मिलिंद शिंत्रे यांची मुलाखत अतिशय परखड,आणि वास्तववादी उत्तर, खरंच लोकांनी विचार करण्याची गरज आहे.आणि आता पुणे बदलतंय,त्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि धार्मिक वारसा जपायला हवा.
@SUNITAJOSHI-yf1eb25 күн бұрын
खूप दिवसानी परिपूर्ण पुणेकरची मुलाखत ऐकायला मिळाली, शुद्ध पुणेरी भाषा, पुणेरी हावभाव, हातवारे बघताना मजा आली व अजून जुने पुणे जरी बदलले असले तरी खरे पुणेकर तसेच आहेत याबद्दल खूप समाधान वाटले.
@कोकिलावाघ20 күн бұрын
🎉मजा आली. अस्सल पूणेकरा ना भेटल्यावर खूप मजा आली.
@SUNITAJOSHI-yf1eb20 күн бұрын
आम्ही नगरकर, पण सर्व सुट्टय़ा पुण्यात मावशी मामा कडे गेले. त्यामुळे लहानपणापासून पुणे खूपच आवडते शहर आहे माझे दुसरे कोणतेच नाही, पुण्यात आपटे रोड ला आवटे वाड्यात मोठी मावशी 2 खोल्यात राहायची, आधी पुण्यात तिचेच घर असल्याने सगळे नातेवाईक काही कामानिमित्त सतत असत. काकाही खुपच चांगले होते, त्यांची 5-6 मुले व आमची भर पण कधीही कोणीही नाराजी दाखवली नाही, उलट गेले की matini show/ regular show खुप सिनेमे पाहिले. आमचे मावस भाऊ आम्हाला 'काय नगरी ' म्हणुन चिडवायचे. वाडा तर ईतका छान व मोठा आहे (अजून) , खूप मजा यायची, सगळ्यांच्या घरी जाऊन खाऊन पिऊन, टीव्ही बघून यायचो. असो खुप मोठी गोष्ट झाली, आता फक्त आठवणी. (आम्ही सध्या ) पुण्यातच स्थाईक .😀
@MrinalNaik-f6z22 күн бұрын
मी पक्की सदाशिव पेठी पुणेकर आहे.माझ्या पुण्याचा मला अत्यंत अभिमान आहे. शनिपाराजवळ घर.शाळा हुजूरपागा,कॉलेज स प .मिलिंद सर सांगत आहेत,त्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत.मस्त झाली आहे मुलाखत.एकदम परफेक्ट बोलले आहेत सर. शुद्ध,स्पष्ट ,परखड मराठी ऐकून फार छान वाटलं. आत्ताचं पुणे बघून फार त्रास होतो.पुण्याची भाषा आता बिघडायला लागली आहे. बाहेरचे लोक इथे येऊन 41:33 राहतात , घरं घेतात आणि नावं ठेवतात हे योग्य नाही.
@patwardhanmahesh29 күн бұрын
सुंदर, खूप मजा आली, मिलिंद शिंत्रे यांनी अतिशय परखडपणे आपले विचार व म्हणणे मांडले अभिनंदन. पुणेरी पाट्या बद्दल मात्र प्रश्न विचारायचा राहिला😊
@anilmehendale577725 күн бұрын
मी १९८८ साली पुण्यात प्रथम आलो (बऱ्हाणपूर मध्यप्रदेश येथून) आणि तेंव्हा पासून पुण्यातच आहे आमच्या इथे जी मिठाई मिळते तशी मला इतक्या वर्षात पुण्यात नाही मिळाली आता मात्र मला पुण्याचे जाज्वल्य अभिमान आहे पुण्यासारखी ज्ञान प्रबोधिनी देखील कुठेही नाही परखड मुलाखत ऐकून खुप छान वाटलं
@shubhadagaidhani6892Ай бұрын
काही अंशी मुंबईत चाळीतले वातावरण असंच होतं. आमच्या आईवडिलांना काही कामासाठी गावी जायचं असलं तरी मुलांची काळजी नसायची. एक कोणी मोठी व्यक्ती आणि सगळ्या घरातील लहान मुलांना एकत्र सिनेमा/ सर्कशीतल्या नेत असत. हि मजा 😂 आम्ही अनुभवलेली आहे . खूप छान मुलाखत झाली आहे. मस्त झाली.
