स्वा. सावरकर चरित्र- अंदमान पर्व । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । KirtanVishwa | Veer Savarkar Biography

  Рет қаралды 33,305

KirtanVishwa

KirtanVishwa

3 жыл бұрын

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर चरित्र - अंदमान पर्व
राष्ट्रीय कीर्तन - ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
Veer Savarkar Biography
सेवा वेगळी व काज वेगळे. काज करणे म्हणजे देवाचे कार्य करणे. देवाची जी तीन कामे आहेत ती यथाशक्ती करणे म्हणजे देवाचे काज. चांगल्यांचे संगोपन, दुष्टांना शासन आणि धर्माचे पुनरुत्थान ही तीनही कार्ये सावरकरांनी केली. अंदमानच्या तुरुंगात देशसेवेसाठी सक्त मजुरीची शिक्षा भोगताना त्यांनी सज्जन कैद्यांचे केलेले प्रबोधन, त्यांना छळणाऱ्या इंग्रजाला बसवलेली जरब आणि समाजातील अज्ञानाचे केलेले उच्चाटन, ही कार्ये पाहता सावरकर दास भक्तीतील श्रेष्ठ दास आहेत. याचे गुणगान बुवांनी या कीर्तनामध्ये सादर केले आहे.
Vinayak Damodar Savarkar
Veer Savarkar Charitra
Swatantryaveer Savarkar
Charudatta Aphale Kirtan
Marathi Kirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa #savarkar

Пікірлер: 193
@KirtanVishwa
@KirtanVishwa Жыл бұрын
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@nalinirasal8036
@nalinirasal8036 11 ай бұрын
जय श्रीराम. आपल्या चरणी विनम्र वंदन.आपल्यावाणीचामहिमाकायवर्णावा.खूप
@nalinirasal8036
@nalinirasal8036 11 ай бұрын
शुभेच्छा.
@chandrashekharpathade1324
@chandrashekharpathade1324 3 жыл бұрын
फारच छान!!काही राजकारणी लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांना पळपुटे म्हणून हिणवतात.त्यांना तुम्ही आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समर्पक आणि सडेतोड उत्तर द्यावे, ही प्रार्थना
@rachanapatwardhan6825
@rachanapatwardhan6825 Жыл бұрын
स्वातंत्र्य वीर सावरकर याना कोटि कोटि प्रणाम। आफले महोदय सदा उत्तम सदरिकरण।
@veenakarande3216
@veenakarande3216 Жыл бұрын
आफळेबुवांचं किर्तन सुश्राव्य आहेच. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच चरित्र परतपरत ऐकावं इतकं प्रेरणादायी आहे. धन्यवाद.
@prasadgodambe9769
@prasadgodambe9769 3 жыл бұрын
अत्युत्तम!💐स्वातंत्र्यविरांच्या कार्याचा गौरव असाच गुंजत राहो ही प्रार्थना!💐
@Rohinikulkarnimusic
@Rohinikulkarnimusic 3 жыл бұрын
आफळे बुवांचे कीर्तन श्रवणीय आणि प्रेक्षणीय ही तितकेच,,, श्रोत्यांना गुंगवून ठेवण्याची हातोटी,, जन्मजात कीर्तन धर्म पाळणारे असे आफळे बुवा,, आपल्याला सादर वंदन🙏🏼🙏🏼
@meenaatre7399
@meenaatre7399 3 жыл бұрын
आबालवृद्धांना आवडण्यासारखा कीर्तन हा प्रकार अनेकांपर्यंत पोचवण्याची आपली कळकळ अभिनंदनीय आहे !अनेक शुभेच्छा !
