Рет қаралды 146
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।
!! तारक मंत्र !!
ह्या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे ...
जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे ...
ह्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काय तरी उपाय करताच ...
स्वामि नी आपल्याला हि अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन ...
तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे कि मी ,तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही ...
शेवटही ती स्वामींची शक्ती ...अगम्य शक्ती ...
हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरवात करा आणि
बघा तुमच्या शरीरीरात एक मानसिक बळ येते ते ..
आणि हो जर हा मंत्र तुम्ही हळू हळू म्हटला तर खूपच बळ ,शक्ती अंगात संचारते हा माझा आणि आपल्याच स्वामी भक्तांचा अनुभव आहेच ...
या मंत्रात एक कडवे आहे कि "अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी ,अशक्य हि शक्य करतील स्वामी ,,,
"फक्त आणि फक्त ह्या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असून द्या ...
ती तुम्ही सहजच मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किवा नातेवाईक म्हणतील असे तू काय करतो रे कि तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते ती ...
तेह्वा मनातल्या मनात स्वतः लाच बोला कि "माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत, ह्या जगाचा जो एकच मालक आहे.
ह्या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो ,सर्वांचे रक्षण करतो ...
असे स्वामी महाराज माझ्या मागे होते ...आहेत ...आणि .स्वामी सद्देव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही ...
कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्ष्यात आणले पाहिजे कि स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत ...
ते म्हणतात ना "भगवंताला.. माझ्या, आपल्या... स्वामिंना बघायला तशी दृष्टि असावी लागते "...