun pn possible hot nahi hi khant aahe...krn Aaj kalche parents lagech complaint gheun yetat syllabus complete nahi
@shirishsawant7694
@shirishsawant7694 9 ай бұрын
कावजींचा महाप्रताप आपल्याकडून ऐकल्यावर स्फुरण चढले ... फार फार आवडले ... ❤
@laxmanmhatre6263
@laxmanmhatre6263 9 ай бұрын
धन्यवाद सर , शीव राया सारखे या जगात विचार करनारे फारच कमी लोक या जगात जन्माला आली शिव रायला त्रीवार नही तर हजारवार मुजरा आणि त्यांची जबाबदारी संभलनारे त्यांचे मावळे जगाच्या शिखरावर कोणी नाही त्यानाही हज्रवार मुजरा.जय हिंद जय अखंड हिन्दुस्तानी जय भारत .जय शिवराय जय महाराष्ट्र.
@vasantnichat3558
@vasantnichat3558 7 ай бұрын
संभाजी कावजी असे का वागले याचे दुःख वाटते प्रलोभनाला भुलले दुर्दैव म्राठेशाचे
@ganeshkamble5755
@ganeshkamble5755 11 күн бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@sandeepmahajan6331
@sandeepmahajan6331 9 ай бұрын
छत्रपती म्हणजे अद्वितीय व्यक्तीमत्व, दूरदृष्टी असलेले अचाट बुद्धीमत्तेचे स्वराज्याचे महाराज !
@kailasdhole3116
@kailasdhole3116 9 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांची शिस्त अत्यंत कडक होती.जसे आताचे कडक कायदेच.ते मोडणाराची गय कधी त्यांनी केली नाही.मग त्यांचे पुत्र संभाजी राजे असोत किंवा इतर कोणी असोत.चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भोसले सर 🙏
@PrajaktaDhawale-h2d
@PrajaktaDhawale-h2d 3 ай бұрын
Chatrpati shivaji maharaj mhna dada
@kailasdhole3116
@kailasdhole3116 3 ай бұрын
@@PrajaktaDhawale-h2d ok
@saheb7203
@saheb7203 9 ай бұрын
"दुर्बूध्दी ते मना कदा न उपजै नारायणा " स्वकियांची दूर्बूध्दी, स्वराज्याची दुर्दशा घडली. . माफी असावी शिवाजी राजं ..
@atmanpadale
@atmanpadale 9 ай бұрын
अगदी बरोबर. महाराजांना मुघलांपेक्षा आपल्या कट्टर हिंदू लोकांनीच ज्यास्त त्रास दिला. उदहारण कृष्णा भास्कर कुलकर्णी, राज्याभिषेक करण्यास नकार देणे इत्यादी अनेक गोष्टी आहेत ते थेट संभू राजेंना पकडून देणे.
@copyninja1756
@copyninja1756 5 ай бұрын
​@@atmanpadalegagabhat he hi maharashtriya ch brahmnin hote... ani gelya 1675 chya agodar chya 200 varshamadhe hindu rajyabhishek zala navta tyamule konala tyache mantra mahit nasavet... Aso, Shivrayanna sagale lok chalayche... tumhalach eka jaticha tras hoto
@sanjivanikadlag536
@sanjivanikadlag536 Ай бұрын
मुलुंड पूर्वेला संभाजी कावजी कोंढाळकर नावाचे एक सुंदर उद्यान आहे ते पाहिल्यावर यांच्या बद्दल इतिहास जाणून घेण्याची खूप इच्छा होती. ती आपल्या माहिती मुळे पूर्ण झाली.
@vikasrajeshirke643
@vikasrajeshirke643 6 ай бұрын
सर संभाजी कावजी साठी महाराजांनी प्रतापराव गुजर यानाच का निवडले या बद्दल काही सांगू शकाल का ?
@anilpardeshi5658
@anilpardeshi5658 9 ай бұрын
खुप धन्यवाद! आपले असेच इतिहासाची पाने उघडुन सर्व हिंदुं पर्यंत पोहचली पाहिजे.. जय शिवराय,जय हिंद🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र!
