Рет қаралды 260
तोरणा किल्ला म्हणजेच प्रचंडगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे या ठिकाणी वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे.
पुणे शहरापासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये तोरणा किल्ला आहे. पुण्यातील अतिदुर्गम आणि अतिविशाल किल्ला म्हणून तोरणा किल्ला ओळखला जातो.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे जवळ सह्याद्रीच्या डोंगर रांगेतून दोन पदर फुटून समोर गेले आबेत. त्यातील एका पदरावर तोरणा किल्ला वसलेला आहे.
दुसऱ्या पदरावर राजगड किल्ला आहे. राजगड असलेल्या या दुसऱ्या पदाला भुलेश्वराची रांग देखील म्हटले जाते.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर उंच डोंगरावर 18.276 उत्तर अक्षांश व 73.613 पूर्व रेखांश वर तोरणा किल्ला आहे.
वेळवंडी नदी आणि कानद नदीच्या खोऱ्यांनी तोरणा किल्ल्याला नैसर्गिक सौंदर्य भरभरून बहाल केले आहे. या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसलेला तोरणा किल्ला अजूनच सुंदर दिसू लागतो.
शौर्य, पराक्रम, शिवविचार बरोबरच साक्षात छत्रपतींच्या स्वराज्य विचारांचा पहिला साक्षीदार झालेला तोरणा म्हणजेच प्रचंड गड किल्ला हा आज देखील शिवविचार छातीवर घेऊन उभा आहे.
पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर, राजगडाच्या शेजाराला असलेल्या तोरणा किल्ल्याच्या पश्चिमेला कानद खिंड आणि पूर्व दिशेला बामन व खरीव खिंडी आहेत.
वेल्हे गावाजवळ सह्याद्रीच्या डोंगरात उभा असलेला तोरणा किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून, तोरणा किल्ल्याची उंची ही साधारण 1400 मीटर इतकी आहे.
स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 1647 मध्ये सामील करून घेतलेला तोरणा म्हणजेच प्रचंडगड किल्ल्यावरून राजगड किल्ला, सिंहगड किल्ला, रायगड किल्ला, पुरंदर किल्ला, लिंगाणा किल्ला हे किल्ले देखील दिसतात.