Рет қаралды 54,447
#BolBhidu #NamdevMaharajShastri #DhananjayDeshmukh
भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठीशी आहे, असं सांगताना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी आरोपींच्या मानसिकेतेचा विचारही करायला हवा, असं धक्कादायक विधान केलं होतं. शास्त्रींच्या या विधानानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी जोरदार टीका झाली. या विधानावर आक्षेप घेत मृत संतोष देशमुखांच्या कुटुंबाने महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भगवान गडावर जाऊन भेट घेतली. आज आमच्या भावना तुमच्याकडे मांडण्यासाठी आलोय, असं म्हणत धनंजय देशमुखांनी नामदेव शास्त्रींना सर्व पुरावेच दिले.
तसंच आरोपींवर असलेले गुन्हे, संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम, त्यावेळी नेमकी काय स्थिती होती, याबाबतही सर्व माहिती धनंजय देशमुख यांनी महंत नामदेव शास्त्री महाराज यांना दिलीय. त्यावर नामदेव शास्त्रींनी माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढलाय. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, असं म्हणत नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून आलं. नामदेव शास्त्री आधी काय म्हणाले होते, आज देशमुख कुटुंब आणि नामदेव शास्त्री महाराज यांच्यात नेमकी काय चर्चा झाली. नामदेव शास्त्रींनी खरच माघार घेतली का ? हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/