@aadeshkulkarni6896
@aadeshkulkarni6896 9 ай бұрын
खूप छान माहिती, नेहमी प्रमाणे आपण सांगत असलेली माहिती प्रत्यक्ष डोळ्या समोर अनुभवत होतो ❤
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 9 ай бұрын
*⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇* *_" जय मराठा "_* *_" जय मराठी "_* *_" जय महाराष्ट्र "_* *_"" जय छ्त्रपती शिवराय ""_* 🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏
@satishgurav7884
@satishgurav7884 4 күн бұрын
सर अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही अशा अपरिचित माहिती पासून दुर्लभ आहोत तुमची सांगण्याची कला शिवकालात घेऊन जाती खरोखर सर शतशः आभार व धन्यवाद
@GajananKarve
@GajananKarve 8 ай бұрын
संभाजी कावजी आमचेच होते, का गेले असतील ते शाईस्ते खानाकडे काय झाले असेल त्यावेळी महाराजांनी कावजींना माफ केले पाहिजे होते कावजी महाराजांकडे परत यायला हवे होते ही कावजींची कथा ऐकून मन विशिन्न होते. शेवटी महाराजांना स्वराज्यासाठी मनावर दगड ठेवून कावजीं बाबत निर्णय घ्यावा लागला असेल एवढे निश्चित.
@bitcoincryptocurrency4600
@bitcoincryptocurrency4600 7 ай бұрын
फितूर झालेला लोकांना मरणारा एकमेव राजा
@digambarsutah
@digambarsutah 9 ай бұрын
एका महावीराची दुर्दैवी कहाणी आणि शेवट
@sopanbhong8625
@sopanbhong8625 9 ай бұрын
प्रवीण भोसले सर, आपण अतिशय मुद्देसूद व सखोल पुराव्यानिशी बोलतात हे पाहून खूप समाधान वाटले. 🎉
@BharatvikramsachaukadeBharatvi
@BharatvikramsachaukadeBharatvi 23 күн бұрын
साहेब येवढ्या बलदंड संभाजी ,कावजी... लां... मग..कशे ठार केले ते सविस्तर..सांगता..का
@Abhijeet..._patil..___--_-_01
@Abhijeet..._patil..___--_-_01 4 ай бұрын
11:10 येथून सुरू होत आहे खरे कारण 👆
@rajendrajain6194
@rajendrajain6194 9 ай бұрын
सत्य, वस्तुनिष्ठ, इतिहास मिलने दुर्मिल pan aapale ऐतिहासिक संशोधन अनुकरणीय आहे जय हिन्द धन्यवाद जय हो
@drawartsketchwidanushka
@drawartsketchwidanushka 9 ай бұрын
आपण अतिशय विस्तृत माहिती दिल्याबद्दल आपले आभार 💗💓💖💝👌👌👌👌👍👍👍👍
@shravanthombre3542
@shravanthombre3542 9 ай бұрын
Best
@ramdaschavan1349
@ramdaschavan1349 9 ай бұрын
अतिशय दुर्मिळ माहिती
@akralvikral4725
@akralvikral4725 9 ай бұрын
उत्कृष्ट इतिहास दर्शन. धन्यवाद महोदय. संभाजी कावजी महाराजांचे अंगरक्षक असूनही नंतर ते शाहिस्तेखानाला मिळाले ह्यावर विश्वास बसत नाही. काय हे स्वराज्याचे दुर्दैव. महाराजांचे किती स्वकिय त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या काळात उभे ठाकले यावर एक ध्वनीफित बनवाल का महोदय.. मला कोणालाही सर म्हणायचा तिटकारा आहे म्हणून महोदय उल्लेख आदरपूर्वक केला आहे.. धन्यवाद.
@omkargavhale9583
@omkargavhale9583 9 ай бұрын
मंग दादा म्हण काका म्हण हे महोदय काय तू फडण20 चा नातेवाईक आहे का 😂
@AryanGaneshPawar
@AryanGaneshPawar 7 ай бұрын
सर ही माहिती आपण कोणत्या कादंबरी मधुन बघीतली माहित नाही पण मला पण वाचवीशी वाटते क्रुपा करून कादंबरीचं नाव सुचवले तर बर होईल मला ईतिहास वाचण्याची खुप आवड आहे
@vikasdhondge325
@vikasdhondge325 7 ай бұрын
​@@AryanGaneshPawar बखर मधील आहे
@PrakashBait-y9m
@PrakashBait-y9m 10 күн бұрын
सुंदर इतिहास माहिती कधीही न. मिळणारी आपण दिलात सर धन्यवाद.
@rohitbhosikar6753
@rohitbhosikar6753 8 күн бұрын
माहिती एकतानाच अंगावर काटा येतो. प्रत्यक्षात त्या काळी काय व कसे घडले असेल? इयत्ता ४ थी मध्ये असताना पासून पाठ्यपुस्तकातील धडे ते आजपर्यंत मला शिवकालीन इतिहास वेळोवेळी आश्चर्यचकीत करणारा आहे.
