Рет қаралды 96,379
संत कान्होपात्रा ही मंगळवेढ्याची. तिचा जन्मकाल पंधरावे शतक. ती श्यामा नावाच्या गणिकेची मुलगी. दिसायला अतिशय सुंदर. ती विठ्ठलाची अनन्य भक्त होती. तिची विठ्ठलावर इतकी निष्ठा होती की बिदरच्या बादशहाचे बोलावणे आल्यावर तिने आपल्या प्रख्यात अभंगात म्हटल्याप्रमाणे, ती ह्या संकटातून सुटण्यासाठी आर्ततेने “नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा जाऊ पाहे “ असा विठ्ठलाचा धावा करत असता तिने विनवल्याप्रमाणे विठोबाही “घेई कान्होपात्रेस हृदयात” !
कान्होपात्रेचे तेहतीस अभंग सकल संत गाथेत आहेत. ही एकमेव वारकरी स्त्री संत की जिने कोणताही गुरू केला नाही. एक विठ्ठ्लच तिचा गुरू आणि सर्वस्व होते. तर,अशा संत कान्गोपात्रेची कथा ऐकू या.
Written & Narrated by: Sadashiv Kamatkar
Artwork by: Prashansa Hadkar