Рет қаралды 56,881
#BolBhidu #AjitPawarvsSharadPawar #NCP
महायुतीत जागा वाटपावरून सातत्याने खटके उडत आहेत. कोण किती जागा लढवणार, याचा फॉर्म्युला अजून फायनल झाला नाहीये. असं असताना भाजप १५० तर शिंदे गट १०० जागा लढण्यावर ठाम आहे. या दोन पक्षांच्या रस्सीखेचात अजित पवार गट मात्र बॅकफुटला गेल्याचं चित्र आहे. लोकसभेचा परफॉरमन्स पाहता विधानसभेला अजित पवार गटाच्या अनेक जागा मायनस होऊ शकतात, असं बोललं जातंय. लोकसभेत फटका बसल्यानंतर अजित पवारांनी पिंक पॉलिटीक्स करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राज्यभर जनसन्मान यात्रा काढत माझी लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार केला. पण त्यांनी केलेल्या इव्हेंटबाजीमुळे याचा इम्पॅक्ट निगेटीव्ह झाल्याची चर्चा आहे. शिवाय मावळचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. मावळमध्ये अजित पवार गटाला मदत करायची नाही.
वेळ पडली तर तुतारीला साथ द्यायची, असा प्रचार भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय, असा आरोप शेळके यांनी केलाय. एकूणच युतीच्या राजकारणात अजित पवार गटाच्या अडचणी वाढताना दिसतायत. हे कमी होतं म्हणून की काय आता ऐन विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांनी डाव टाकल्याची चर्चा आहे. त्यांनी घड्याळ चिन्ह गोठवण्यासाठी न्यायालयात धाव घेतलीय. यामुळे अजित पवारांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता घड्याळ चिन्ह गोठवलं जाऊ शकतं का? चिन्ह गोठवलं तर याचा फटका अजित पवार गटाला कसा बसू शकतो? अजित पवारांसमोर नेमक्या अडचणी काय आहेत? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/