@puranlalgauatm3542
@puranlalgauatm3542 9 ай бұрын
गद्धाराला शिवराया कड़े माफी नव्हती, गद्धार तो गद्धार
@sambhajipimpaldare8743
@sambhajipimpaldare8743 9 ай бұрын
सर धन्यवाद कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचा हार्दिक वाटे देवा खरोखरच मावळ्यांच्या रूपाने देवांनिच अवतार घेऊन मोलाची कामगिरी करुन समाजावर अनंत उपकार केले आहेत त्यांचं शौर्य धाडस ऐकुन रक्त सळ सळ करत सर धन्यवाद
@mayurijadhav-if9bx
@mayurijadhav-if9bx 9 ай бұрын
आपुलिया हिता जो असे जागता। धन्य मातापिता तयाचिया। कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक। तयाचा हरिख वाटे देवा। गीता भागवत करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे। तुका म्हणे मज घडो त्याची सेवा। तरी माझ्या दैवा पार नाही॥🚩🙏
@narayan...mirjulkar9177
@narayan...mirjulkar9177 9 ай бұрын
दुर्लभ माहीती
@sanjayjagtap2560
@sanjayjagtap2560 9 ай бұрын
जय हरी माऊली...🙏​
@anilmatere7069
@anilmatere7069 Ай бұрын
फार छान माहीती,प्रभावी पणे सांगितली. फार फार आभार सर🙏🌹
@maheshtryambake1783
@maheshtryambake1783 11 күн бұрын
महाराजांसोबत शामियान्यात कोण गेले होते अफजल खानसोबत त्याचा वकील होता
@bvkarande8968
@bvkarande8968 8 ай бұрын
श्री संभाजी कावजी यांचा अंत दुर्दैवी आहे कारण अफजलखान मोहिमेमध्ये केलेली कामगिरी आज सुद्धा जिवंत..
@diliplambure8433
@diliplambure8433 9 ай бұрын
अतिशय रोचक असा इतिहास आहे आपल्या महाराजांचा... 🙏🏻जय भवानी, जय शिवराय🙏🏻
@MaheshVasudev-f9j
@MaheshVasudev-f9j 9 ай бұрын
अतिशय विस्तृत माहिती दिली सर आपले शतशः आभार जय शिवराय...
@ashokmehendale794
@ashokmehendale794 9 ай бұрын
वीर संभाजी कावजी यांच्याबद्दलची इतंभुत माहिती आपण पुढे आणलीत, ही इतिहासात झालेली एक मोठी प्रगती आहे. धन्यवाद!
@SanjayRaut-z6y
@SanjayRaut-z6y 8 ай бұрын
Mi. Sanjay. M. Raut. At. Wadhavan. Did. Palghar. Tumi. Sanbhaji. Kavj. Hyancha. Itihasfarchsundar. Padhatine. Sangitlya. Bhadhal. Dhanyavaad. Jay. Hindjay. Maharashatr❤
@HyundaiVerna1542
@HyundaiVerna1542 12 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे ❤ ब्रिगेड वाले खूप बदनामी करतात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास स्वामीं याच्या गुरू शिष्य संधर्भात तर यावर सर्व माहिती द्यावी❤
@SBG198
@SBG198 9 ай бұрын
संभाजी कावजी यांचे कार्य मोठे आहे..अभिमानास्पद..पण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात दगाबाजीला किती कडल शासन व्यवस्था होती याचा प्रत्यय ही येतो. फार सुंदर माहिती सर.
@dadasahebkote6067
@dadasahebkote6067 Ай бұрын
सर , आपला इतिहासाचा अभ्यास आणि प्रत्येक घटनांचे चिंतन खूपच आवडले.
@sureshchandrapendurkar1118
@sureshchandrapendurkar1118 2 ай бұрын
संभाजी कावजी या महा पराक्रमी वीरा बद्दलची माहिती मलाही नविन आहे. अफझलखानाचा वध शिवरायांनी केला असेच आता पर्यंत वाचत आलो होतो.आपण सांगितलेला ईतिहास अचंबित करणारा आहे. धन्यवाद.
