पन्नाशी उलटली माझी, तरीही शालेय अभ्यासक्रम, महविद्यालय मध्येही अशी सखोल माहीती नाही मिळाली. सदर व्हिडीओ मधून मिळाली...
@NagojiRao-r7c3 ай бұрын
आज पर्यंत कधीही ऐक ले न्ह वते. धन्यवाद सर 👌👌🙏
@shrikantjoshi45563 ай бұрын
बरोबर आहे .शाळेत शिकवत नाहीत .मी एका सह्याद्री वाहिनीच्या शालेय कार्यकमात बघीतले होते .साधारण 25 वर्षा पूर्वी
@sangeetabhandalkar90093 ай бұрын
Malahi
@abwaghmare3 ай бұрын
kharch. khup chan mahiti ahe.
@alkajoshi97413 ай бұрын
विषयाची ओळख उच्चारानुसार वर्णाक्षरेबाबत द्यावी. जसे की कण्ठव्य, ओष्ठव्य इत्यादी मग ही अनुनासिक अक्षरे कशी उच्चारावीत हे सहज उमगते.
@BalasahebGopale-nt6ri3 ай бұрын
खरोखर 99.99 शिक्षक ना च हे माहीत नव्हते परंतु आज खरी बाराखडी पूर्ण अर्थाने पूर्ण झाली फारफार आभारी आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
@yashwantchougale96942 ай бұрын
Yes
@SadhanaJoshi-h5d15 күн бұрын
खरोखरच खरे उच्चार समजले.खूप छान.
@kamleshthorat79013 ай бұрын
सुरवातीला वाटले की बारक्या शब्दाला 10 मिनिटांचा व्हिडिओ कशाला बनवला... मात्र जेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर त्यावेळेस माझं हे विचार करणे किती निरर्थक आहे हे लक्षात आलं. व्हिडिओ अतिशय छान आहे. खूप छान माहिती मिळाली. आनंद वाटला. ज्ञानात भर पडली. माझ्या कुटुंबीयांना तसेच इतरांना देखील मी आपल्या व्हिडिओ बद्दल आणि आपण दिलेल्या माहितीबद्दल सांगितले खूप खूप धन्यवाद अशाच व्हिडिओ चे स्वागत आहे..❤
@rekhamayekar87303 ай бұрын
धन्यवाद ⚘🙏🏼🙏🏼
@aniruddhachandekar18942 ай бұрын
शब्द नाही हो!! अक्षर आहे ते 😂
@jayashreemohite539928 күн бұрын
खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे हा
@shirishsherkar971321 күн бұрын
मला ही वाटले होते 10 मिनिटाचा व्हिडिओ नक्कीच वेळकाढू पणा केला असेल पण खरंच खूप छान व्हिडिओ
@diptinagwankar53623 күн бұрын
खूप सुंदर विडीओ... उत्तम माहिती 🙏🏻🙏🏻
@vaibhavmahajan4249Ай бұрын
वयाच्या ५५ व्या वर्षी मराठी भाषेतील मुळाक्षरे समजली.... धन्यवाद. मुळात मराठी शिकवायला अभ्यासु शिक्षक असणं आवश्यक आहे... क्षण
@smitaasalekar49553 ай бұрын
खूप धन्यवाद! संस्कृत मधील श्लोक, स्तौत्र वगैरे शिकतांना शुद्ध उच्चारात हा भाग आला होता विशेषतः संथा घेऊन शिकतांना... पण मराठीत इतकं सुंदर विस्ताराने अनुस्वाराबद्दलचे सखोल ज्ञान पहिल्यांदाच! खरंच धन्यवाद सर!
