योग केल्याने 'हे' आजार बरे होतात? | Dr. Samprasad Vinod | Girish Kulkarni | EP- 1/2 | Think Life

  Рет қаралды 21,645

Think Bank

Think Bank

Күн бұрын

योगसाधना म्हणजे नक्की काय? योगासनांच्या पलीकडे जाणारा योग म्हणजे काय? योग करून विचारांवर आणि मनावर नियंत्रण मिळवता येतं का? मानसिक तणावाचा शरीरावर कसा परिणाम होतो? सध्याच्या काळात प्रत्येकाला योगसाधना करणं शक्य आहे का?
ज्येष्ठ अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्यासह योग गुरू डॉ. संप्रसाद विनोद यांच्याशी साधलेला संवाद, भाग १...
#internationalyogaday #mentalhealth #yoga

Пікірлер: 54
@narendrabhatiaable
@narendrabhatiaable 3 ай бұрын
फारच सुंदर. योगसाधनेतून मन शांत होणे, आंतरीक आनंद मिळणे यावरच शारीरिक स्वास्थ्य मिळण्यास मदत होते.
@ashwinighatpande398
@ashwinighatpande398 3 ай бұрын
शांत मनी,योग जनी! माननीय बाबांच्या सान्निध्यात येणाऱ्या सर्वांना त्यांच्या योग वर्गात अतिशय छान ,मन शांत करणारे अनुभव येतात. कधीही भेटले तरी बाबांची हसतमुख मुद्रा पाहून आपणही प्रसन्न होतो. आश्वस्त करणारे व्यक्तिमत्त्व!
@anjalisoman4461
@anjalisoman4461 3 ай бұрын
खूप अवघड विषय अगदी सोप्या पध्दतीने स्पष्ट होतो आहे. सर्वांसाठी उपयुक्त....
@dr.mohansali8217
@dr.mohansali8217 3 ай бұрын
खूप सुंदर विवेचन. अवघड विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्याची हातोटी केवळ विलक्षण!
@वाचनसावित्री
@वाचनसावित्री 3 ай бұрын
विनायक यांचे प्रश्न सर्वांना पडतात, त्याची उत्तरे आहेत. दुसऱ्या भागात गुरु- शिष्यांचा मेळ खूप छान जमलाय.
@rajeshdixit405
@rajeshdixit405 3 ай бұрын
योगाच मौलिक ज्ञान असलेली मुलाखत भावली
3 ай бұрын
मना बरोबर मैत्री ची भावना ठेवणे .. स्वतः पाशी स्थिर होणे .. ही स्वस्थता..ह्याचे खूप सोपे विश्लेषण ..🙏🙏..
@sudhirbapat6896
@sudhirbapat6896 3 ай бұрын
अतिशय सोप्या भाषेत अवघड विषय समजावून सांगण्याची हातोटी खूप भावली!!
@kasturiashtekar7900
@kasturiashtekar7900 3 ай бұрын
खुप सुंदर विवेचन फार समाधान वाटले आणि वेळ काढूनच अनुभव घेणेच योग्य आणि गरजेचं वाटतं,नेहमी मार्गदर्शन मिळायला हवे 🙏🙏
@kedarphanse7194
@kedarphanse7194 3 ай бұрын
आदरणीय संप्रदाय विनोद सरांनी अत्यंत उद्बोधक माहिती दिली आहे. धन्यवाद सर.
@milindchoudhari6987
@milindchoudhari6987 3 ай бұрын
फारच उत्कृष्ट आणि बोध दायक तसेच आयुष्य जगण्याची आवड निर्माण करणारे विश्लेषण आणि विवेचन, पुढील भागाची वाट पाहत आहे.सर्वांना खुप धन्यवाद.
@prasadapte4642
@prasadapte4642 3 ай бұрын
आत्म्याची जाणीव होणे आणि आपल्या मीपणाची सूत्र त्याच्याकडे सुपूर्त होणे🎉❤
@suvarnasakhadeo7091
@suvarnasakhadeo7091 3 ай бұрын
अवघड विषय पण सोप्या भाषेत सांगण्याची शैली खूप आवडली.दुसऱ्या भागाची उस्तुकता 👍🙏
@sagarmitkari1514
@sagarmitkari1514 3 ай бұрын
wah... प्रभावित करायचं नसतं प्रवृत्त करायचं असतं! काय जबरदस्त बोललात
@varshaagashe1770
@varshaagashe1770 3 ай бұрын
आपल्या अंतरंगातला जोड..... कॉन्सेप्ट समजून घ्यायला खूप मदत झाली....,🙏🙏
@amolpimpalkhare2924
@amolpimpalkhare2924 3 ай бұрын
खूप छान मुलाखत ! दुसर्या भागाची वाट पाहतोय 🙏
@medhadeo157
@medhadeo157 3 ай бұрын
🙏 आपल्या Think Bank वरील मुलाखतीचा १ला भाग पाहिला. खूप छान वाटले. दुसऱ्या भागाची उत्सुकतेने वाट पहात आहे.
