Рет қаралды 18,287
ती एक चूक अन 3 मिनिटात 4000 मृत्यू, Gas Leak झाला तेव्हा Bhopal मध्ये काय घडलं होतं | Vishaych Bhari
मंडळी १ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक एलपीजीचा गॅस टँकर सेव्हन हिल उड्डाणपपुलाच्या कठड्याला धडकला. धडकेनंतर टॅंकरच्या एका वॉल्व मधून गॅसगळती सुरू झाली अन छत्रपती संभाजीनगरमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. जणू सबंध शहर गॅसवर असल्यासारखी परिस्थिती होती. कारण कुठल्याही क्षणी तिथं मोठा स्फोट होण्याची शक्यता होती. पुढं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तिथं १५ मिनिटात अग्निशमन दलाची गाडी बोलावण्यात आली. पोलिसांनी एरिया सील केला आणि तब्बल १३ तास अथक परिश्रम करून अग्निशामक दल, पोलिस अधिकारी, महापालिका आयुक्त यांनी मोठी जीवितहानी टाळली. संकट टळलंय ह्ये कळल्यावर लोकांनी मोकळा श्वास घेतला. मंडळी आता ह्ये सगळं सांगायचं कारण म्हणजे ४० वर्षांपूर्वी घडलेली सेम अशीच एक घटना. जिची नुसती आठवण आली तरी मध्यप्रदेशातील लोकांच्या काळजात धस्स्स होतं. हो, तुम्ही बरोबर ओळखलत, आपण बोलतोय भोपाळच्या गॅस लीक दुर्घटनेबद्दल. आज चाळीस वर्ष उलटलीत त्या दुर्घटनेचा फटका बसलेल्या लोकांचे अश्रू थांबले नाहीत. अद्याप त्याचे दुष्परिणाम लोकांना भोगायला लागतायत. पण नेमकं काय घडलं होतं त्या रात्री. किती लोकांचा जीव गेला होता त्या दुर्घटनेत. गॅस लीक नंतर पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर कशी आली आणि 40 वर्षांपूर्वी लीक झालेला तो गॅस आजही लोकांच्या आरोग्यावर कसा प्रभाव टाकतोय, त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#latestnews
#latestupdates