Рет қаралды 1,810
श्री साईबाबा महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” रॅलीचे आयोजन
श्री साईबाबा संस्थानचे श्री साईबाबा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय शिर्डी आणि भारत सरकार सुचना एवं प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, अहमदनगर क्षेत्रीय येथील राष्ट्रीय यांचे संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगतसिंग,राजगुरू, चंद्रशेखर आझाद,डॉ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी, पंडीत नेहरूलोकमान्य टिळक,भारत माता आणि मौलाना आझाद यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी रॅली मध्ये सहभाग घेतला.या रॅलीचे उद्घाटन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन प्रसंगी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचारी यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी केंद्रीय संचार ब्यूरो, अहमदनगर येथील माधव जायभाये, पी.शिवकुमार , प्राचार्य विकास शिवगजे,गंगाधर वरघुडे ,सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.@SaibabaCollegeShirdi