@charusheelabhosle23733 ай бұрын
सुंदर अक्षरात, सुंदर, सोप्या पध्दतीने आवश्यक माहिती दिलीत;गुरूवर्य धन्यवाद
@rajendrakulkarni68892 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती दिलीत. मी स्वतः संस्कृतचा अभ्यासक आहे, 20 वर्षे मुंबई विद्यापीठात प्राध्यापकी सुद्धा केली आहे. त्या अनुभवांती सांगू इच्छितो की, शुद्ध मराठी लुप्त होत चालली आहे, आणि शालेय शिक्षक सुद्धा चुकीचे शब्दप्रयोग आणि शब्दोच्चार करतात हे सर्रास दिसून येते, ही अत्यंत खेदाची बाब आहे. यांच्या दृष्टीने रस्त्यावर मित्र ही 'भेटतो' आणि दुकानांत वही-पेन सुद्धा 'भेटते'.🤨 पुढील पिढी घडवणे हे आपल्यासारख्या शिक्षकांचे आणि पालकांचे काम आहे. जाता जाता, कदाचित सवयीने असेल, पण आपले उच्चार सुद्धा 'न' च्या जागी 'ण' होतात, उदाहरणार्थ, अनुस्वार च्या जागी अणुस्वार, अनुनासिक च्या जागी अणुनासिक, 'कोणते' च्या जागी 'कोनते';. असे अनेक शब्द दाखवून देता येतील. त्यावर आपण थोडे काम करावे अशी आपल्याला प्रामाणिक शिक्षकी सूचना!
@Vjkk17692 ай бұрын
अगदी बरोब्बर!!! आपली मातृभाषा शुध्द बोलता यायलाच हवी, विशेषतः मराठी भाषेच्या शिक्षकांना तरी मराठी यायलाच हवी. सरांनी दिलेली माहिती आणि सांगण्याची पद्धत उत्तम आहे, पण ण आणि न हे उच्चार सदोष आहेत, ते सुधारण आवश्यक आहे
@vasudhadongargaonkar82692 ай бұрын
होय ! व्हिडिओचा उद्देश अत्युत्तम . हस्ताक्षर भगवंताचे देणे म्हणावे इतके सुरेख सौंदर्यपूर्ण ! निवेदनात सरांनी थोडे अधिक अभ्यासपूर्ण उच्चारण केले तर या प्रकारचे व्हिडीओ हे श्रीशारदा , सरस्वती यांच्यानंतर सुधीर फडके , लता - आशा यांच्यासारखे मायमराठीच्या चाहते आणि अभ्यासकांसाठी पथदर्शक ठरतील . मराठी या शब्दाचा उच्चारही थोडासा मराटी असा ऐकू येतो आहे - यात औद्ध्यत्व नाही : विनम्रतेने सांगू इच्छिते !
@kavitasoman7671Ай бұрын
मराठी,( मराटी) उच्चार नको.इतर माहिती छान दिली आहे.
@aumkarsanskarkendra-asmitadevАй бұрын
बरोबर.
@aumkarsanskarkendra-asmitadevАй бұрын
नाही आवडला व्हीडिओ. हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे. पण उच्चार नाही आवडले. ज्या *ञ* बद्दल हा व्हीडिओ आहे त्या ञ चाच उच्चार चुकीचा आहे. अन् संस्कृतमध्ये दोन शब्दही चुकीचे आहेत. खूप खंत वाटली हा व्हीडिओ बघून.
@sulbhachaudhari24813 ай бұрын
आताच्या विद्यार्थ्या ना आणि त्यांच्या आई वडिलांसाठी अतिशय अतिशय गरजेचा, उपयुक्त, आवश्यक असा हा व्हिडीओ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@surekhachavan75023 күн бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे सर आणि तुमचे अक्षर पद्धती अक्षर खूप सुंदर आहे धन्यवाद
@shrikantwajekar92273 ай бұрын
मी अत्यंत आभारी आहे. माझे वय आज ७२ आहे. माझी लहानपणापासून च्या शंकेचे आज समाधान झाले. धन्यवाद.