@bhagyashrikarmarkar193927 күн бұрын
अतिशय उत्तम..... अगदी बरोब्बर व्यक्त झाले आहेत श्री शिंत्रेजी
@purvakelkar8461Ай бұрын
शहराला आपलसं करून तिथल्या गोष्टी आत्मसाद केल्या तरच त्याला नावं ठेवली जात नाहीत.. मग तिथली भाषा असो वा राहणीमान.. मिलिंद दादा अतिशय छान बोलतातच त्यात वाद नाही.. ❤
@janhavipingle4198Ай бұрын
मिलिंद दादांचे शेवटचे वक्तव्य अगदीच परफेक्ट.
@mangeshvanjari-nb1wj27 күн бұрын
खूप छान मुलाखत. मिलिंद सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली. सरांना पुन्हा ऐकायला आवडेल.
@sandhyatajane584925 күн бұрын
तुमचे हे सर्व बोलणे ऐकून माझ्या तर अंगावर शहारे आले. खूप मिस केले आपण हे सगळे .एका घरात लग्न असेल तर सर्व वाड्यात लग्न असायचे. एखाद्या घरातील कुणाचे निधन झाले तर वाड्यात अन्न शिजत नसत.जोपर्यंत अंत्ययात्रा जात नाही तोपर्यंत त्या घरातील लोकांना सांभाळले जात असे. खूप काही लिहावेसे वाटते. 😢
@ashapatrudkar201928 күн бұрын
गणेशोत्सव बद्दल चांगले कान उपटले.
@shubhadabam-tambat7062Ай бұрын
विषय छान होता..मजा आली...मुख्य म्हणजे शुद्ध मराठी ऐकायला मिळाले शिंत्रेंकडून.फक्त एके ठिकाणी चुकून "संध्या" असे म्हटले गेले.संधीचे अनेकवचन संधी असेच होते.
@babadesai616628 күн бұрын
हेच ते नाव ठेवणे म्हणजेच खरा पुणेकर थोडी चुक पण सोडणार नाहीत
@sanketchalke173528 күн бұрын
पुणेकर
@damirashi27 күн бұрын
बरोबर , हेच म्हणायला आलो होतो
@anamikadeshmukh27 күн бұрын
रूंद्या pan mhanale eke thikani 😅
@baburaokeskar915125 күн бұрын
ढेकूण चे ढेकण अनेक वचन असावे पुण्याच्या बाहेर तरी असे आहे संधी चे संध्या मात्र होत नाही
@vanmalagosavi9558Ай бұрын
मी पुणेकर आणि नुमवि ची विद्यार्थीनी आहे, मी पूर्ण सहमत आहे शिंत्रे च्या विचाराशी, या मुलाख़ाती मधून गणेश उसत्व तील कार्यकर्ते आणि गणेश भक्त यानी थोडा जरी विचार केला तरी भरूण पावले
@shubhashreetikekar1493Ай бұрын
भरून असा शब्द आहे .भरूण नाही
@udayjagtap785127 күн бұрын
सगळीच गणेश मंडळ आपण समजता तशी नसतात 🙏🏼
@shubhashreetikekar149326 күн бұрын
95% Pune madhye ganesh mandal. Tashi ch ahet
@sulochanatilak3197Ай бұрын
पुण्याला ईतर गावची लोक नाव ठेवतात पण पुण्यातच पोट भरायला येतात.हे सर्व विसरतात
@pradipdeo1073Ай бұрын
आणि पुण्यातच सेटल होतात आणि आपल्या गावच्या नावाने गळे काढतात
@DCBat_Mobile29 күн бұрын
dusra option kay aahe Tyanchya gavat saglach Une aahe Mang the only option is Pune!
@vijaymahadane719629 күн бұрын
पुण्या ची बरीच लोक इतर गावी आहेत.ते पण असंच करतात.
Beautiful episode ….जे पुणेकर नहीं त्या लोकनी जरूर पाहवा… मी पुणेकर
@rutaaphale649917 күн бұрын
फक्कड झाली मुलाखत !👌🏻👍🏻 मला वाटतं मुळात कुठल्याच 'पुणेकराला' 'मी पुणेकर ' असं सांगावं लागत नाही. चार जणांत तो विशेष कळून येतोच. समोरच्याचं नीट ऐकून घेणे, ( आणि मग कात्रीत पकडणे ), मार्मिक आणि तात्विक उत्तर,मदत करण्याची वृत्ती ( शक्य तेवढी शारीरिक आणि वैचारिक ) आणि सारासार विचार करून सांगितलेला तोडगा यावरून तो ओळखूच येतो.
@sanjayvaidya878426 күн бұрын
आमचे आजोबा दक्षिणमुखी मारुती समोरच रहायचे त्यामुळे आपण वर्णन केल्या प्रमाणे वाड्यातले सर्व सण उत्सवात सहभागी होण्याचे भाग्य मिळाले
@meenakamatkar-un9kb10 күн бұрын
मी वाड्यात वाढले. त्याचा मला अभिमान, आनंद आहे. सुख दुःखात सगळे एकत्र असायचो. तुम्ही हे सगळे सांगता आहात,मला ते सर्व डोळ्यासमोर दिसत आहे. पुनःप्रत्ययचा आनंद झाला.
@rutaaphale649917 күн бұрын
मिलिंद सर वाड्यांबद्दल बोलताना दाटून आलेला गळाच सांगून गेला तो किती जिव्हाळ्याचा विषय आहे. खूप छान वाटलं. 🙏🏻👍🏻
@shraddhashetye23875 күн бұрын
किती सुंदर मुलाखत!! जसं पुण्यात वाड्यांमध्ये बरीच कुटुंबं एकोप्याने राहात होती तसेच मुंबई मध्ये चाळीत एकोप्याने राहात होती. तो एकोपा ना पुण्यात राहिला ना मुंबईत....😢😢😢😢😢
@urmilaapte985329 күн бұрын
गणेशोत्सवाबद्द्ल अगदी बरोब्बर बोललास!!! एकदम बरोब्बर!!!! ✅☑️✅☑️✅☑️✅☑️✅☑️✅☑️✅☑️✅☑️✅☑️✅☑️✅☑️✅☑️
@rohinipandit462127 күн бұрын
🎉 आमच्या आवडीच्या कट्टर पुणेकर असलेल्या व्यक्तीची मुलाखत म्हणजे आम्हा पुणेकरांच्या साठी पर्वणीच.इतर लोकांनी त्याचा आस्वाद घ्यावा , म्हणजे त्यांना पुणे आणि पुणेकर समजील.....आम्ही कट्टर , स्वाभिमानी पुणेकर.... Love you all Punekar 🎉 ज्या लोकांना पुण्याबद्दल असूया वाटते , पुण्यातली प्रत्येक गोष्ट आक्षेपार्ह वाटते अशा नतदृष्ट लोकांनी झोळी घेऊन पुण्यात पोट भरण्यासाठी येऊ नये ही नम्र विनंती 😮🎉
@vilasvaidya6269Ай бұрын
खूप छान मराठी ऐकलं.. बऱ्याच दिवसानंतर 👌🏻👌🏻👌🏻.. वा पुणेकर 👍🏻🥰🥰
@virendramohite476727 күн бұрын
खुप सुंदर मुलाखत, मिलिंद सरांनी अतिशय छान माहिती दिली आणि अगदी खरे वास्तव समोर आणले आहे , धन्यवाद सर
@jyotibhave6001Ай бұрын
खुप छान बोलले सगळ्या लहानपणापासूनच्या आठवणी आहेत त्यांना उजाळा मिळाला. प्रत्येक गोष्ट तन्तोतंत खरी मांडली आहे. खुप छान👌👌
@Shirishddk25 күн бұрын
नागपूर : तर्री पोहे सूरत : खमण ढोकळा विदर्भ : सांभार वडी हे काही वानगीदाखल उदाहरणे, जे इतर शहरातील नावाजलेले , उल्लेखनीय खाद्यपदार्थ !
@AaryanDeshmukh-g4h11 күн бұрын
मला आयुष्यभर अभीमान वाटणार आहे. मी पुणेकर असल्याचा ❤❤❤
@ShrutiGholap-kt3iu14 күн бұрын
वा... सर्व पुणेकरांच्या वतीने त्यांचेच विश्लेषण अतिशय उत्तम प्रकारे प्रकटीकरण 😊
@vishalmistri76913 күн бұрын
मुलाखत छानच ! सगळे जण मिलिंदजींचे कौतुक करतायेत, आणि ते योग्य पण आहे..! पण मुलाखत घेनाऱ्याचेही श्रेय आहे!! उत्तम मुलाखत खुलवली ! सर्वेशचेही अभिनंदन ! 100 शहरी ओर एक .........!!