@smitamunje5910
@smitamunje5910 3 жыл бұрын
अप्रतिम किर्तन
@user-dc7bk9nc5q
@user-dc7bk9nc5q 3 жыл бұрын
अतिशय कळकळीने केलेल कीर्तन
@vaishaliharsulkar6618
@vaishaliharsulkar6618 3 жыл бұрын
' सदा देवकाजी झिजे देह ज्याचा... ', गितेतील श्लोक ' परित्राणाय साधुनाम....' याला खऱ्या आयुष्यात उतरविणारे परम आदरणीय स्वातंत्रवीर... किती सुंदर मनात उतरविले...🙏 सेवा व काज यांच्यातील फरक उत्तमरित्या सांगितले... 🙏🙏 वारंवार ऐकत,कितीतरी टिपणं काढता येतील असे अभ्यासपूर्ण व मार्गदर्शक कीर्तनं 🙏🙏
@archanakulkarni3354
@archanakulkarni3354 6 ай бұрын
बुवा तुमच्या समोर नतमस्तक 🙏🏻🙏🏻 🚩 हिंदुत्वाची ध्वजा आपल्या खांद्यावर घेऊन अत्यंत तळमळीने प्रबोधन करत आहात. परमेश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य देवो
@Rohinikulkarnimusic
@Rohinikulkarnimusic 3 жыл бұрын
अनादी मी अनंत मी,, वाहह काय तेजस्वी शब्द👏👏👏👌👌👌🙏🏼🙏🏼
@sachindeshpande6958
@sachindeshpande6958 3 жыл бұрын
बुआ आपल्या बद्दल काय बोलावे, आपले प्रत्येक कीर्तन म्हणजे एक पर्वणीच असते, अतिशय सुंदर मांडणी, सुंदर गायन, सुंदर वादन साथ. अतिशय हृदय स्पर्शी चरित्र आपण मांडले, विर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम. तसेच रामदास स्वामी यांचे श्लोक आणि त्यांच्या वांड:मयाकडे दुर्लक्ष झाले, हे पण सद्य परिस्थिती आपण सांगितली, हे अगदी खरे आहे.🙏🙏🙏
@vasudeodeo4834
@vasudeodeo4834 3 жыл бұрын
सुंदर विवरण..नेहमीप्रमाणे च आफळे महाराजांचे विवेचन म्हणजे तृप्ती चा अनुभव च
@madhurijoshi195
@madhurijoshi195 Жыл бұрын
आदरणीय सावरकरांना अभिवादन बुवा हे चरीत्र समाजासमोर मांडणे अतिशय गरजेचे आहे .काहिही माहिती नसतांना सावरकरांबद्ल जे लोक बोलतात त्यांची मला किव येते.
@ushakulkarni313
@ushakulkarni313 2 жыл бұрын
आदरणीय स्वातंत्रवीर वि.दा. सावरकरांना सादर प्रणाम तसेच आदरणीय गुरुवर्य श्री.चारूदतत आफळे यांना प्रणाम आपली सगळीच कीर्तने खूपच श्रवणीय आहेत ऐकतच रहावे असे वाटते सौ.उषाकुळकर्णी
@vasantdatar6743
@vasantdatar6743 7 ай бұрын
अतिशय प्रेरणादायी आणि अत्यंत उद्बोधक, राष्ट्रप्रेम जागृत करणारे असे हे कीर्तन आहे.
@manjiridhupkar7187
@manjiridhupkar7187 3 жыл бұрын
अप्रतीम कीर्तनाचा आनंद मिळाला. धन्यवाद. सद्गुरू समर्थ ,स्वात्ंत्र्यवीर सावरकर हे आख्यान आणि कीर्तनकार मा. आफळेबुवा सगळा मणीकांचनयोग आहे.
@anupamakulkarni8720
@anupamakulkarni8720 3 жыл бұрын
किर्तन विश्व प्रकल्प पुष्पातले एक अग्रणी लोकप्रिय नांव लिहताना मला अतिशय आनंद होतोय . ते दिव्य व्यक्तीचे नांव ह.भ.प. श्री चारुदत्त आफळे बुवा होय. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या असीम अढळ देशभक्तीपर किर्तन आख्यान अमोघ वाणीद्वारे करताहेत ते शबि सामर्थ्य अलौकिक च.! असे विटते किर्तन सौपूच नये. ती गोड रसाळ वाणु ऐकतच रहावी. प्रसंगानुसार जे दाखले देतात ते ऐकताना अंगी चैतन्य फुलते. प्रत्येक प्रसंगाशी समरस होऊन श्रोत्यानाही समरस करतात. हे श्रोत्यांना बांधून म्हणजे खिळवून ठे्वण्याचे कौशल्य वाखाणण्याजोगे च.!!! वेगवेगळ्या शहारातले स्वदेशभक्तीचे अनुभव , सावरकरांची धडपड तळमळ उत्कटतेने व्यक्त करतात की ती थेट ऱ्हदयाला च भिडते. अपार हालअपेष्टा अनन्वीत