Ambabai (Mahalaxmi) Chaitra Hindola Pooja ( Akshay Trutiya ) 2024

  Рет қаралды 4,307

VAM Photo Studio

VAM Photo Studio

Күн бұрын

Ambabai (Mahalaxmi) Chaitra Hindola Pooja ( Akshay Trutiya ) 2024 #kolhapur #instagram #vamphotostudio #festival #bhfyp
आज अक्षय तृतीया बोली भाषेत आखिती. मला हेच नाव खूप आवडते कारण आख्खी तिज हे या शब्दाचं मूळ . आख्खी म्हणजे अखंड जी कधी सरत नाही ती. मनुष्याला हे कायम सगळ्या चांगल्या गोष्टी अखंड हव्या असतात. म्हणूनच या तीजेला महत्व आहे. खरतर ही तृतीया जशी देवांची तशीच पितरांची त्याहून अधिक सर्वांच्या तृप्तीची. वैशाख वणव्यात पोळणाऱ्या प्रत्येकाला शांत करण्यासाठी. म्हणूनच आजच्या दिवशी महत्व असतं ते थंडावा देणाऱ्या वस्तूंच्या दानाचं त्याच बरोबर शेतकरी बांधवांसाठी पहिल्या पेरणीचं . ही पेरणी शेतातली नाही तर परसातल्या भाजीपाल्याची. आळ्यातल्या वेलांची.
याच दिवशी कोल्हापूरकर आतुरतेने वाट बघतात ती संध्याकाळ ची. आज आमची आई अंबाबाई झुल्यावर बसणार ! संध्याकाळी चार वाजले की देवीचे चोपदार वाजंत्री आईला बोलावण करायला गाभाऱ्यात जातात. तोवर इकडे गरुड मंडपात चांदीनं मढवलेलं सिंहासन फुलांनी सजवून चारी बाजूंनी दोऱ्या बांधून गरुड मंडपाच्या लाकडी छताला ( याला तख्तपोशी म्हणतात) बांधल जातं. साधं खणाच वस्त्र नेसून आई साहेब पुजाऱ्यांच्या हातातून सनई ताशाच्या नादात मंडपात येतात. रथोत्सवा प्रमाणे हवालदार खांडेकर दागिने घेऊन हजर होतात. आज अंबाबाई जगन्माता म्हणून नाही तर एखाद्या नवपरिणीते प्रमाणं सगळ कोडकौतुक करून घेते. साज ,चाफेकळी, मोहनमाळ, तन्मणी अशा अनेक पारंपरिक दागिन्यांबरोबर तीचा खास रत्नजडीत किरीट कुंडलं असे दागिने घालते. देवीचा शृंगार पूर्ण झाला की पुजाऱ्यांच्या घरच्या स्त्रीयां , देवीच्या शागिर्दाने देवस्थानच्या स्वयंपाकघरातला तसेच आपल्या घरुन आणलेली कैरीची डाळ, पन्हं पानसुपारी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ला देऊन गरुड मंडपात येतात. मग सुरू होतो करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी च्या चैत्री हळदीकुंकवाचा सोहळा. चोपदार झोके देतायत आणि आई अंबाबाई सनई चौघड्याच्या तालावर मंद झुलतेय. रात्री आठ वाजेपर्यंत हा सोहळा असाच रंगतो. महिला येतात हळदीकुंकू करतात. दरवर्षी च हे दृश्य .
हा दोलोत्सव अर्थात हिंदोळा हे प्रतिक आहे बदलत्या सृष्टी चक्राचं . झोपाळ्यावर बसून झुलणारी जगदंबा मूर्त रुप आहे या सृष्टीचं जिला वसंत ऋतू च्या रुपानं नवनिर्मिती ची चाहूल लागली आहे.तिचा सृजनाचा सोहळा चैत्राला सुरू झाला. म्हणून एखाद्या नवयुवती प्रमाणे ती झोपाळ्यावर बसून झुलतेय. हा नवनिर्मिती चा सोहळा पूर्ण होईल अश्विनाला जेव्हा भरलेल्या पिकासह ती आपलं जगन्माता हे नाव सार्थ करेल. पण आज ती कुणाची स्वामिनी नाही असुर मर्दिनी नाही तर आज ती आहे एक सृजनाला आतुर मुग्धा, आपल्याच विश्वात रमलेली सौंदर्यवती मानिनी . आज खरतर तिला काहीच मागू नये कारण ती तिच्या आनंदात रममाण आहे.
श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः
About VAM Photo Studio :
Website:- www.vamphotostu...
_________________________________________________________________________________________________
Instagram:- / vamphotostu. .
_________________________________________________________________________________________________
Facebook:- / vamphotostudio
_________________________________________________________________________________________________
Twitter:- / vamphotostudio
_________________________________________________________________________________________________
KZbin:- www.youtube.co....
*****************************************************************************************************
#Kolhapur #Maharashtrianwedding #Vamphotostudio #wedding #bride #love #weddingphotography #weddingday #weddingdress #weddinginspiration #photography #fashion #weddingplanner #makeup #bridal #bridetobe #prewedding #weddingphotographer #groom #weddings #party #engagement #instagood #weddingideas #like #indianwedding #instagram #makeupartist #photooftheday #beautiful #flowers #weddingdecor #bhfyp

