Рет қаралды 29,661
श्री क्षेत्र कुरवपूर हे कर्नाटकातील आणि आंध्र राज्यांच्या सीमा भागात ज्या ठिकाणी कृष्णा-भीमा नद्यांचा संगम झाला त्या रायचूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या बेटावर असलेले पाण्याने वेढलेले तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी श्रीपाद वल्लभांनी 14 वर्षे वास्तव्य केले. याच तीर्थक्षेत्री श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांना 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या मंत्राचा साक्षात्कार झाला. इथे टेंबे स्वामींची गुहा आहे.