अत्याचार शारीरिक मानसिक छळ निमुटपणे कसं सहन केलं देव जाणे..! एवढीच खंत वाटते त्यांच्या बलीदानाचे ऋण आपण कसे फेडणार ? तरीही ते आख्यान पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ते फक्त श्री आफळे बुवांच्या किर्तनाद्वारेच.! परमभक्तांर किर्तने पुर्वापार होताहेत पण एका असामान्य देशभक्ताचे किर्तन इतके श्रवणीय असते हे पहिल्यांदा च अनुभवले म्हणजे ते प्रसंग ऐकून मी ओक्साबोक्शी रडले. श्री आफळे बुवांचे पुजनीय स्तवनीय वंदनीय स्मरणीय धन्यवाद.!!! प.पु। गु. दे. श्री कलावती आईंच्या क्रुपे श्री आफळे बुवांए लक्षावी शिर साष्टांग दंडवत.!!! वंदन वंदन वंदन वंदन वंदन वंदन वंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@smitagadekar9362
@smitagadekar9362 3 жыл бұрын
खूपच श्रवणीय किर्तन आहे आफळे महाराजांचे 🙏समजेल अशा सोप्या भाषेत वर्णन करून सांगतात, धन्यवाद 🙏 तुमचे नवीन किर्तन आमच्यासाठी मेजवानीच असते त्याचप्रमाणे भक्तीसुधा इंटरनेट रेडीओ स्टेशन वरील विष्णुपुराण सुध्दा अतिशय सुंदर आहे🙏🙏🙏
@prashanti.6082
@prashanti.6082 3 жыл бұрын
अत्युत्तम श्रवण पर्वणी ! समर्थांच्या सर्वोत्तमाच्या उत्तम दासाच्या गुणांचे आणि लक्षणांचे सुंदर विवेचन, सावरकरांसारख्या सकळ आध्यात्म कोळून प्यालेल्या आणि अंगी मुरवलेल्या राष्ट्रवीर आणि कर्मवीराचे सुरेल चरित्रवर्णन आणि चारुदत्त आफळेबुवांची अमोघ गोड वाणी आणि जोडीला सुंदर गोड गळा, कान आणि मन तृप्त झाले. नव्हे, "अजून काही, अजून काही" ही लालसा जागृत झाली. " अनादि मी, अनंत मी" ऐकताना तर अंगावर सरसरुन काटा उभा राहिला. त्रिवार वंदन 🙏 🙏 🙏
@latajoshi3095
@latajoshi3095 3 жыл бұрын
🙏🙏 🙏 सदा देवकाजी झिजे देह ज्याचा ...........सावरकरांची प्रखर राष्ट्भक्ती व अतुलनीय त्यागाचे खूप छान प्रकारे वर्णन केले, कीर्तनात खिळवून ठेवण्याची ताकद आपल्यात आहेच आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची चिकाटीने देवकाज समजून केलेली देशभक्ती 🙏🙏🙏.खूप आभार.ये सद्गुरूनाथा खूप छान.
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 2 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन! छानच झाले किर्तन!!
@Rohinikulkarnimusic
@Rohinikulkarnimusic 3 жыл бұрын
डोळे भरून आले, पत्नीची समजूत काढतानाचा प्रसंग ऐकून😥😥😞😞👌
@makyalalit
@makyalalit 3 жыл бұрын
कीर्तन उत्तम बुवा. देशभक्ताला साष्टांग नमस्कार 🙏
@meandmauli6244
@meandmauli6244 3 жыл бұрын
आदरणीय सावरकरांना विनम्र आभीवादन व हे चरीत्र सर्वासमोर मांडणार्या आफळे बुआंना देखील दंडवत 🙏🙏ऊत्कृष्ट कीर्तन 🙏🙏🙏
@jatishmulay8397
@jatishmulay8397 Жыл бұрын
स्पष्ट सुंदर उच्चार, पाठांतर, उदाहरणे, चपखल दृष्टान्त, माहिती, सुन्दर आवाज, संगीताची जाण आणखी काय हवं असतं समोरच्या श्रोत्या ला प्रभावित करायला व आपलंसं करायला !! उत्तम अतिशय उत्तम, प्रेरक, आज च्या दृष्टीने प्रासंगिक !! सादर नमन !!
@parameshwarbhole3982
@parameshwarbhole3982 2 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन आफळे बुवा
@neetapurandare5599
@neetapurandare5599 3 жыл бұрын
स्वा.विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन 🙏 आफळे बुवा तुमचं कीर्तन ही तर पर्वणीच आपल्या कार्यालाही विनम्र अभिवादन 🙏
@BHARAT-24.
