Рет қаралды 638
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी पुण्यातील सारथी मुख्यालयाच्या नवीन इमारतीची पाहणी केली आणि संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. त्यांनी सारथीच्या यशस्वी कार्याबद्दल समाधान व्यक्त करत, जातीय सलोखा व आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी सारथीसह इतर संस्थांना आवश्यक निधी पुरवला जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर व व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे (IAS) यांनी संस्थेच्या योजनांबद्दल व त्यांच्या यशाबद्दल माहिती दिली. तसेच, लाभार्थ्यांनी सारथीमुळे त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभव शेअर केले. उपमुख्यमंत्र्यांनी सारथी, बार्टी, अमृत, महाज्योती, टार्टी, आर्टी यांसारख्या संस्थांना देखील समाजोपयोगी योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. #SarthiMaharashtra #AjitPawar #SocialHarmony #EconomicEmpowerment #GovernmentSchemes #MaharashtraLeadership #अशोक_काकडे #व्यवस्थापकीय_संचालक #IAS
संकेतस्थळ - sarthi-maharas...
युट्युब चॅनेल - / @sarthipune1789
सारथी ॲप - play.google.co...