Пікірлер: 17
@alexgates5202
@alexgates5202 5 ай бұрын
ओम् श्री महालक्ष्मी नमो नमः 🌺🌺🙏🙏🙇🙏🙏
@supriyachavan4037
@supriyachavan4037 5 ай бұрын
अक्षय तृतीया निम्मित शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prashantjadhav8880
@prashantjadhav8880 5 ай бұрын
हिंदोळा महापूजा अप्रतिम नारायणी नारायणी❤🌷🌷🌷🌷🌷🙏
@rushanksuryavanshi8048
@rushanksuryavanshi8048 5 ай бұрын
।। श्री आई अंबाबाई प्रसन्न ।। 🙏🌺🌹💮☘️💮🌹🌺🙏 सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।। 🙏🏻🙏🏻🌺🌺🌼🌼💐💐🌹🌹🌸🌸🙏🏻🙏🏻
@akshaypilwalkar2296
@akshaypilwalkar2296 5 ай бұрын
करवीरनिवासिनीचा दोलोत्सव अप्रतिम 🌺🙏🏻✨💫
@pallavimore5618
@pallavimore5618 5 ай бұрын
Om shree Mahalakshmi devaiy namaha 🌷 🙏
@vrushalipande1924
@vrushalipande1924 5 ай бұрын
जय अंबे 😊
@Spritual_1212
@Spritual_1212 5 ай бұрын
आई आंबा बाई‌ अर्थातच महालक्ष्मी नेहमी आपल्या भक्तांना वरती कृपा करते ,या उत्सवात सुध्दा आई कृपा करेल ...
@vishwajeetkhedekar1650
@vishwajeetkhedekar1650 5 ай бұрын
Aai Mahalaxmi Mate Namo Nam
@aniruddhabehere9836
@aniruddhabehere9836 5 ай бұрын
Pranaam to Parashakti Ambabaai staying in your heart ❤️ 🎉🎉🎉🎉🎉🎉
@SarikaAshtekar-cc8pp
@SarikaAshtekar-cc8pp 5 ай бұрын
Aai saheb love you 🙏🙏🌺🌺😘😘💞💞💕💕
@dipalilaykar3607
@dipalilaykar3607 5 ай бұрын
Om namo narayanai nam🙏🏻🙏🏻🙏🏻
@ananda118
@ananda118 5 ай бұрын
🌷🌟JAI MAA LAXMI JI🌟🌷
@arunaamdekar1397
@arunaamdekar1397 5 ай бұрын
🙏🙏🙏🙏🎉
@sangeetachougalespoem3099
@sangeetachougalespoem3099 5 ай бұрын
🙏🙏🌹🌹🙏🙏
@dineshshingare9170
@dineshshingare9170 5 ай бұрын
मानुन घे आई
@umeshpatil3502
@umeshpatil3502 5 ай бұрын
आई अंबाबाई चा उदो उदो
DID A VAMPIRE BECOME A DOG FOR A HUMAN? 😳😳😳
00:56
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 89 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
Powerful Podcast with Namrata bhat Tai | Swaminni sakshat darshan dile | 116 pustaka lihile | swami
1:02:52
स्वामी भक्ति केंद्र - Swami Bhakti Kendra
Рет қаралды 26 М.
KOHALA PANCHAMI KOLHAPUR I DOCUMENTRY 2024
17:08
Chaya Chitra Kop
Рет қаралды 384
Ambabai (Mahalaxmi) Chaitra Hindola Pooja ( Akshay Trutiya ) 2023
2:20
VAM Photo Studio
Рет қаралды 3,1 М.
Kolhapur Mahalaxmi Temple Tour | HH Radhanath Swami
16:13
RG Media
Рет қаралды 364 М.
Aigiri Nandini  I Mahishasur Mardini Stothram I Sooryagayathri
13:33
Sooryagayathri
Рет қаралды 6 МЛН
Mahalaxmi Rathostav 2021
3:21
VAM Photo Studio
Рет қаралды 27 М.
DID A VAMPIRE BECOME A DOG FOR A HUMAN? 😳😳😳
00:56