@zimmujiambilduke7687
@zimmujiambilduke7687 2 ай бұрын
संभाजी कावजी यांना १०० पैकी अफजलखान वधास ७५ गुण तर शायीस्तेखानास मिळाल्यामुळे -२५ गुण
@pranaymore2377
@pranaymore2377 8 ай бұрын
Plz visaji murambak baddal sanga karan tepan afzal khancha takdiche n maharajani afzal la bhetnya agodar tyacha sobat talim keli hoti
@nitingaikar5025
@nitingaikar5025 9 ай бұрын
एकदम जबरदस्त एकच राजे छत्रपती माझे शिवचरित्र कायम सर्वांनी वाचावे ऐकावे जीवन कसे जगावे आणि मरावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासमुळे कळते नवीन पिढी खरोखर चांगली घडवायची असेल तर 100%शिवचरित्राशिवाय पर्याय नाहीच माझे तर पाहिले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजजच आहे जय शिवाजी जय संभाजी जय जिजाऊ जय तुळजा भवानी जय जय जय जय जय जय महाराष्ट्र
@vrishaliaatnure8004
@vrishaliaatnure8004 2 ай бұрын
भोसले सर तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हा सर्व भारत देशातील लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्वाचे मावळे कोण होते त्यांचा इतिहास आम्हाला सांगत रहा हीच विनंती
@sudhirgore5239
@sudhirgore5239 9 ай бұрын
संभाजी कावजी कोंढाळकर यांचा पराक्रम आणि अखेर याचे सविस्तर वर्णन भावले.आपल्या स्तुत्य उपक्रमाला सलाम..🎉🎉
@Akkolte
@Akkolte Ай бұрын
महराजांचा खरा इतिहास आपल्या पर्यंत पोहचवला धन्यवाद❤❤❤❤
@tukarammore1689
@tukarammore1689 2 ай бұрын
प्रविण भोसले सर धन्यवाद आपण ,महापराक्रमी संभाजी कावजी यांच्या पराक्रमाबदल माहिती दिलात . सर ,माझा आणखी एक प्रश्न आहे . मी नंतर विचारणखर आहे.
@vilaspatil5323
@vilaspatil5323 Ай бұрын
तुमच्या तोंडून हा इतिहास एकला आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हते . संभाजी कावजी यांनी शिवरायांना सोडण्याची खूप घाई केली. शूर पराक्रमी संभाजी कावजी यांना शतशः नमन
@satishshelke6091
@satishshelke6091 9 ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज कि जय हो 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@kirankokani3690
@kirankokani3690 8 ай бұрын
धन्य ते प्रचंड महाप्रतापी संभाजी कावजी... जय भवानी जय शिवाजी!
@ganeshkarwar1301
@ganeshkarwar1301 7 ай бұрын
संभाजी करवर यांच्या बद्दल माहिती हवी आहे 🙏🏻 जे १० अंगरक्षक होते त्यातील एक आहेस.
@balabhimulhare8480
@balabhimulhare8480 3 ай бұрын
सर तुम्ही जाहीरपणे व्याख्याने दिली पाहिजेत .तुमचे व्याख्यान खूप प्रभावी होईल😊
@narharidudhare5408
@narharidudhare5408 9 ай бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण इतिहास सांगितला.संभाजी कावजीसारखे असंख्य वीर हीच महाराजांची संपत्तीसमान शक्ती! जय शिवराय!
@सह्याद्रीपुत्र-त9ण
@सह्याद्रीपुत्र-त9ण 9 ай бұрын
प्रवीण भोसले साहेब अतिशय उत्तम व्हिडिओ दिला आपण ..... एक विनंती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी की धर्म निरपेक्ष या वर एक सखोल व्हिडिओ बनवा......🙏
@pravinshelar6023
@pravinshelar6023 9 ай бұрын
सासवडचे शूर सरदार गोदाजी राजे जगताप यांचा समावेश आहे, धन्य तो वंश, धन्य ते कुळ जे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे साक्षात रुद्र यांच्या सोबत लढले, सर्व शुरांना माझा त्रिवार मुजरा ।
@ajaylokhande9033
@ajaylokhande9033 6 ай бұрын
शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटकेचा प्रसंग & घटनाक्रम पुराव्यानिशी सांगा
@ramchandrahule482
@ramchandrahule482 4 ай бұрын
निष्ठा काय असते हे शिवरायांच्या शूर वीर मावळ्यांनकडून शिकावे येसाजी कंक, संभाजी कावजी बाजी प्रभू देशपांडे यांच्या सारखे अफाट शक्तीचे नरवीर साथीला होते म्हणून तर शिवराय स्वराज्य निर्माण करू शकले शतशः प्रणाम त्या नरवीरांना आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना !!!
