Рет қаралды 63
तिरुपती बालाजी मंदिर, तिरुमला येथे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती(विष्णू). येथे बालाजीचे विख्यात मंदिर आहे. शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. तेलुगू व तमिळ भाषेत मला/मलई म्हणजे डोंगर/पर्वत होय.बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. हे ठिकाण रेल्वे व महामार्गाने चेन्नई व बंगळूर या शहरांशी उत्तम प्रकारे जोडलेले आहे. तिरुपती मंदिर हे देशातील एक श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते देशातून व जगभरातून पर्यटक या मंदिराला भेट देतात पर्यटनाच्यादृष्टीने या ठिकाणाचा मोठा विकास करण्यात आलेला आहे.