@shrikantshitole12 ай бұрын
आता सुखाने झोपा 😂
@shashankrao2652 ай бұрын
@@shrikantshitole1😂
@AIArise2 ай бұрын
@@shrikantshitole1😂
@VandanaNadarАй бұрын
😂@@shrikantshitole1
@subhashjadhav25884 күн бұрын
सुंदर खूपच अप्रतिम मराठी सोबत संस्कृत सुद्धा शिकायला मिळाली … खूप खूप धन्यवाद
@anandpatange05078826 күн бұрын
खूप सुंदर हस्ताक्षर आहे तुमचं
@anilgangurde47453 ай бұрын
बरेच लोक या शब्दाला मोबाइलच्या टायपिंग मध्ये ' त्र ' च्या ठिकाणी वापरतात..... पण माझ्याकडे वीवो कंपनीचा एक मोबाईल फोन होता त्या मोबाइलच्या कीबोर्ड मध्ये ' ज्ञ ' हा शब्द नव्हता मग मी खूप म्हणजे खूपच प्रयत्न केला व ज या अक्षराला ् अर्ध करुन ' ञ ' हा शब्द जोडला तर त्यात लगेचच ' ज्ञ ' हा शब्द आला ..... आणि मला खूप छान वाटले की, मी स्वतः माझ्या प्रयत्नांनी एक शोध लावला.... आणि आज तुम्ही देखील ' ञ ' या अक्षराची खूप छान माहिती दिली धन्यवाद सर 👍🏿
@nitinbakare2 күн бұрын
Va bhavgvan aahat tumhi.. Asech barach aahe prayatna kara
@PandurangPawar-b2z2 ай бұрын
धन्य आहे गुरुजी तुमची 80 वर्षात मला कोणीही शिकवले नाही ते तुम्ही मला तीस मिनिटांत शिकवले धन्यवाद
@dnyaneshwarseetasadashivga95722 күн бұрын
मराठी भाषा विषय शिक्षकांसाठी फार महत्त्वाचा विडियो..... खूप खूप धन्यवाद सर.... 🙏
@vag26123 ай бұрын
मला हे माहित होते पण आपण फारच छान समजावलेत... 👍🏻🙏 अनन्त, वसन्त, दङ्गा (दंगा), ऋञ्जी (रुञ्जी / रुंजी ) ,घडवञ्ची (घडवंची), टाङ्गा (टांगा), जाञ्घ (जांघ)
@shekharrojekar41832 ай бұрын
गुरूजी सलाम तुम्हाला. शिक्षक पेक्षा चा सन्मान वाढवला सर्व शिक्षकांनी आपल्या कडून प्रेरणा घ्यावी. संशोधक पर शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाव विद्यार्थी दिव्य करतील शंकाच नाही. खाजगी शिकवणी चि गरज नाही.
@umakantsamant406729 күн бұрын
😊फारच उपयुक्त माहिती. जणांना याची एवढी माहिती नसावी.अत्यंत आभारी. "मोत्याच्या दाण्या"सारखे अक्षर आहे सर आपले.मन:पूर्वक धन्यवाद सर😊🎉
@rkeducation23703 ай бұрын
अतिशय सुंदर स्पष्टीकरण मला पहिल्यांदाच अनुस्वाराचे एवढे प्रकार समजले हस्ताक्षर खूप सुंदर.
@Vicky_Hrim3 ай бұрын
He 10 minutes khup anmol ahet mazya ayushyatle ata . Dhanyawaad sir 😊❤❤
@tanishqshinde63882 ай бұрын
धन्यवाद सर , खूप च सुंदर हस्ताक्षर आहे तुमचे आणि समजावून सांगणे तर छानच . सगळे comments वाचताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बहुसंख्य प्रतिक्रिया या पन्नाशी आणि पुढील वयातील लोकांच्या आहेत . मी सुध्दा शिक्षिका म्हणून 32 वर्षे कार्यरत आहे पण कित्येक जण या बाबतीत अनभिज्ञ आहेत. प्रत्येकाने आपल्या माहिती तील प्रत्येक विद्यार्थ्याला हा व्हिडिओ दाखवला पाहिजे .
@harshuharshu142Ай бұрын
'त्र या अनुनासिकचा वापर पाली भाषेत सुद्धा आहे. सर ,आपण अत्यंत अनमोल आणि नवीन माहिती सांगितली ,धन्यवाद !
