बहादुरवाडी किल्ला | या किल्ल्यात आहे ,रक्ताची विहीर ! Bahadurwadi Bhuikot Sangli |

  Рет қаралды 10,783

Anand Shidture

Anand Shidture

4 ай бұрын

बहादुरवाडी किल्ला .या किल्ल्यात आहे ,रक्ताची विहीर ! Bahadurwadi Bhuikot Sangli
बहादूरवाडी किल्ला
किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
जिल्हा: सांगली
तालुका: वाळवा
येडे निपाणी येथील विलासगड किल्ल्यापासून कोल्हापूरच्या रस्त्याने पुढे गेल्यावर बहादूरवाडी फाटा आहे. या गावात अपरिचित भुईकोट आहे. या कोटाची अवस्था पाहता खुद्द गावातल्यांनाही त्याबद्दलची आत्मीयता वाटत नाही हे सहज लक्षात येते. पण प्रथमदर्शनीच हा कोट मोहात पाडतो.
कोल्हापूर व सातारा ह्या मराठ्यांच्या दोन गाद्या होत्या. त्यांच्या सीमेवर संरक्षणासाठी बहादूरवाडी येथे माधवराव पेशव्यांनी बहादूरवाडी किल्ला बांधला आणि तो सांगलीच्या पटवर्धनांच्या ताब्यात देऊन कोल्हापूरकरांवर वचक बसवण्यासाठी याचा उपयोग केला गेला. पुढे पटवर्धनांनी किल्ला मुधोळकर घोरपडे यांच्या ताब्यात दिला.
किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर चारही बाजूंनी खंदक खोदलेला होता. त्यात आत्ता झाडी माजलेली आहे. मुख्य प्रवेशव्दार समोरील खंदक बुजवऊन किल्ल्यात जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन बुरुज आहेत त्यांची डागडूजी केलेली आहे. त्यातील उजव्या बुरुजाच्या बाहेर गणपतीची मुर्ती आहे. त्यामुळे या जागेचे सुशोभिकरण करुन फ़रशा बसवलेल्या आहेत. प्रवेशव्दारातून आत गेल्यावर पाहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दारावर जाण्यासाठी जीना आहे. किल्लाला दोन तटबंद्या आहेत. बाहेरील तटबंदीत १८ बुरुज आहेत तर आतील तटबंदीत ८ बुरुज आहेत. बुरुज आणि तटबंदी दगडांनी बांधलेले असून त्यावर वीटांचे बांधकाम आहे. तटबंदी आणि बुरुजामध्ये जंग्या आणि झरोके आहेत. प्रवेशव्दातून आत शिरल्यावर मोकळी जागा आहे. त्यासमोरील तटबंदीत खोल्या आहेत त्यांना चार दरवाजे आहेत. या ठिकाणी घोड्यांच्या पागा होत्या असे सांगतात. सगळीकडे प्रचंड झाडी माजलेली दिसते, त्यात किल्ल्याचे सगळे अवशेष हरवून गेलेले आहेत. प्रवेशव्दारापासून सरळ पुढे गेल्यावर पायऱ्या असलेली खोल विहिर हौद आणि तुळशी वृंदावन आहे. किल्ल्याच्या आत पडझड झालेल्या काही वास्तू आहेत. बहादूरवाडीगड सांगली जिल्ह्यात असला तरी कोल्हापूरपासून केवळ ३५ किलोमीटरवर आहे.‪@AnandShidture‬

Пікірлер: 27
@saurabhraut7463
@saurabhraut7463 4 ай бұрын
छान माहिती दिली 👍
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
Thanks Saurabh Bhau
@sanjayshirode976
@sanjayshirode976 4 ай бұрын
खुपच छान माहिती दिली आहे दादा सरांनी गड किल्ले संवर्धन ही काळाची गरज आहे यावर खूप चांगली माहिती दिली आहे सर्वांचे आभार🙏💕🙏💕 👍👍👌🙏🚩
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद ❤️संजय भाऊ 🙏💛
@shivajidevkar3840
@shivajidevkar3840 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद देवकर सर 🙏😊 असाच सपोर्ट राहुद्या 🙏 जय शिवराय 🚩🙏
@ganeshparte6134
@ganeshparte6134 3 ай бұрын
Bhava kadak😊
@AnandShidture
@AnandShidture 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद भावा🙏😊
@pankajdesavale2037
@pankajdesavale2037 4 ай бұрын
No 1 My Village...🚩
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
भारी आहे गाव.आणि गावातील माणसं सुद्धा 👌👌👌😊
@pankajdesavale2037
@pankajdesavale2037 4 ай бұрын
@@AnandShidture Thanks
@sachinmadane8268
@sachinmadane8268 4 ай бұрын
छान माहिती दिली... सरांनी 👍👌🚩 👑जय शिवराय 👑जय शंभूराजे 🚩.... धन्यवाद 🚩💐
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
जय शिवराय 🚩🙏 जय शंभुराजे 🙏😊 जय महाराष्ट्र 🙏 खुप खुप धन्यवाद.असाच सपोर्ट राहुद्या 🙏😊
@krishnatkumbhar1326
@krishnatkumbhar1326 4 ай бұрын
आम्ही नेहमी जातो पण तेथे किल्ला आहे असे आम्हास माहित नव्हते पण तुमच्यामुळे हे समजले. आभारी आहोत. आम्ही नक्की भेट देऊ
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद भाऊ 🙏 नक्कीच भेट द्या.चैनलला सपोर्ट असाच राहुद्या
@digambarchavan2369
@digambarchavan2369 4 ай бұрын
सुंदर आहे
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद भाऊ 🙏
@vijaypatil3249
@vijaypatil3249 4 ай бұрын
१नबंर माहिती मिळाली
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद विजय सर 🙏😊
@balajikakade8517
@balajikakade8517 4 ай бұрын
🌷🚩🚩🚩
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
Thank you 👍🙏
@webahujan
@webahujan 4 ай бұрын
❤❤❤
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद 🙏
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 24 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 38 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 14 МЛН
🚩 नावाप्रमाणे विशाल असणारा विशाळगड कोल्हापूर 🚩VishalGaD-KolhapuR 🚩किल्ला क्रमांक:-५०🚩
11:22
शनिवार वाडा आणि पेशवे
8:09
Maratha History
Рет қаралды 15 М.
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 24 МЛН