आता सामान्य माणूस काय म्हणतो, प्रत्येक राजकारण्याला राजकीय महत्त्वाकांक्षा असणे स्वाभाविक आहे. धस असोत, बजरंग सोनवणे असोत, क्षीरसागर असोत किंवा दमानिया बाई, राजकीय महत्त्वाकांक्षा असणे गैर नाही. कोण किती खरा किती खोटा हे ज्याचे त्याने ठरवले पाहिजे. पोलिसांनी तपास करायचा, पुरावे गोळा करून आरोपपत्र तयार करायचे, आणि अंतिम निकालासाठी विषय न्यायसंस्थेत सोपवायचा, ही आपण स्वीकारलेल्या लोकशाहीप्रणालीची कार्यपद्धती आहे. तीन एजन्सी कडून चौकशी होणार, मग मुख्यमंत्री काय चुकीचं करतायत का? मुख्यमंत्री चौकशीत काही कसूर करायला सांगतील वाटत नाही . अशा परिस्थितीत कोणीही गुन्ह्यात अडकलेला वाचेल अशी शक्यता नाही. मग तपास पूर्ण व्हायच्या आधीच झुंडीचे दबावतंत्र वापरून 'याला मोका लावा,' 'याला का वाचवता?' ही विधाने संयुक्तिक नाहीत.