@satishsalunkhe3052 ай бұрын
खूप छान माहिती- -👍 पण भावलं ते आपलं हस्ताक्षर - - - अगदी टायपिंग सारखे आपले हस्तलेखन - - -खूपच म्हणजे खूपच सुंदर,अप्रतिम 👌
@Archanaarchu643 күн бұрын
Khupch sunder explain kelele aahe
@nagnathtapreАй бұрын
आदरणीय अमीत सर, तुम्ही खरचं नावीन्यपूर्ण माहिती दिली आहात. नक्कीच ही माहिती उदबोधक आहे. मराठी व संस्कृत याची सांगड घालून अनुनासिकाचा वापर कसा होतो हे मला तर आजच समजले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आपल्या हस्ताक्षराला सलाम सरजी. ञ चा व्हिडिओ पाहून बरेच शिकायला मिळाले. खूप खूप छान
@shobhalale89949 күн бұрын
पांडुरंग पुर्वी कसं लिहायचं?
@shobhalale89949 күн бұрын
लिहायचे
@geetanjalimatkar6247Ай бұрын
व्वा सर .... खरोखरंच अतिशय उपयुक्त माहिती... आणि खूप अभिमान वाटला आपल्या पूर्वजांचा किती सखोल वर्णमाला केली आहे... अतिशय ज्ञानी लोक होते... पण आज आपण काय शिकत आहोत याची खंतही वाटते....
@tanajikhemnar41313 ай бұрын
माझ्या 56वर्षाच्या आयुष्यात अशी माहिती कोनीही दिली नाही. ना शाळेत ना काॅलेज मधे. खूप खूप धन्यवाद सर.❤
@shripaddandekar88423 ай бұрын
कोणीही....
@vikrantvijayakar99823 ай бұрын
छान माहिती दिली आहेत ... अगदी सोप्या रीतीने ... अक्षर सुद्धा सुरेख आहे ... धन्यवाद !
@amrutam.chillale96822 ай бұрын
अन् = ञ खूप सुंदर हस्ताक्षर आहे सर तुमचे.खूप उपयुक्त माहिती दिली सर तुम्ही, खूप खूप धन्यवाद!!
@aniruddhanamjoshi52333 ай бұрын
अप्रतिम हस्ताक्षर!!! 👍👍👍👌👌👌
@gajananmahajan12323 ай бұрын
खूप धन्यवाद, वयाच्या साठाव्या वर्षी हे विस्तृत ज्ञान मिळाले!
@narendrashirke-re8bq24 күн бұрын
कोणताही शिक्षक एवढे समजून सांगणार नाही तेवढे तुम्ही सांगितले आहे फार सुंदर सांगितले आहेत मला तुमचा अभिमान वाटतो
@SunilPathak-w3vАй бұрын
भोरकडे दादा ... तुमचं सगळं पटलं.... पण..... मराठी वर ओझं म्हणणे भंपकपणाचे वाटले... वांगमय ( मोबाईल टायपिंग नुसार) हा शब्द ओझे कसा असेल... मुळात मराठी ही भाषाच संस्कृत पासुन तयार झालेली आहे... भाषा समृद्धी साठी हे शब्द अतिशय उपयुक्त आहेत... बाकीचा कन्टेन्ट पटल्यामुळे अगदी सौम्य भाषा वापरलीआहे.... आपले अक्षर उत्तम..❤❤
@jilanimulani56322 ай бұрын
खरंच सर अतिशय सुंदर माहिती दिली आहे . आताच्या पिढीला व्याकरणाची आवड दिसून येत नाही. तुमचं व्याकरण, हस्ताक्षर व उच्चार खरंच खूप छान वाटले.
@ganpati_kankarej2 ай бұрын
अत्यंत समर्पक माहिती, अशी माहिती अनुभवी,अगदी सेवा निवृत्ती ला पोहचलेले शिक्षक सुद्धा देऊ शकले नसते. खूप खूप धन्यवाद.
@mahadeomangulkar19573 ай бұрын
क,च, ट, त, प या वर्गाने होणारा अनुनसिकांचा उच्चार चांगल्या पद्धतीने समजाऊन सांगितला. धन्यवाद सर.
