Рет қаралды 9,561
सोयाबीन हे महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक. या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनची शेती करणे शेतकऱ्यांना परवडत नाहीये. सोयाबीन पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नसल्याची वास्तविकता आहे.