@BHARAT-24. 3 жыл бұрын
किर्तन काय असतं हे आपल्याकडून शिकाव! किर्तन अनेक ऐकली, अनेक पाहिली पण आत्मसात किती केली हे महत्वाचं! संत महात्म्यांची किर्तन ऐकली पण वास्तवाशी लढना-या सावरकरांच किर्तन खुप छान, सुमधूर शब्दात गायलत! आपणास असनारी हिंदू धर्माविषयीची तळमळ अभिमानास्पद आहे! हिंदू संस्कृतीचे असे पूर अधिक वेगाने वाहिले पाहीजेत! आपल्या कार्यास अनंत शुभेच्छा! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sudhirbakare1682
@sudhirbakare1682 3 жыл бұрын
खूप छान निरूपण. अप्रतिम सादरीकरण. आफळेबुवांचे प्रवचन असो , कीर्तन असो खूप खूप श्रवणीय. मनापासून धन्यवाद. गायनही खूप छान
@dix779
@dix779 3 жыл бұрын
स्वातंत्र्य वीर विनायक सावरकर यांना शतशः प्रणाम
@rashmiraut4285
@rashmiraut4285 2 ай бұрын
धन्य धन्य बुवा,किती गुण गावे तुमचे ..❤
@subhashchandrapande2414
@subhashchandrapande2414 3 жыл бұрын
अतिशय सुंदर काळा ची गरज आहे आफळेबुवा ईश्वरी कार्य करीत आहेत
@manjudravid5998
@manjudravid5998 3 жыл бұрын
नमस्कार अतिशय अप्रतिम कीर्तन
@rajivtanksale4839
@rajivtanksale4839 3 жыл бұрын
अतिशय उत्तम वि दा सावरकरांचे कार्य ज्याला काही तोड नाही खुप खुप धन्यवाद
@vikasvanjari2798
@vikasvanjari2798 3 жыл бұрын
खूप सुंदर ! या महामारीच्या काळात प्रवचन कीर्तन प्रत्यक्ष ऐकायला मिळाले नाही परंतु त्याची उणिव आपण भरून काढली . 🙏 धन्यवाद 🙏
@sagarsonar2138
@sagarsonar2138 3 жыл бұрын
Dhanyavad Mauli ya Sunder Nirpunabaddal , aaj Khare Shree Savarkar ji ani tyanche Vichar kalle , Dhanyvad Mauli, ani sangitlayPrane aamhihi he aacharnat aanu, Dhanyavad Bharat Mata ki Jay 1🙏🙏🇮🇳🇮🇳💐💐🌸
@suhasinitulaskar7063
@suhasinitulaskar7063 3 жыл бұрын
फारच सुंदर आहे. हाल अपेष्टाच्या या वर्णनाने डोळ्यात पाणी तरारले.फारच सुदंर आफळे बुवांचे कीर्तन.🙏
@sagarsonar2138
@sagarsonar2138 3 жыл бұрын
Ho Khare aahe, sunder nirupan
@manjudravid5998
@manjudravid5998 3 жыл бұрын
वा खुपच उत्तम किर्तन
@avinashjoshi3991
@avinashjoshi3991 3 жыл бұрын
बुवांनी स्वा.सावरकासंबधी सुंदर कीर्तन केले.
@padminivaidya21
@padminivaidya21 Жыл бұрын
अप्रतिम मुख्य म्हणजे पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येतो धन्यवाद
@nileshraut8479
@nileshraut8479 3 жыл бұрын
अप्रतिम पांडुरंग हरी वासुदेव हरी
@yashwantpawar6881
@yashwantpawar6881 Жыл бұрын
आफळे बुवा खूप छान कीर्तनकार आहे ,,
@ravishankarwavhal1600
@ravishankarwavhal1600 3 жыл бұрын
अती सुंदर, सह कुटुंब आम्ही रोज ऐकतो
@nalinirasal8036
@nalinirasal8036 11 ай бұрын
जय श्रीराम सुंदर माहिती. आपल्या चरणी विनम्र वंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
@Rohinikulkarnimusic
@Rohinikulkarnimusic 3 жыл бұрын
मंत्र म्हणा,, सुंदर,👌👌
@ushavaishampayan1140
@ushavaishampayan1140 3 жыл бұрын
Koti koti vandan Savarkarana.kirtan khup chhan
@kanchideshmukh3077
@kanchideshmukh3077 3 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम... स्वातंत्र्यवीर सावरकर 🚩🙏 आफळे बुवा 🙏🚩🚩भारत माता की जय🚩
@vidyadharmadhikari1081
@vidyadharmadhikari1081 3 жыл бұрын
खूप श्रवणीय किर्तन घरबसल्या अंदमान मधील वीर सावरकरांच्या कार्याचा आढावा सुश्राव्य संगीतमय घेता आला.
