Рет қаралды 10,459
बुरशीजन्य रोगांचा मूळापासून सर्वनाश कसा करता येईल बुरशी वरील रामबाण उपाय
Trichoderma viride BUY FROM AMAZON amzn.to/3a1lU0a
ट्रायकोडर्मा विरिडी ही एक बुरशी असून हे एक प्रकारचे जैविक #बुरशीनाशक आहे. विशेष करून पिकांच्या मुळी आणि कंद यावर येणारे बुरशीजन्य आजार नष्ट करण्यासाठी या बुरशीचा मित्र बुरशी म्हणून वापर केला जातो. या बुरशीचा वापर पेरणीपूर्वी बियाण्यांवर तसेच पीक उगवल्यावर होणाऱ्या कंदकुज आणि मूळकूज या आजारावर जमिनीतून ठिबक अथवा ड्रीचिंग द्वारे केला जातो.ट्रायकोडर्मा विरीडी, ट्रायकोडर्मा हारझीनियम आणि ट्रायकोडर्मा हॅमटम या बुरशी असून या मर, मूळकूज, खोडकूज, फळकूज रोग नियंत्रण करण्याकरिता उपयोग होतो.
*या बुरशी हानीकारक बुरशी ( फायटोप्थोरा, पिथीयम, फ्युजेरियम, स्केलेरेशीयम व रायझोक्टोनिया तंतूभोवती गुंडाळले जातात व त्यातील अन्नद्रव्ये शोषून घेतात. ट्रायकोडर्मा’ हि हिरव्या रंगाची एक प्रकारची उपयुक्त बुरशी/कवक आहे. ट्रायकोडर्मा बुरशी विशेषतः मातीतून उद्भवणाऱ्या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी एक फार प्रभावी जैविक पद्धत आहे. रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा वापर पिकावरील रोग नियंत्रणासाठी होत आहे. अत्यंत कमी खर्चात ट्रायकोडर्मा ट्रीटमेंट आहे. ट्रायकोडर्मा शेतकऱ्यांना ऐक वरदान आहे. ट्रायकोडर्माचा विविध ७० प्रजाती पैकी ट्रायकोडर्मा व्हिरीडी, ट्रायकोडर्मा हर्जीयानम, ट्रायकोडर्मा अस्पेरेलीयम, ट्रायकोडर्मा अट्रोव्हीरीडी, ट्रायकोडर्मा हम्याटम या मोठ्या प्रमाणात जैविक नियंत्रणात वापरल्या जातात. रोगकारक बुरशींमुळे कापूस, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला, फळपिके व ऊस अशा विविध पिकांवर मूळकूज, खोडकुज, कॉलर रॉट, मर रोग, कंद सड ई. रोग होतात, त्यामुळे पिकाचे नुकसान होते. जमिनीत असणाऱ्या हानिकारक, रोगकारक बुरशी - जसे पिथिअम, फायटोप्थोरा, मॅक्रोफोमिना, स्क्लेरोशिअम, रायझोक्टोनिया, फ्युजॅरिअम, इत्यादींचा नियंत्रणसाठी ट्रायकोडर्माचा वापर करणे फायद्याचे ठरते
परिणामी हानीकारक बुरशी मरतात.
या बुरशी काही प्रकारची एनझाईम निर्मिती करतात.
जी हानीकारक बुरशींना प्रतिबंध करतात. #Trichoderma_viride
**प्रमाण :---
*******
*फवारणी ---- 5 मिली/ग्रॅम प्रति लिटर.
*बियाणे ---- 10 मिली/ग्रॅम प्रति किलो.
*जमिनीतून ---- 2 लिटर प्रति एकर.
***अॅम्पीलोमायसीस :--- ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन play.google.co...
🌐 वेबसाइट - www.agrowone.com
👍 फेसबुक - / agrowone
📸 इंस्टाग्राम - / agrowone
ट्विटर - / agrowone
टेलेग्राम - t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone