महाराज नमस्कार. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या परा, पश्चंति, मध्यमा आणि वैखरी या चार वाणीं संबंधी आपण सांगितलेला भावार्थ ऐकला. आनंद वाटला. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज हे चारी वाणीं पलीकडे पोहोचलेले महान आत्मानुभवी संत आहेत. त्यामुळे या अभंगातील भावार्थ आमच्या सारख्या मुमुक्षू यांनी लक्षात घेतला आणि त्याचे चिंतन केले तर परमार्थांत अद्याप किती वाटचाल करावी लागेल याची कल्पना येऊ शकेल. जय जय रामकृष्ण हरि.