@kaminiarekar49933 ай бұрын
धन्यवाद! अतिशय उपयुक्त व्हिडिओ. योग्य उचारण व उदाहरण सहित.
@AnimeeditzZz_153 ай бұрын
सर्व मूळआक्षरांची माहिती साठी असेच व्हिडियो बनवा खूप छान माहिती
@pratimaprabhu32242 ай бұрын
I am 74 yrs.old studied in mincipality school still we were taught this in 1st std.( Pahili),but thanku for sharing ad our memoriseing our teachers efforts to give us correct teachings & importance of every step of learning.Thank u gor sharing 🙏🙏
@arunamhetre2185Ай бұрын
माझ्या चार वर्षाच्या मुलाला आजच मी क ते ज्ञ मुळाक्षर शिकवताना या दोन अक्षरांचा उच्चार काय?हे सांगू शकले नाही. याची मला आतून कुठेतरी खंत वाटत होती की या दोन उच्चारांचा अर्थ आम्हाला कुठल्याच शिक्षकांनी सांगितलं नसल्यामुळे मी माझ्या मुलाला सांगू शकत नव्हते. तेव्हाच मनात विचार आला होता युट्युब वर याची माहिती मिळाली तर बरं होईल आणि योगायोगाने तो व्हिडिओ दोनच तासांमध्ये मला मिळाला. 🥰 खूप छान पद्धतीने सरांनी समजून सांगितलं. व आजपर्यंत याबद्दल नसलेली माहिती मिळाली. खूप खूप मनापासून धन्यवाद सर 🙏
@beenakadam656619 күн бұрын
छान समजावले.आता भगवत गीता शिकताना खुप उपयोग झाला🙏
@gajanankisennanaware69873 ай бұрын
सर तूमचे आक्षर किती सुंदर आहे हो ! छान दुर्मीळ माहीती दिल्या बध्दल धन्यवाद ❤❤❤❤❤❤
@sumahu12319 күн бұрын
धन्यवाद, चांगली माहिती दिली आहे. खूपच मोठं काम करत आहात आपण. ञ त्याची बाराखडी वर क्लिप करावी. अ ते अ: नंतर येणारे चार स्वर आहेत. ऋ, ॠ, ऌ, ॡ ह्या स्वरांच्या बाबतीत पण क्लिप करावी, ही विनंती. आपण जर व्यंजन आणि स्वर वापरत नसू, तर सृष्टीतील त्यापासून निर्माण होणाऱ्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करत आहोत, हे लक्षात आणून देणं गरजेचे आहे
@maanojsurve13713 ай бұрын
फारच उपयुक्त माहिती. बालपणा पासून असलेल्या शंकेचे निरसन झाले.धन्यवाद!
@ShriSwamiSamarth302 ай бұрын
खूप सुंदर मराठी बाराखडीचा अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. मनापासून धन्यवाद. असे शिक्षण जर शिक्षकांनी दिले तर मराठीचा दर्जा सुधारण्यासाठी उपयोग होईल.
@sangeetapereira85652 ай бұрын
अप्रतिम मला आज हया अक्षराचा कसा वापर होतो ते माहित झाले. Thank you for sharing
@ArchanaShivalkar-l5s20 сағат бұрын
खुपच छान माहीत दिली. अनुस्वाराचा अर्थ अक्षराशी असेल अस माहीत नव्हत 🎉🎉
@AasifBagwan-z2u3 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली वयाच्या चाळीशीनंतर कळाले देवाघरी जाण्याअगोदर किमान येणाऱ्या पिढीलाही सांगता येईल👌💯✅
@sambhajishevate10373 ай бұрын
अप्रतिम अक्षर आहे. सर सांगण्याची रीत खुप सुंदर. 🎉
@nandagaikwad1010Ай бұрын
You are great sir🙏👌👌 Thank you so much, Sharing this useful vedeo 🙏👍👍
@sagarm.davari..lifeexperie58043 ай бұрын
छान सर... यालाच परस वर्ण संकल्पना म्हणतात . अनुस्वार असलेल्या अक्षारापुढे जे अक्षर असेल त्यातील अनुनासिक अक्षर अनुस्वार येतो.
