Rape cases theme dance / महिला सक्षमीकरण / सरस्वती विद्यालय वासिंद

  Рет қаралды 210

SHYAM SHELAR

SHYAM SHELAR

Күн бұрын

दिनांक 26/12/2024 रोजी सरस्वती विद्यालय वासिंद (माध्यमिक गट) समूह नृत्य स्पर्धेत 10 वी ब च्या वर्गाने महिला सक्षमीकरण या विषयावर सादर केलेल्या performance ने द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल वर्गशिक्षक श्री श्याम शेलार सर, choreographer कु विराज गोते सर व सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन💐💐🎉🎉🎊🎊🚩🚩
सहभागी विद्यार्थी:-
1. मिताली ठाकरे
2. मनाली ठाकरे
3. मनस्वी माने
4. प्राची पाटील
5. स्मरणिका भोईर
6. पलक पाटील
7. गायत्री चव्हाण
8. गुंजन राऊत
9. शर्वरी कारंडे
10. प्रिया साबळे
11. स्नेहा आगिवले
12. जीत पाटील
13. ओम् शेलार
14. कस्तुभ शेलार
15. कुणाल तरे
Choreographer - कु विराज गोते
गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. प्रत्यक्षात सरकारी आणि सामाजिक संस्थांनी स्त्री अत्याचाराची जी आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे, ती पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष नोंद होणाऱ्या तक्रारीवरून दिली आहे. परंतु नोंद होणाऱ्या घटनांपेक्षाही अनेक कारणांमुळे अंधारात राहणाऱ्या घटनांची संख्या जास्त आहे. स्त्रियांवरील अन्याय/अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहेच, परंतु त्याबरोबरच आवश्यक आहे ती जनजागृती. स्त्रियां/मुलींना मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि शाळा, कॉलेज, स्वयंसेवी संस्था यांनी प्रयत्न करून हे उपक्रम राबवले पाहिजेत. आजकाल प्रेम प्रकरणांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता मुलगा आणि मुलगी या दोघांचेही समुपदेशन करण्याची गरज आहे. प्रेम करणे ही वाईट गोष्ट नाही. परंतु प्रेमाच्या नावाखाली अश्लीलतेचा जो नंगानाच चालू असतो, तो फार भयंकर आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी यात फारच आघाडीवर आहेत. अनेक तरुणांची जी प्रेम प्रकरणे चालू आहेत, ते आपल्या जोडीदाराबरोबर निर्जन स्थळी जाऊन अश्लील चाळे करतात (अपवाद आहेत.) हे निश्चितच सामाजिक हिताचे लक्षण नाही. प्रेम ही उदात्त भावना बाजूलाच राहते आणि वासनेचा बाजार सुरू होतो. अशा घटनांमध्ये बहुतांशी वेळा मुलीच बळी ठरतात. महिलांना आजच्या युगात दिले जाणारे स्थान हे खालच्या पातळीचे आहे. परंतु आता सरकारने केलेले कायदे हे फार महत्त्वाची भूमिका पार पडत आहेत . महिलांना दिले जाणारे स्थान आता हल्लीच्या काळात बदलत जात आहे. परंतु हा बदल होत असताना असे जाणवते की, खरच हा बदल होतो आहे का? कारण आपण प्रत्येकजण म्हणतो की, स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार दिले गेले पाहिजेत. त्यांचे हक्क प्रदान केले पाहिजेत. पण खरे पाहिले असता पुरुषप्रधान संस्कृतीत मात्र महिलांना दुय्यमच स्थान आजही दिले जात असलेले दिसून येते. आजही अनेक ठिकाणी मुलगी जन्मास आली की, तिला घरातुनच वागणूक व्यवस्थित मिळत नसल्याचे दिसते. हीच स्त्री आज पुरुषाच्या खांद्यास खांदा लाऊन प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तुत्व सिद्ध करीत असतानाही तिला आजही पुरुषी अंहमपनाचा सामना करावा लागतोय.आजही काही क्षेत्रात महिलाना दुय्यम स्थान दिले जाते. आता सर्व बंद आहे, पण आपल्या आईला, ताईला आणि बायकोला सर्व काही कामापासून सुटका नाही. आजही काही ठिकाणी महिलांना अत्याचार सहन करावा लागतो आहे. परंतु पुरुष हे कधी स्त्रीयांवर होणारा अन्याय बंद करतील. काही मुलिंना कसे कपडे परिधान करायचे, या गोष्टी वरून पण बोलताना पहिले आहे.असा म्हणतात स्त्रीयांना आणि पुरुषांना समान हक्क आहे.पण नेहमी स्त्रीयांना दुय्यम हक्क मिळतो. जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते. ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरुवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे.स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व.

Пікірлер
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
Intercaste Lafda | Pranit More | Marathi Stand-Up Comedy | Crowd Work Special
1:00:58