@swatigodbole5867
@swatigodbole5867 3 ай бұрын
खूपच छान कार्यक्रम झाला. मनापासून आवडला.🙏
@maheshphadnis4505
@maheshphadnis4505 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत आहे ही. तिघांचेही मनपुर्वक आभार. सरांचे मार्गदर्शन कुठे मिळू शकेल? अतिशय प्रेरणा देणारी मुलाखत आहे. योग ह्या शब्दाचा पहिल्यांदा खरा व सुंदर अर्थ समजला.🙏🙏🙏
@santoshvidwans1736
@santoshvidwans1736 3 ай бұрын
Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030
@lalitabhave6251
@lalitabhave6251 3 ай бұрын
अप्रतिम 👏
@aditihatwalne4440
@aditihatwalne4440 3 ай бұрын
Khoop chaan sangitalay..dhanyavad !!
@dilipchopadekar5787
@dilipchopadekar5787 3 ай бұрын
खुप छान माहिती आहे आकलनिय❤
@madhukartikhe6170
@madhukartikhe6170 3 ай бұрын
खूप चांगले सागितले आहे.
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 3 ай бұрын
उत्तम विश्लेषण आणि विशेष मुलाखत.
@वाचनसावित्री
@वाचनसावित्री 3 ай бұрын
स्वतःपाशी स्थिर असणं म्हणजे स्व-स्थता, माझ्या आतलं जोडलेपण, आसनांमधे प्रयत्नशैथिल्य म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचं, प्राणायामातून फुफ्फुसांची क्षमता आपोआप वाढते पण बोध काही वेगळा मूलभूत होऊ शकतो, ही सगळी योगाची अभिजातता, सोप्या भाषेत कळते आहे आणि तरी ते अनुभवाने कळून घेण्यासाठी कुतूहल जागं होतंय... साधना चालू आहे,..... दुसऱ्या भागाची वाट बघतेय....- ललिता आगाशे
@pradnyakelkar2825
@pradnyakelkar2825 3 ай бұрын
खूप छान 🙏
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 3 ай бұрын
संपूर्ण एकाग्रता निश्चित प्राप्त होते.
@saranggovind
@saranggovind 3 ай бұрын
खर सांगायचे तर headline बघून मी टाळला होता video . दुसरा एपिसोड बघितला .मग हा एपिसोड बघितला . असो . पुन्हा धन्यवाद .
@PoonamJain-dc8cd
@PoonamJain-dc8cd 3 ай бұрын
खूप मस्त ..छान सांगितले
@PoonamJain-dc8cd
@PoonamJain-dc8cd 3 ай бұрын
खूप मस्त
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 3 ай бұрын
Image larger than life.
@vandanajoshi6674
@vandanajoshi6674 3 ай бұрын
दोनदा ऐकलं पण परत परत ऐकायला पाहिजे असं वाटतंय
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 3 ай бұрын
पास्ट,प्रेझेंट चे विश्लेषण करत करत पास्ट मधून बोध घेऊन उद्याचा पास्ट म्हणजे आज मधे बदल घडवत जाऊन फायनली पास्ट व प्रेझेंट बदलत जाऊन फ्युचर जास्त सुसह्य करत जाणे हे विवेचन चांगले वाटले.
@harishkulkarni4u
@harishkulkarni4u 3 ай бұрын
😂😂
@arvindsovani9449
@arvindsovani9449 3 ай бұрын
चर्चा हेडफोनवर नीटपणे ऐकू आली नाही, अन्य कार्यक्रमाला असे होत नाही,
@rupeshchavan3710
@rupeshchavan3710 3 ай бұрын
🌹🕉️🌹🇮🇳🌹🙏
@kaustubhdeshpande857
@kaustubhdeshpande857 3 ай бұрын
Good to see celebrity like Girish in Yog session, but as guruji said mind body atma all required integration In yog....if one is taking interest in yog sadhana, then why ignoring other energies like God?
@sugraastiffins4844
@sugraastiffins4844 3 ай бұрын
22:44 हा सेम प्रश्न मलाही पडला : पण ह्यांनी उत्तर दिलं त्यातून नक्की काहीच समजलं नाही. गोष्टी सोप्या करून सांगायला हव्यात
@sudhirbapat6896
@sudhirbapat6896 3 ай бұрын