@nileshgharat4308
@nileshgharat4308 3 жыл бұрын
Khupach sundar
@anilpandharipande8423
@anilpandharipande8423 3 жыл бұрын
एकदम छानच, फार मोठे होते.
@radikashenoy3410
@radikashenoy3410 2 жыл бұрын
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
@vijaygabhane1722
@vijaygabhane1722 3 жыл бұрын
400 वर्षाच्या घराण्यातील परंपरेचे पुण्य पणाला लाऊन कमित कमी वेळात संपूर्ण चरित्र सांगण्याचे कौशल्य महाराजाशिवाय कुणाला असावे? धन्य ते शब्द /गायन /मार्मिक निरूपण! शतशः प्रणाम 🙏🙏
@YogeshPatil-tq9uo
@YogeshPatil-tq9uo 3 жыл бұрын
खूपच छान कीर्तन हरी ओम
@dipashreekirpekar5698
@dipashreekirpekar5698 3 жыл бұрын
Afllebuvani savrkaranchi teenhi parv sundar varn keli sangitlu pan landan parvala lavkar avrt ghetl tumhi sangtate khup khup avdte mnpurvak dhanyavad v 🙏🙏🙏🙏
@kirtijoshi4727
@kirtijoshi4727 3 жыл бұрын
Sunder...kirtan vishayach itka preranadayi...tyala poorna nyay deun shravaniya kele...far far poorvi aaplya pitashrinche yach vishayavr kirtan aaikle hote talegavat.....tyanchi aathvan zali..... .
@mayadeshmukh4233
@mayadeshmukh4233 3 жыл бұрын
खुप छान किर्तन चालु जय श्रीरामा
@sudarshanjoshi6257
@sudarshanjoshi6257 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.......... निःशब्द 🙏
@manjudravid5998
@manjudravid5998 3 жыл бұрын
आपले किर्तन ऐकुन धन्य झालोखुप धन्यवाद
@panditkatrat3055
@panditkatrat3055 3 жыл бұрын
Mananiy savrkaranche charitr aani tehi Aaflebuvanchya mukhatun .apratim
@prasannakumardiwakar711
@prasannakumardiwakar711 3 жыл бұрын
अत्यंत सुंदर, देशभक्तीपर कीर्तन .धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@gopaldeshmukh4651
@gopaldeshmukh4651 3 жыл бұрын
अतिशय सुंदर बुवा.
@sadanandphadke3678
@sadanandphadke3678 3 жыл бұрын
विनम्र अभिवादन
@anujamande3389
@anujamande3389 3 жыл бұрын
Khup sundar . Aphale buva chi vani.
@sanjaymungekar4679
@sanjaymungekar4679 3 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन आहे
@arundhatisathe388
@arundhatisathe388 3 жыл бұрын
अतिशय उत्तम. अप्रतिम
@anitabhadang1137
@anitabhadang1137 3 жыл бұрын
उत्तम कीर्तन 🙏🙏
@aniruddhapitre6917
@aniruddhapitre6917 3 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन आफळेगुरूजी👌👌🙏🙏💐💐 थाेर प्रखर राष्ट्र भक्त वि दा सावरकर यांच्या तुरूंगजीवनावरील उत्कृष्ट विवेचन आपण केले आहे. आपण माझे अत्यंत आवडते कीर्तनकार आहात कारण आपले संस्कृत विषयाचे ज्ञान, उत्तम आणि अत्यंत गाेड आवाज तसेच संगीताचे सखाेल ज्ञान यामुळेच आपले कीर्तन नेहमीच श्रवणीय हाेते. मी फक्त आपलीच वेगवेगळ्या विषयांवरची अनेक कीरतने ऐकली आहेत. असामान्य परतिभावंत कीर्तनकार अहात आपण. धन्यवाद. अनिरूदध पितरे पुणे
@bhalchandranaik2901
@bhalchandranaik2901 2 жыл бұрын
खुप खुप छान व सुंदर.💐💐🙏🙏🙏🙏💐
@shrikantwathare2350
@shrikantwathare2350 3 жыл бұрын
नमस्कार बुवा, अतिशय सुंदर कीर्तन झाले. सदा देवकाजी झीजे देह ज्याचा. सावरकरांच्या जीवनात देवकाजी ह्यांचे, बुवांनी खूप चांगले समजावून सांगितले. धन्यवाद आणि बुवांना नमस्कार. तसेच सावरकरांना शतशः प्रणाम.🙏
@madhavalikar
@madhavalikar 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणे खूप छान झालं
@maddygamerz2219
@maddygamerz2219 3 жыл бұрын
Khupach sunder sarva ऐकुन डोळ्यात पाणी येते आफळे महाराजांनी खुप छानच सांगितले
@purushottambodas6546
@purushottambodas6546 3 жыл бұрын
अतिशय सुंदर
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 3 жыл бұрын
अप्रतिम.स्वातंऱ्यवीर सावरकरांची शिक्षा ऐकताना गहिवरून आले.बुवांच्या किर्तनाला पर्याय नाही.