@pradnyasankhe4020Ай бұрын
सर ज्ञानात मोलाची भर पाडली धन्यवाद🎉🎉
@deepakgurav73693 ай бұрын
धन्यवाद 🌹🙏🏻 सर !
@jaydattamadbhavikar11762 ай бұрын
आज प्रथमच हि माहिती मिळाली.धन्यवाद ! आपले अक्षर सुंदर आहे.
@sadhanaharpale33952 ай бұрын
आपले अक्षर कित्ती छान आहे, खूप छान माहिती
@shubhangijoshi4416Ай бұрын
व्वा खूपच छान समजावून सांगितले. हे माहित होते. पण आजकाल ञ हा स्वर सर्रास त्र साठी वापरला जातो.अगदी मराठी शाळांमध्ये पण असेच शिकवले जाते. आपण खूप छान शिकवले असे धडे मराठी शाळांमध्ये दिले पाहिजेत. धन्यवाद 🙏
@ABGameSOfficialАй бұрын
khup khup aabhar. asech video banavat raha hi vinanti (विनंती - विनन्ति) . dhanyavad Shiva Mangalam 🙏
@rosemariefernandes66003 ай бұрын
कित्ती सुरेख पडतीने तुम्ही समजावले म्हणून आभारी अहे
@sangeetakharde18612 ай бұрын
Khupch chan samjun sangitle.....aamcha गीतेचा क्लास चालू आहे .... खूप उपयोगी माहिती 👌👌👌
@Lata-e2c3 ай бұрын
सर खरच आज पर्यंत हे माहीत नव्हतं. खूप च महत्वाची माहिती दिली ,त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@pravinthakur98813 ай бұрын
💐🚩मान्यवर राम राम, 🙏खुप खुप आभार, अतिशय सुरेख आणी प्रभावित शिकवण आहे आपली , खुप खुप हार्दिक शुभेच्छा । 🌷🚩🙏
@snehalatapotadar24863 ай бұрын
खूपच सुंदर sir.बऱ्याच जणांना हे अक्षर उचार्ता येत नाही चुकीचा शिकवला जातो.dhanyawad.,❤
@smitabivalkar34943 ай бұрын
उच्चारता असा शब्द आहे उचार्ता असा नाही.
@pakharemsАй бұрын
इतक्या वर्षांनी म्हणजे साठीनंतर शब्दांचे योग्य उच्चार कळले. खूप खूप धन्यवाद.
@vijaykumarsupekar5053 ай бұрын
अप्रतिम हस्ताक्षर, शिकवण्याची पद्धत अति सुंदर.
@pallavipagar592817 күн бұрын
Sir, तुम्ही दिलेली माहिती खुपच महत्त्वाची आहे
@kiranvaidya94402 ай бұрын
छान शिकवले आहे. आपले अक्षर अतिशय सुरेख आहे. एखादा फाँट असावा लिहिण्याचा तसे आहे. सुंदर!
@diptiambekar95643 ай бұрын
सर ..खरच खूप खूप धन्यवाद....आजपर्यंत च्या अनुत्तरीत शंकांचे तुम्ही फार सुंदर रित्या विश्लेषण करून दाखवलेत ...🙏🙏
@shashishekharshinde32112 ай бұрын
मी याच पद्धतीने शिकवले. शुद्ध लेखन ४१ नियम . वाळींबे यांचे पुस्तक आहे . दुर्दैव असे की या प्रमाणे सर्व शिक्षक शिकवीत नाहीत.
@deepakgurav73693 ай бұрын
माझी साठी जवळजवळ आहे आणि आता ह्या अक्षराच्या कोड्याच्या ओझातून मुक्त झालो. खरच अप्रतिम विडिओ डाऊनलोड झाला आहे. आपलं ऋण झाले आहे आज. त्यामुळे हा विडिओ माझ्या मित्रांना शेअर केला!