@prabhusonavale2325
@prabhusonavale2325 9 ай бұрын
होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित आहे ❤
@panditindore5970
@panditindore5970 6 ай бұрын
आता पण वाचणार ठाकरे
@avinashbendwar5504
@avinashbendwar5504 9 ай бұрын
खुप छान... इतिहासाचे माहित नसलेले एक अत्यंत महत्वाचे पान आज आपण उलगडले...
@abhijitchougule7316
@abhijitchougule7316 9 ай бұрын
अतिशय सुंदर,सखोल अभ्यास करून दिलेली माहिती आहे.खूप छान आहे,असे अनेक प्रसंग आणि विचार सत्य प्रमाणित आपण प्रसारित करावेत. धन्यवाद❤
@vasudhaathavale3310
@vasudhaathavale3310 9 ай бұрын
महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, देशमुख आणि देशपांडे, पाटील आणि कुलकर्णी ही प्रशासन व्यवस्था समजली. न्याय निवाडा हेच करत असतील असे मी समजतो. काही वेगळी व्यवस्था असेल तर उलगडून सांगावे. तसेच शिवकालीन शिक्षण व्यवस्था, रस्ते आणि इतर सुविधा उभारण्यासाठी काय व्यवस्था होती हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे.
@Ad_iana_nt
@Ad_iana_nt 7 ай бұрын
सर शिवाजी महाराज आणि शंभूराजे बद्दल खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर कोणती पुस्तके वाचली पाहिजेत
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 9 ай бұрын
खूपच छान माहिती. महापराक्रमी आणि स्वामिनिष्ठ योध्दा अविवेकी निर्णयामुळे कसा गमावला हे अत्यंत क्लेशदायक आहे. प्रसंगी असे कटु पण स्वराज्य हिताचे निर्णय घेणे हे महाराजांच्या यशस्वी राजकारणाचे गमक त्यामुळे अधोरेखित होते.
@hemawayare7110
@hemawayare7110 3 ай бұрын
सर हा इतिहास पाहिल्यांदा ऐकला तुमची ईतिहास सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे, जय शिवराय
@umeshkesare5769
@umeshkesare5769 9 ай бұрын
अतिशय सविस्तर व अप्रतिम विश्लेषण सर..🚩🚩
@vikasthorat8515
@vikasthorat8515 2 ай бұрын
Sir, Nitin Bangude Patil hyache vadil mazhe headmaster hote ani tranche kartuvat same tumchya sarakha hote he bonyaas kahi vavgat nahi...... Tumacha vichar ani référence always give me strength in my business .... Nathamastak swiskar Kara mazha!!! Lots of love ❤ from Geneva, Switzerland
@nitindushing4510
@nitindushing4510 8 ай бұрын
रायगड बांधणारया हिरोजी इन्दल्कर यांच्या बद्द्ल कृपया माहिती द्यावी
@sandeeppandit9635
@sandeeppandit9635 24 күн бұрын
असा बराच इतिहास आम्हाला माहीत नाही असाच इतिहास आम्हाला सांगण्यात यावा ही विनंती....दादा.शिवाजी महाराज की जय.जय जिजाऊ जय शिवराय
@anilraoshinde7827
@anilraoshinde7827 8 ай бұрын
खूप महत्त्वाची माहिती मिळाली...एका विराची शोकांतिका मनाचा ठाव घेऊन गेली...आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद👍
@Anna-zw7wb
@Anna-zw7wb 9 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती! असा इतिहास वाचताना अंगावर काटा उभा राहतो! क्षणभर का होईना, आपण इतिहासाचे साक्षीदार होऊन जातो! धन्यवाद 🙏🏻
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 Ай бұрын
खूपच सुंदर विश्लेषण सर, 🙏 जय शिवराय 🚩
@MubhashirDakhave
@MubhashirDakhave 5 ай бұрын
16व्या शतकात काय जाले राजे सर्व स्वतः साठी लढले त्या नंतर 1857 ला ईस्ट इंडिया कंपनी आली त्या वेळी आत्मसन्मान साठी लढला तो क्रांतीवीर मंगल पांडे
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 5 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,6 МЛН
खानावरील शिवरायांच्या झडपेचा मार्ग यांनी मोकळा केला!
22:23
नकली बायका करुन रचलेला गुप्त, मर्मभेदी, धाडसी डाव!
22:05
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 124 М.
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН