Рет қаралды 57,303
वयाच्या ९० व्या वर्षी सुद्धा भजन, कथावाचन, निरूपणाच्या माध्यमातून सितारामबुवा पाटील (नाऱ्हेण) समाजप्रबोधन करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारचे शालेय शिक्षण घेतले नाही. परंतु परमेश्वराच्या कृपेनेच हे शक्य असून भजनाच्या ज्ञानासाठी शिवरामबुवा वरळीकरांचे आशिर्वाद असल्याचे ते मानतात. त्यांनी ९० वर्षाच्या जीवनप्रवासात अनेक भजनी कलावंतांसोबत जोडभजनाचे कार्यक्रम केले असून आजतागायत तब्बल अकरा हजारहून अधिक भजनाचे कार्यक्रम केले आहेत. सितारामबुवांनी अनेक भक्तीगीतांची रचना केली आहे आणि स्वत: संगीतबद्ध करून गायली आहेत. त्यांच्या 'कलियुगामध्ये न्याय बुडाला' या गीताला विशेष प्रसिद्धी मिळाली. ठाणे-रायगड परीसरात विशेषतः ग्रामीण भागात सेवाभावीवृत्तीने भजन, कथावाचन, निरूपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या सिताराम बुवा पाटील यांच्या या मुलाखतीद्वारे त्यांचा सांगितिक जीवनप्रवास उलगडण्याचा छोटासा प्रयत्न...
#sitarambuwapatil, #sitarambuwapatilnarhenakar
Sitaram Buwa Patil Naren Interview
Sitaram Buwa Patil Bhajan
Sitaram Buwa Patil
Sitaram Buwa
Kaliyugamadhe Nyay Budala Sitaram Buwa Patil Bhajan
Kaliyugamadhe Nyay Budala Sitaram Buwa Patil Abhanga
Sitaram Buwa Patil Interview वयाच्या ९० वर्षी सुद्धा भजन निरूपणांतून समाजप्रबोधन कराणारा भजनी कलावंत