@amitbhorkade3 ай бұрын
@everyone वरील video मध्ये न आणि ण च्या उच्चारात साम्य वाटते. आहे. त्याबद्दल मी माफी मागतो. हा video एका online कार्यशाळेच्या निमित्ताने केला होता. तोच आता इथे you tube वर पोस्ट केला. त्यावेळी सर्दी मुळे माझे उच्चार योग्य होत नव्हते. तेच आता अनेकजण दाखवत आहेत. असो. चुकीच्या गोष्टी घेवू नकात, पण video चा मुख्य विषय आहे . त्याकडे लक्ष द्यावे. न आणि ण मधील उच्चारातील फरक लवकरच पोस्ट करेन. धन्यवाद
@alkajoshi97413 ай бұрын
@@amitbhorkade नमस्कार, ट ठ ड ढ ण ही मूर्धन्य अक्षरे आहेत. जीभ किंचित मुडपून टाळूला मध्यभागी लावून ही कठोर अक्षरे उच्चारली जातात. न हे अक्षर दन्तव्य म्हणजे जीभेचा दाताला स्पर्श करून उच्चारले जाते.
@anjalibhagwat94732 ай бұрын
न व ण ह्यावर विडिओ करा. लोकांना दोन्ही अक्षर माहीत आहेत पण ते न चुकता ण ला न, व न ला ण च म्हणतात. असंच बोलतात. तुम्ही सर्दी मुळे बोललात असं म्हणता, त्या मुळे पुढच्या विडिओ ची सर्व जण वाटत पहात आहोत.
@kailasudavant18923 ай бұрын
आपण खूपच छान माहिती दिली आहे आपले मन पूर्वक आभार संस्कृत भाषेतील बरेशे मंत्र अशा रितीने लिहिले असून आम्हाला याचा उच्चार करता येत नव्हताआता हा व्हिडिओ पाहून अशा प्रकारे लिहिलेल्या मंत्राचा उच्चार करता येईल धन्यवाद
@madhavileparle3 ай бұрын
छान उपयुक्त व्हिडिओ!इतर भाषांमधून शब्द घेऊनही मराठी भाषा समृद्ध झाली आहे.मराठीची मातृभाषा संस्कृत मधून तर हक्कानेच शब्द घेण्यात काहीच प्रत्यवाय नाही.
@umeshjagdale77432 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏🙏
@OdyversАй бұрын
मस्त चलचित्र 👍
@tusharbhavsar606515 күн бұрын
विडिओ ❌️ चलचित्र ✅️
@Odyvers15 күн бұрын
@tusharbhavsar6065 बरोबर
@shubhanginakhe18902 ай бұрын
व्हिडिओ छान माहितीपूर्ण केला आहे धन्यवाद सर🙏
@satishkumbhakarna96663 ай бұрын
खुप सोप्या पद्धतीने संकल्पना मांडली खुप छान सर
@priyankakulkarni33962 ай бұрын
अतिशय योग्य माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻 तुमचे अक्षर अगदी सुरेख आहे 👌🏻👌🏻
@poojadesai12683 ай бұрын
खूप सुंदर समजून सांगण्याची पद्धत पण एकदम मस्त
@SHARAyu3692 ай бұрын
वाह...खूप सुंदर... धन्यवाद सर 🙏🏻
@emptyness13183 ай бұрын
खूपच सोप्या पद्धतीने समजावून सांगितले सर धन्यवाद.
@meeraprabhune40673 ай бұрын
खूप छान वाटले ऐकून, शाळेत शिकलो होतो, पण आज recollect झाले. खूप खूप धन्यवाद!!🙏शिक्षक दिनानिमित्त नमस्कार
@AartiVelankar3 ай бұрын
छान पद्धत आहे शिकवण्याची 👍👌🙏
@rohansalunkhe553Ай бұрын
Thankful and grateful for precious information 🎉🎉🎉🎉
@vaishalipatki5813 ай бұрын
अक्षर खूप छान आहे उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर
@Pokemon12345-n2 ай бұрын
Great information. Ashyach mahitipurn video chi apeksha ahe.
