Рет қаралды 60,729
आमच्या चॅनल ला आपण दान देऊ शकता ,या चॅनल वर ads बंद आहे 🙏🙏
GOOGLE PAY : 7038205363
You can contribute to our channel :
GOOGLE PAY : 7038205363
१३१.
राष्ट्र जगावा, राष्ट्र जागवा; जागृत व्हा तरुणांनो ! अमुच्या ।
वीर वृत्तिचा दिवा उजळवा,जागृत व्हा तरुणांनो ! अमुच्या 0 ।।
धर्मनीति ही दलित दलापरि, भारतभूची झाली ।
भक्तिमुक्तिचे सोंग वाढले, दुर्बलता करि आली ।अमुच्या0 ।।
तत्वज्ञान हे विसरुनि गेले, रुढिस मान मिळाला ।
जिकडे तिकडे पंथ-मतांतर, गोंधळ हा घरि आला ।अमुच्या0।।
सुळसुळाट हा साधुजनांचा, पोट भराया झाला ।
यथार्थ कोणी सांगि न कोणा,भ्याडपणा उरि आला । अमच्या 0।।
सत्य भक्तिचे विसरुनि पथ हे, पोकळ भाव निघाला ।
देवावरती वाहि फुले परि, पाणि न दे गरिबाला । अमुच्या 0।।
तुकड्यादास म्हणे ही कहाणी, सांगा हो ! जनतेला ।
नाहि तरी मरणेच बरे हे, भुत परका घरि आला । अमुच्या 0।।
१३२.
शिरडीत बंधु माझा, म्हणे आडकोजी ।
दुजा भाऊ शेगावात नांदतो, अजी ।।
तिज़ा ताजुह्यून अमुचा ,मित्र जिव-भाव साचा ।
मुंगसाजी बंधू चवथा, आमच्या भुजी ! ।।
साईखेडचा ही दादा, अमुचाची बंधुराजा ।
खटेश्वराची हि माझी, संगती गुजी ।।
मायबाई माता माझी, सर्वांभूती पान्हा पाजी ।
म्हणे दास तुकड्या याची, भक्ति ना दुजी ।।
१३३.
मंडळींनो ! लाजू नका पुढ जायला ।।
नका विचारु हाशी- खुशी ।
बोलू नका हो कोणापाशी ।
राहता का अजुनिया तशी ?
रानाळ, भूताळ म्हणती कशी !
शेतकऱ्यांची आली वेळा ।।
वेडा - गबाळ संबोधिती ।
हसुनी हिणवित अपमानिती ।
गरिबांवरि करी मौजा किती ।
कष्टाचे पैसे लुबाडिती ।
निसर्गाने आता भाव आला ।।
मंत्र समजला समानतेचा ।
तुटला फासा खुळेपणाचा ।
छंद धरा रे सत् - कार्यांचा ।
शिका पाठ हा मानवतेचा ।
तुकड्या म्हणे आनंद झाला ।।
१३५.
मनी बोधवितो, सुख शोधवितो । ध्वनी मंजुळ गुरुदेवाचा ।
घे ठाव अखिल हृदयाचा ।।
निर्मल ही प्रार्थना-अर्थना । होत जीवा सुखदायी ।
अनेक देवा एक करोनी । भ्रम हा नाशी मनाचा ।। घे ठाव0।।
समुदायाला स्थीर करोनी । चित्त मोहवी त्यांचे ।
पतंग जैसा ज्योति झडप घे । दिसे भाव जनतेचा ।। घे ठाव0।।
एक स्वराने गाती-नमविती, शीर नप्र-भावाने ।
वाटे भू-वैकुंठ योजिले । स्वर्ग गमे जीवनाचा ।। घे ठाव0।।
सर्व अम्ही सर्वांकरिता ही । ज्ञानज्योति दे हाती ।
तुकड्यादास म्हणे मी रंगलो । घेऊनी पाठ तयाचा।। घे ठाव0।।