वाः सुस्मिरता! रेशमाच्या स्पर्शासारखा तुझा आवाज कानाला सुखावून गेला!! इतक्या सहज-सुंदर गायकीने, माणिकताई वर्मा (दादरकर) यांच्या शास्त्रीय गायनाची आठवण झाली. अशीच गात रहा आणि पूर्ण ख्याल गायनाचे अधिक अधिक व्हिडिओ येथे लोड कर( आता फक्त १-१/२ आहेत). तुला , गुरू देवकी पंडित, आणि पर्यायाने, पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या, गाण्याची भेट मिळालेली आहे आणि त्यात ईश्वरदत्त आवाजातील दोघांची कमतरता तुझ्यात नाही. त्याचा पुरेपूर फायदा उठव.शुभाशीर्वाद!