L*🕉️🌷सुभाषित🌷🕉️* *llगते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत् ।* *lवर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः॥* *भावार्थ :* *निघुन गेलेल्या काळातील घटना आठवुन दुःख करु नये.व भविष्यात काय होईल कसे होईल ? या चिंतेत व्याकुळ होऊ नये.बुध्दीमान लोक नेहमी वर्तमान स्थितीत कार्यमग्न असतात.* *तात्पर्य भुतकाळाच्या ब-या वाईट घटना आठवुन शोक करणे किंवा भविष्याची काळजी करुतृ रहाणे यातुन हाती काही लागत नाही . चालु परिस्थितीत आपल्या वाट्याला आलेले कार्य करत रहाणे उत्तम असते.* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज सांगतात *llहेचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥* *ठेविलें अनंतें तैसें चि राहवें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥* *वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥* *तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥* 🙏रामकृष्ण हरि🙏 सदगुरु स्वामी चरणरज राधेशाम कुलकर्णी [ २५.४.२०२३ पु.श्रीआद्यशंकराचार्य जयंती श्रीरामानुजाचार्य जयंती ]