तू मी भिन्न न मानिसी,श्रीमद प. प. वासुदेवानंदसरस्वती महाराज विरचित पद,vasudev sangeet sabha

  Рет қаралды 4,138

VASUDEV SANGEET SABHA

VASUDEV SANGEET SABHA

Жыл бұрын

#vasudevsangeetsabha #dattatreya #dattaguru #dattashraya #gurumaharaj
#bhaktisong
मार्गदर्शन - श्री.अजित कृष्ण तुकदेव.
रेकॉर्डिंग -स्वप्नील शिंदे.
एडिटिंग ,मिक्सिंग आणि मास्टरींग .- अभिलाष राजर्षी.
स्टुडिओ - स्वरोदय.
संगीत आणि गायन -सौ वसुधा वैद्य भालेराव.
तबला वादक -श्री ऋषिकेश सुरवसे.
बासरी - श्री .मोहीत पुराणकर.
संवादिनी - श्री. विजय धुमाळ.
संगीत संयोजन.- राहुल कुलकर्णी.
"वासुदेव दत्त"
प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज -
अतिशय उत्कट व तपोपूत जीवन ज्यांच्या श्वासाश्वासातून प्रकट झाले - आर्ष पदांच्या निमित्ताने अभिव्यक्त झाले व साऱ्या चराचरास त्या दिव्य सौरभाने वेष्टित पूर्णत्वाकडे नेण्यास सिद्ध झाले.
"तू मी भिन्न न मानिसी तरी एकी न का करिसी"
तू मी अशी भिन्नत्वाची भावना ज्यांच्या ठायी लेशमात्र ही नाही अश्या गुरुदेवांचे म्हणजेच भगवान श्री दत्तात्रेयांचे भजन करीत असता - अनुसंधानाच्या निमित्ताने स्मरण करीत असता आपल्या अंतर्स्थितीत मात्र भेदज्ञानामुळे तीळमात्रसुद्धा बदल घडत नाही ही खंत व त्यानिमित्ताने निर्माण झालेला खेद.
हा खेद - सामर्थ्य असूनही मनाच्या हतबलतेमुळे पूर्णत्वाला पोहोचु न शकण्याच्या असमर्थतेची जाणीव. अंतरंगात निर्माण झालेला कोलाहल व असहाय्यता.
अंतरात निर्माण झालेला हा गोंधळ जे समजु शकतील व त्यातून मुक्त करून हृदयामध्ये अभिन्नत्व निर्माण करू शकतील अश्या गुरुदेवांचा म्हणजेच श्रीदत्तप्रभूंचा प.प.श्रीमद् स्वामींनी केलेला हा आर्त असा धावा होय.
या पदाच्या निमित्ताने घडलेला हा गुरु - शिष्य संवाद म्हणजे साऱ्या विश्वाला ज्ञान - भक्ती - कर्म - योगाचे सांगितलेले मर्मच होय.
समस्त उपनिषदांनी गुरु - शिष्य संवादाच्या माध्यमातून युगायुगांपासून जे तत्व प्रतिपादित केले त्या सर्व चिंतनाचे सार म्हणजे हा वासुदेव दत्ताचा सिद्ध असा संवाद होय.
तुझे - माझेपणाची ही भावना जोवर असेल तोवर मी तुला जाणू शकणार नाही, म्हणून हे भगवंता मला आपले स्वरूप जाणता यावे यासाठी हे भिन्नत्व भंग करून आपल्या अंतरंगात मला शिरता यावे म्हणून आपण हे अभिन्नत्वाचे दान माझ्या पदरात तात्काळ टाका ही केलेली मागणी.
जीवशिवाच्या अद्वैतस्थितीच्या निमित्ताने जीवाने शिव होऊन रहावे तैसे 'वासुदेवाने दत्त होऊनि दत्तास भजावे'
अश्या स्वरूपाच्या ज्ञानोत्तर भक्तीचे वर्णन करणाऱ्या व ती भक्तीची याचना करणाऱ्या या पदाच्या निमित्ताने गुरुपदांशी अनुसंधान साधले असता साधकाच्या मनातील भिन्नत्व भंग होऊन आत्मस्थितीचा उदय होईल हे साक्षात् सिद्ध वचन आहे.
"अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त"
वासुदेव संगीत सभा, वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुणे

Пікірлер: 21
@sureshnikam2804
@sureshnikam2804 Жыл бұрын
🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
@pradipbarbade7703
@pradipbarbade7703 Жыл бұрын
खुप छान पद ।। श्री गुरूदेव दत्त ।।
@theashvini5548
@theashvini5548 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🕉️🤩
@jyotikulkarni5867
@jyotikulkarni5867 6 ай бұрын
अतिशय मनाला एकरूप karnare aahe
@fulloflife7999
@fulloflife7999 Жыл бұрын
Sundar🙏
@mrudulakolharkar8310
@mrudulakolharkar8310 Жыл бұрын
सुंदर
@sandhyanimdeo2367
@sandhyanimdeo2367 Жыл бұрын
खुप छान 👌🙏🙏
@maithili20
@maithili20 Жыл бұрын
Khup sunder 👌
@amitsaurkar6761
@amitsaurkar6761 Жыл бұрын
Khoopach Sundar...
@aparnaasupeshimpi3052
@aparnaasupeshimpi3052 Жыл бұрын
Khup ch Chhan gayle ga Vasudha tu ..
@nehaabhale3991
@nehaabhale3991 Жыл бұрын
Khup sundar!!!🙏🙏
@pushpakulkarni3801
@pushpakulkarni3801 Жыл бұрын
व्वा, खूप खूप छान वाटले!!
@prajaktajoshi9089
@prajaktajoshi9089 9 ай бұрын
Khup divsane tuza aavaj aikla Vasudha
@meenanimdeo6498
@meenanimdeo6498 Жыл бұрын
खूप छान
@dr.ashwinimedhekar-saurkar1648
@dr.ashwinimedhekar-saurkar1648 Жыл бұрын
वाह सुंदर झालेय.. संपूर्ण team चे अभिनंदन.. भावपूर्ण गायन वसु..
@aparnaasupeshimpi3052
@aparnaasupeshimpi3052 Жыл бұрын
Khup varshanantar tuza sundar awaj aikun khup jast Anand zala
@kavipravisshow.8139
@kavipravisshow.8139 Жыл бұрын
Khoop chan awaj ani sangeet pan chan.
@vrushalibhalerao6616
@vrushalibhalerao6616 Жыл бұрын
‌श्री स्वामी महाराज यांच्या काळात घेऊन जाते हे पद... खूप सुंदर वसुधा
@vidyavaidya7811
@vidyavaidya7811 Жыл бұрын
खूपच भावपूर्ण पद रचना. कल्याणी अणि वसुधा सुंदर सादरीकरण.श्री गुरुदेव दत्त.
@anitapimplapure8571
@anitapimplapure8571 Жыл бұрын
Khupach sunder ashru awarat nahi
@suchitrakale3201
@suchitrakale3201 Жыл бұрын
स्वर्गीय शब्दांचे🙏🙏🙏सुंदर गायन 👌👌श्रीमद् थोरले स्वामी महाराजांना शतशः प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 19 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,7 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 50 МЛН
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
Shri Vitthal darshan Pandharpur today morning mahapooja || 09/07/2023 #pandharpurlivedarshan
श्री विठ्ठल दर्शन पंढरपूर
Рет қаралды 111
Sardor Tairov - Sen meni yeding (Official Music Video)
5:02
Sardor Tairov Official
Рет қаралды 3,6 МЛН
QANAY - Шынарым (Official Mood Video)
2:11
Qanay
Рет қаралды 612 М.
Қанат Ерлан - Сағынамын | Lyric Video
2:13
Қанат Ерлан
Рет қаралды 3,3 МЛН
Ozoda - JAVOHIR ( Official Music Video )
6:37
Ozoda
Рет қаралды 10 МЛН
ҮЗДІКСІЗ КҮТКЕНІМ
2:58
Sanzhar - Topic
Рет қаралды 6 МЛН
Iliyas Kabdyray ft. Amre - Армандадым
2:41
Amre Official
Рет қаралды 626 М.
Janona
4:09
Release - Topic
Рет қаралды 1,4 МЛН