Pune Ganpati|Pune Manache Ganpati | 2019 Ganpati |Dagdusheth Ganpati | Kasba Ganpati|Dholpathak 2k19

  Рет қаралды 25,526

Mandar Shishupal

Mandar Shishupal

Күн бұрын

पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहा साजरा केला जातो कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही गणपती लोकप्रिय होते. तेच हे मानाचे गणपती आहेत. पुण्यातील भव्यदिव्य विसर्जन मिरवणूकीत या पाच मानाच्या गणपतींचा आधी मान असतो. म्हणजे हे मानाचे गणपती पुढे गेल्यावरच मग बाकीची मंडळे त्यांचे गणपती लाईनमध्ये आणतात. जाणून घेऊया या पाच मानाच्या गणपतींबद्दल.
मानाचा पहिला गणपती - श्री कसबा गणपती
kasba-ganpatis-
कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे; अशी आख्यायीका आहे. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ साली सुरुवात झाली. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो. (हे पण बघा : सर्वांच्या लाडक्या गणेशाची म्हणजेच बाप्पाची ही १०८ नावे)
मानाचा दुसरा गणपती - श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
Tambadi_Jogeshwari
श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता. म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झाल आहे. कसबा गणपतीप्रमाणं या गणेशोत्सवालाही १८९३ पासून प्रारंभ झाला. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. आणि इथंच चार युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात. या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं. त्यानंतर नवीन मूतीर्ची स्थापना करण्यात येते. (हे पण बघा : मुंबईतील नवसाचा लालबागच्या राजाचा इतिहास)
मानाचा तिसरा गणपती - श्री गुरुजी तालीम गणपती
GURUJI-TALIM-GANPATI-Pune-wallpapers-images-photo
गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या गणेशोत्सवाला १८८७ मधेच सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. (हे पण बघा : महाराष्ट्रातील अष्टविनायकांची मानाची रूपे)
मानाचा चौथा गणपती - श्री तुळशीबाग गणपती
tulsibaug
पुण्यातला मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबागेतला गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षित तुलशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात केली. तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात.
मानाचा पाचवा गणपती - श्री केसरी गणपती
Kesari-Wada-Lord-Ganesha
पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती आहे केसरी गणपती. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. पण १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. १९९८ मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली
.
.
.
Download the song
www.mediafire.c...

Пікірлер: 21
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 79 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
DaMus
Рет қаралды 4,7 МЛН
Monsoon Madness: Jivdhan Fort Trek Adventure
7:55
Hindphira vlogger
Рет қаралды 123
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 79 МЛН