Рет қаралды 34,666
Ravindra Waikar यांच्या मेहुण्याचं निवडणूक अधिकाऱ्याशी सेटिंग ? नेमकं काय घडलंय ? | Vishaych Bhari
मंडळी यंदाच्या लोकसभेत सगळ्यात चुरशीचा निकाल लागला तो मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाचा. शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. त्यात कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला. पण हा निकाल उद्धव ठाकरे गटाने अजून ही स्वीकारलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाईची तयारी ठाकरे सेनेने सुरु केली आहे. त्याचवेळी आता या प्रकरणात एक गंभीर ट्वीस्ट आला आहे. त्यावरुनच मोठे वादंग उठल आहे. या प्रकरणात सध्या अतिशय महत्वाची बातमी अशी आहे की रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप आहे. वायकरंच्या मेहुण्याने मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन EVM मशीनला जोडलेला होता. याच मोबाईलवर आलेल्या OTP ने EVM मशीन अनलॉक करण्यात आली होती. 4 जून रोजी नेस्को सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता. पोलिसांनी हा फोन जप्त केला आहे. तो आता न्यायवैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. फोनवरील बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत. या प्रकरणात गुरव आणि पंडीलकर यांना ४१(अ) ची नोटीस बजावली आहे. त्यांना हजर देखील राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. म्हणूनच नेमका काय आहे हा सगळा घोळ, खरचं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे त्याप्रमाणे वायकर यांचा विजय हा मॅनेज आहे का, जिथे कोणालाही मोबाइल वापरण्यास मनाई आहे तिथे वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर हे EVM मशीनला जोडलेला मोबाईल पोल पोर्टर ऑपरेटर सोबत संगनमत करून कसा काय वापरतात. याच मोबाईलवर आलेल्या OTP ने EVM मशीन करण्यात अनलॉक आली होती, इतका गंभीर प्रकार कसा काय घडू शकतो ? यामुळे EVM सोबत छेडछाड केली गेली नसेल याची खात्री काय ? पंडीलकर हे कसे काय हा मोबाइल वापरतात, त्यांची तिथल्या अधिकाऱ्यांसोबत काही सेटिंग आहे का? यासंदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्यामुळे आता याप्रकरणात मंगेश पंडीलकर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे. त्या दोघांना अटक होईल का, नक्की काय गैरप्रकार घडलेला आहे. अमोल कीर्तीकर हे देखील न्यायालयात गेलेले आहेत, न्यायालय काय निर्णय देईल, किर्तीकर यांना खासदारकी परत मिळेल का ? की अपक्ष उमेदवार म्हणतात तसे ही निवडणूकच रद्द करून न्यायालय फेरनिवडणुक घेवू शकत ? या सगळ्याच गोष्टींची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओ मधून करणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#ravindrawaikar
#amolkirtikar
#विषयचभारी
ravindra waikar,ravindra waikar news today,ravindra waikar news,amol kirtikar vs ravindra waikar,ravindra waikar controversy,ravindra waikar son,ravindra waikar speech,ravindra waikar son news,ravindra waikar news live,ravindra waikar latest news,ravindra waikar vs amol kirtikar,ravindra vaikar,ravindra waikar ed,ravindra waikar case,mla | ravindra waikar,ravindra waikar live,ravindra waikar press,ravindra waikar sabha,ravindra waikar video