हे योग-शास्त्र अनुभवण्याचं शास्त्र आहे. फक्त बुद्धीने समजून घ्यायला लागलं की कठीण वाटू लागतं. सुयोग्य मार्गदर्शनाखाली जर योग हे योगसाधना म्हणून केली तर हे आपल्या अनुभवाने उलगडू लागतं. बघा, पटतंय का...
@sudhirbapat6896
@sudhirbapat6896 3 ай бұрын
साधारण 30:00 ला काही प्रमाणात स्पष्ट केलं आहे...
@saranggovind
@saranggovind 3 ай бұрын
अजूनही head बदल ता आले तर बघा . आजार शब्द नकोसा असतो . नवीन लोकांपर्यंत vishay जायला हवा .
@Virendrajoshi-z7y
@Virendrajoshi-z7y 3 ай бұрын
सदर योगगुरू एक्स्पर्ट असतीलच....पण मुलाखत जरा जड भाषेत झाली....अधिक सोपं करून सांगितलं असतं तर बर झालं असतं... योग केल्याने आजार बरे कसे होतात याचे विवेचन दिसले नाही.....
@padmajajadhav5526
@padmajajadhav5526 3 ай бұрын
काही मराठी शब्दा ना ईतर भाषे मध्ये पर्यायी शब्द नाहीत. प्रत्येक शब्द समजून घ्यावा लागेल . एक एक वाक्य शांत पणे घोळू देत. समजत जाईल असे वाटते.
@YogPrerana
@YogPrerana 3 ай бұрын
योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायामाचा अभ्यास नसून त्यांची सांगड मनाशी आहे. रोग हे मनोदेहीक असतात अर्थात मनात विकार निर्माण झाले म्हणजे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होतो व आजार उत्पन्न होतात. म्हणून आपल्या मनाला नेहमी प्रसन्न ठेवले पाहिजे. मनात स्थिरता आणली पाहिजे. आसनातील स्थिरतेमुळे शरीर व मन यावर एकत्रपणे प्रभाव पडतो. आसनांमुळे शरीर स्थिर होतं. स्थिर शरीर ठेवण्यासाठी मन एकाग्रतेने काम करते व आसन स्थितीतील शिथिलतेचा अनुभव मिळाल्याने मनास शांतता लाभून शरीराला अधिक फायदे मिळतात. आसनातील अवस्थेत दीर्घकाळापर्यंत स्थिर राहत आपण तणावरहीत सुखाचा अनुभव घेणे म्हणजेच 'स्थिर सुखम आसनं' आहे. फक्त आसन घेऊन सोडून दिल्याने रोग पूर्णपणे बरा होत नाही पण योग्य पद्धतीने आसन करणे, पूर्ण कालावधीसाठी टिकवणे व व पुन्हा योग्य पद्धतीने आसन सोडल्याने आसनाचा फायदा शरीराला मिळतो.
@1Naturalsolutions
@1Naturalsolutions 3 ай бұрын
पहिल्या पाच मिनिटांतच अशांत मनस्थिती आणि आजार यांचा संबंध दाखवलेला आहे. आणि मनस्थिती शांत कशी ठेवावी याचे विवेचन पुढे आहे. त्यामुळेच शिर्षक अगदी योग्य आहे.
@jayendrapatil3821
@jayendrapatil3821 3 ай бұрын
शांत चित्ताने परत परत ऐकल्यास विषयाची समजण्यातली कठीणता नक्कीच कमी होईल. जाता जाता अजून एक सुचवतो मला सगळं समजलच पाहिजे ह्या दृष्टीने पाहू नका. पहाणे+ऐकणे= समजणे हे सगळं सहज होऊ द्या. आट्टाहास नको. 🙏
@prekshakanchandarekar3002
@prekshakanchandarekar3002 3 ай бұрын
बरोबर आहे, ही भाषा आपल्यासारख्या सामान्य माणसाला जरा जडच वाटते, कारण दर्शन शास्त्राचा आणि आपला दूर दूर पर्यंत काहीच संबंध नाहीये आणि ह्या तज्ज्ञांनी पातंजल मुनींच्या योगदर्शन मधील तत्वज्ञान सांगितल्याप्रमाणे वाटतेय. आपला आणि योग (योगा) याचा संबंध फक्त पोटाचा घेर कमी करण्यासाठी योगा करावा येवढाच आहे. त्यामुळेच ही शास्त्र शुद्ध भाषा जरा जडच आहे असं वाटतंय.
@harishkulkarni4u
@harishkulkarni4u 3 ай бұрын
नवीन काय सांगितलं ...? नुसत पाल्हाळ लावत बसलेत...... व्हिडिओचा टायटल आणि कंटेंट याच्यात एक पर्सेंट चा पण संबंध नाही
@harishkulkarni4u
@harishkulkarni4u 3 ай бұрын
विनायक फसवं थंबनेल टायटल द्यायचं बंद करा
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 35 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 65 МЛН