@ashokvishwsrao99323 ай бұрын
व्हीडीओ खूप छान बनविला आहे. पण पंप ,आंबा ,पंत या शब्दाचे उच्चारण सांगताना आपण शेवटचे ( अन्त्य) अक्षरावर अनूस्वार उच्चारण अवलंबून असल्याचे सांगीतले आहे. त्याऐवजी अनुस्वारा नंतर येणारा वर्ण कोणता (कोणत्या गटातील) त्यावर अनुस्वार उच्चारण अबलंबून आहे असे सांगणे संयूक्तीक होईल, असे वाटते.
@amitbhorkade3 ай бұрын
@@ashokvishwsrao9932 बरोबर आहे आपले
@forbzonly11382 ай бұрын
Such clarity in explanation 🙏🙏
@kanchanvekhande66343 ай бұрын
अक्षर खूपच सुंदर 😊😊
@Datta_822 ай бұрын
अतिशय सोप्या आणि शास्त्र शुध्द पद्धतीने समजून सांगितले सर........खूप खूप धन्यवाद....
@ashakulkarny97933 ай бұрын
Kahi shabda kase lihave te please sangave video var ध्रुव ki धृव
@MaheshL-un1gk2 ай бұрын
आपल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल धन्यवाद आणि खुप खूप आभार.... आपले हस्ताक्षर मोत्याहून आखीव रेखीव अन सुंदर विलोभनीय.... एक सेकंद सुद्धा video मधून बाहेर पडता आले नाही 👏🏻🙏🏻😊
@smitiajgaonkar51593 ай бұрын
खूप छान माहिती आहे. पण आधीच माफी मागून एक विनंती करते की न च्या ऐवजी ण म्हणू नये व ण च्या ऐवजी न म्हणू नये. जसे की अणुस्वार न म्हणता अनुस्वार म्हणावे. अणुवाद न म्हणता अनुवाद म्हणावे. पानी व दुकाण असे न म्हणता पाणी व दुकान असे म्हणावे. तुम्ही उत्तम शिक्षक आहात असे दिसते, म्हणून तुम्हाला विनंती केली.
@prabhakarkadam87523 ай бұрын
व्वा मस्त 😊
@ApnaBollywood-shiv3 ай бұрын
मला एक शब्द कळत नाही.. प्रतिष्ठान की प्रतिष्ठाण?
@Hello-ll5eo3 ай бұрын
शहरातली बावळट लोक असणार ला अश्णार म्हणतात. सिरियल मधल्या फालतू नायिका. किती घाण वाटत ते. शी
@Hello-ll5eo3 ай бұрын
अशनार , नशनार 😂
@vinaynandgaonkar23983 ай бұрын
हो ना, आम्ही प्रतिष्ठान असे शिकलो पण अलीकडे बऱ्याच ठिकाणी प्रतिष्ठाण असे लिहिलेले आढळते…
@satyajeetbhosale67823 ай бұрын
आज youtube वरुन काहीतरी शिकल्या सारखे वाटतय.. 😂 मराठी शाळेत शिकून सुद्धा हे अजून पर्यंत कोणी सांगितले नाही.. मागील महिन्यात English मीडियम मधल्या माझ्या मुलीने नि बायकोने प्रश्न केला होता.. तेव्हा माझ्याकडे उत्तर नव्हते.. काय उपयोग म्हणुन माझ्यावर हसत होते..😂 आज उत्तर आहे माझ्याकडे 😂😂😂
@drkishorrathi2 ай бұрын
अतिशय उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! शाळा शिकतं असतानासुद्धा इतुके माहितीप्रद ज्ञान गुरू जनांनी दिले नाही. मराठी भाषा संवर्धना साठी विविध विषयांवर अशिच बोधप्रद माहिती आपण भविष्यातही द्याल अशी आशा बाळगतो. पुन:श्च एकदा खूप खूप धन्यवाद ! 🙏🙏🙏
@ratnakarjoshi10903 ай бұрын
याच प्रमाणे, ऋ, ऋ ,लृ, लृ वगैरे मूलक्षराबद्दल सविस्तरपणे माहिती द्यावी, धन्यवाद