Рет қаралды 29,678
#BolBhidu #SharadPawar #AjitPawar
दिल्लीत नेमकं काय ठरलं, राष्ट्रवादी पवार गट अजित पवार गटात मर्ज होणार, की स्वतंत्रपणे आपलं अस्तित्व कायम ठेवून महायुतीसोबत जाणार. भाजप शरद पवार गटाचं अस्तित्व मान्य करत महायुतीत सामिल होणारा तिसरा घटक पक्ष म्हणून पवार गटाला सोबत घेणार. सध्या याच चर्चा सुरू आहेत. काल शरद पवारांचा वाढदिवस होता, या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवारांनी सहकुटूंब शरद पवारांची भेट घेतली. पण त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे व पक्षाचे इतर वरिष्ठ नेते देखील सोबत होते. पर्यायाने ही भेट फक्त कौटुंबिक राहिली नाही. त्यानंतर दिल्लीतील अदानी यांच्या निवासस्थानी शरद पवार गटाचे नेते आणि भाजपचे वरिष्ठ नेते अशी भेट झाल्याची बातमी सुत्रांच्या माध्यमातून समोर आली. अमित शहा शरद पवारांना भेटतील अशाही बातम्या आल्या.
अर्थात काल दिवसभरात भाजपचे नेते आणि शरद पवार गटाचे नेते, अजित पवार व शरद पवार यांची भेट अशा घडामोडी घडल्या.पर्यायाने पवार निवृत्ती स्विकारून आपला पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मर्ज करणार असं बोललं जातय, तर अस काही होणार नाही. उलटपक्षी पवार स्वत:च अस्तित्व कायम ठेवून महायुतीसोबत जाणार असेही दावे केले जातायत. अर्थात हे दावे का होतायत, अस काही घडू शकतं का? आणि घडलं तर नेमकं काय घडेल पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/