@jadt4325
@jadt4325 3 жыл бұрын
राम कृष्ण माऊली।
@vaishaliupasani1518
@vaishaliupasani1518 3 жыл бұрын
अशाच किर्तनासाठी आम्ही आतुर राहू🙏🙏🙏जय श्री राम
@ravindrajoshi8749
@ravindrajoshi8749 3 жыл бұрын
अप्रतिम मांडणी
@gitamahadkar6776
@gitamahadkar6776 3 жыл бұрын
सुश्राव्य कीर्तन 👌👌
@shubhadakakirde5328
@shubhadakakirde5328 3 жыл бұрын
Khup sunder kirtan
@sureshkulkarni9391
@sureshkulkarni9391 3 жыл бұрын
खुपच सुंदर. ज्ञानत भर पडली. मुलानेही प्रेरणा घेतली. धन्यवाद
@pramodinamdar4758
@pramodinamdar4758 3 жыл бұрын
🙏 सुंदर चिंतनिय विचार कमी वेळात मांडले. स्वा. विनायक दामोदर सावरकर यांना कोटी कोटी विनम्र प्रणाम.🙏
@sujatakulkarni2726
@sujatakulkarni2726 3 жыл бұрын
Khoop chhan 🙏.
@kanchantupe8917
@kanchantupe8917 8 ай бұрын
खूपच छान😊
@savitavidwat3756
@savitavidwat3756 3 жыл бұрын
धन्यवाद आफळेबुवा।श्रीसमर्थांचे अभंग डावलले जातात कीर्तनकारांकडून हे सत्य आहे.असे मुद्दे कळकळीने बोलणे हे सुद्धा देवकाजच आहे.॥जय जय रघुवीर समर्थ॥ अप्रतिम कीर्तनमालिका सादर होत आहै.
@arunamulye4660
@arunamulye4660 3 жыл бұрын
खुप सुंदर .धन्यवाद
@sachinkannadkar1316
@sachinkannadkar1316 3 жыл бұрын
🙏अप्रतिम दर्शन, बुवा तिन्ही भाग एक से एक झाले. प.पू.अप्पा (वरदानंद भारती) अनेक ठिकाणी प्रासंगिक सावरकरांच्या चरित्रतील प्रसंग सांगत आणि अश्या देशभक्तांमुळे आज आपण स्वतंत्र आहोत हे सांगताना त्यांचे डोळे भरून यायचे. आज किर्तन ऐकताना असाच अनुभव आला. एखादे चरित्र वाचन करणे आणि किर्तनातून ऐकने फार फरक आहे. हा एक उत्तम संस्कार आहे आणि तो आपल्या वाणीने सर्व भारतीय व भारताबाहेरील भारतीयांवर या किर्तन विश्वच्या माध्यमातून झाला. खरे सावरकर नक्कीच समजले. माईंचा त्याग किती मोठा आहे हे आजच्या चरित्र भागातून समजले. 🙏
@vaibhavijoshi5075
@vaibhavijoshi5075 3 жыл бұрын
खूपच छान
@dr.reachadeo3461
@dr.reachadeo3461 3 жыл бұрын
विनायकचरितगाये चिदानंद !🔥
@ashakarle5636
@ashakarle5636 3 жыл бұрын
अतिशय उत्तम कीर्तन भाषा उच्च्यार अर्थ सगळंच एकण्यासारखे आहे सगळ्यांनी जरूर ऐकावे महान कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे बुवांना नमस्कार
@VedantJoshi12
@VedantJoshi12 3 жыл бұрын
खुप सुंदर महाराज दास चिंतन खुप सुंदर या कारणे संपुर्ण भारत व भारता बाहेर पण भक्तांना भगवत आनंद प्राप्त होई 🙏🙏🙏
@shirishshanbhag1199
@shirishshanbhag1199 3 жыл бұрын
आफळे बुवा यांचा सावरकरांवरील अंदमान पर्व हा आख्यान छान झाला.
@suprabhajoshi3032
@suprabhajoshi3032 3 жыл бұрын
अनादी मी अनंत मी अवध्य मी . अशा वीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम.🙏🙏
@mohansathaye3085
@mohansathaye3085 3 жыл бұрын
आफळे बुवा व सर्व संयोजकांना अत्यंत सादर प्रणाम. अथ पासून इति पर्यंत कीर्तनाचा एकेक क्षण स्फूर्ति वर्धक वाटला. हा व्हीडीओ पुन्हा पाहण्यास इच्छा निर्माण होत आहे... धन्यवाद व शुभेच्छा।।🌹
@girishambhaikar9443
@girishambhaikar9443 3 жыл бұрын
🙏ओतप्रोत देशभक्तीचं, राष्ट्रभक्तीचे जगातील एकमेव उदाहरण... वैयक्तिक आशा आकांक्षा ना तिलांजली देऊन,कौटुंबिक जीवन बाजूला ठेवून केवळ राष्ट्रकार्य हेच ध्येय. अद्भुत कार्याची ओळख करून दिली🙏🙏🙏
@panderushi
@panderushi 3 жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@suvarnakelkar7239
@suvarnakelkar7239 3 жыл бұрын
🙏💐 "माझी जन्मठेप " " ग्रंथ " दोनदा वाचण्याचा प्रयत्न केला पण, दोन्ही वेळा भारत ते आंदमान या जहाजातिल प्रवासाच्या प्रकरणा पुढे जाऊ शकले नाही... डोळे भरून येत आणि पुन्हा पुन्हा वाचावं लागे... आफळे बुवांचे कीर्तन ऐकून थोडे तरी समाधान वाटतंय.. धन्यवाद🙏
@umatendolkar2530
@umatendolkar2530 3 жыл бұрын
सदा देवकाजी ....सुंदर जय गगनगिरी माऊली👏👏👏💐🚩
@bajiraochaudhari4877
@bajiraochaudhari4877 3 жыл бұрын
खूपच छान श्रवणीय व बोधप्रद कीर्तन झाले 🙏🙏
@madhurijoshi4594
@madhurijoshi4594 3 жыл бұрын
khupach chan 👍🙏🙏 dhanyawad buva🙏🙏
@sanjivanijoshi6063
@sanjivanijoshi6063 3 жыл бұрын
जीवनाच्या उत्तरार्धात खुप छान सुखद अनुभव किर्तन ऐकुन येत आहे महाराजांना त्रिवार वंदन स्वातंत्र्य वीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम
@vijayjoglekar8476
@vijayjoglekar8476 3 жыл бұрын
अत्युत्तम कीर्तन पूर्वरंग तर उत्तमच आपल्या नेहमीच्या वापरातले शब्द पण समानार्थी शब्दांचा वेगळा अ र्थ.छान प्रबोधन.
@latalonkar2822
@latalonkar2822 3 жыл бұрын
राष्ट्रीय प्रबोधन करण्यासाठी अशा कीर्तनाची आजच्या काळात खरच गरज आहे खूपच सुरेख प्रकारे प्रबोधन शतश प्रणाम
@gokuldevghare9358
@gokuldevghare9358 3 жыл бұрын
सर खुप सुंदर कीर्ती महान काम केले सावकार नी👏🌷🙏
@aditijoshi8781
@aditijoshi8781 3 жыл бұрын
अप्रतिम पूर्वरंगातील शब्दांच्या करामती, भाषेचे प्रभुत्व छान चरित्र कथन उत्तम
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 21 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 1,3 МЛН
Avinash Dharmadhikari | Veer Savarkar [PART 1] | Apan Tyanchya Saman Vhave
1:04:30
Chanakya Mandal Pariwar
Рет қаралды 671 М.