@actualangel513322 күн бұрын
बांगलादेशी लोकांबद्दल जे शिंत्रे यांनी सांगितलं ते बरोबर आहे...हे दुखण॔ भविष्यात भारी होणार आहे असच वाटत
@kaleidoscopebymanjushaamde33826 күн бұрын
वाडा संस्कृती गेली हे तर चटका लावणारे आहेच, पण आता तर छोटी कुटुंबेही आणखी छोटी आणि विस्कळीत झाली आहेत. एकाकीपणाचा शाप जडलाय आता माणसाला..हे फार विदारक आहे. बाकी, मी पुण्याची नाही. पण पुण्यात नशीब आजमावायला आले. आणि पुण्याने मला भरभरुन दिले आहे. मला पुणेरीपणा टोचत नाही. उलट मी कृतज्ञ आहे...🙏... मात्र पूर्ण व्हिडिओ बघताना प्रचंड मजा आली 😂 ५१ व्या मिनिटापासून गणेशोत्सवाबद्दल जे बोललं गेलं आहे ते फार फार गांभीर्याने घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शंभर टक्के सहमत आहे.
@actualangel513322 күн бұрын
खरं आहे.. गणेशोत्सव तर विभत्स झालाय... सगळं एकदम घाण झालं आहे... DJ प्रकार नको झालाय
@mansinovelty162720 күн бұрын
प्रत्येक पुणेकराचे विचार स्पष्ट मांडले आहेत, मस्तच 👍🏻
@milindrokade774629 күн бұрын
खूप मजा आली छान होता एपिसोड मिलिंद शिंत्रे यांचा मी पूर्वीपासून फॅन आहे मुलाखत ऐकून त्यांना पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार त्यांची सर्व मत पटण्यासारखे आहेत त्यांचा स्पष्टपणा मला आवडतो
@medhadeshpande1283Ай бұрын
अतिशय उत्तम podcast. मुलींच्या अगदी मनातले बोलले आहेत गणेश उत्सवतल्या गण्यांबद्दल.
@prasadkadwaikar33126 күн бұрын
समर्पक ,छान मुद्दे मांडले आहेत शिंत्रे यांनी 👍
@dilipnaik725419 күн бұрын
I am 70 year old.I have really gone through all this.I really miss it.what is said by Mr Milind is 100%true.Just to tell I could see BhimsenJoshisab at Mehendale shop at A B chowk standing next to us.
@dilippandya790327 күн бұрын
👌👍👏🙏 Sunder vishleshshan.👌👍👏🙏
@shubhangipharande867528 күн бұрын
मिलिंद सरांच परखड बोलण एकच नंबर खुप आवडलं
@urmilasheode28 күн бұрын
हो आणि ते शुद्ध मराठी येणाऱ्या लोकांना च समजेल फक्त
@pramodkhataokar589227 күн бұрын
पूणे चे, कशाला मुंबई ची ही चाळ पद्धत गेली व हा आनंद आम्ही पण मुकलो आहे 🎉🙏
@rashmiharkare608313 күн бұрын
नागपूर हे अतिशय सुन्दर शहर आहे . इतिहास आहे, आर एस एस आहे . अजून बकालपणा नाही आला . अगत्य आहे . आपुलकी आहे. बाहेरचे खूप विद्यार्थी येतात. मेडिकल हब आहे. उत्तरेकडील लोक येतात.पण त्रास नाही. असेच राहावे.
@rohanutep8112 күн бұрын
Perfect
@GurukantPathak5 күн бұрын
@@rashmiharkare6083 पण लोक वर्हाडी नाही बोलत हिंदी बोलतात
@deepaligadgil720819 күн бұрын
पुण्यात जन्मलो . वाढलो . मुलाखततीने तेव्हाचे ( 1949 मधला जन्म आहे माझा )सगळे वातावरण , बालपण , एकमेकामधील आपुलकी हे डोळ्यासमोर उभे केले . मुलाखतीतले प्रश्न उत्तम . आणि मिलींददादा , तुमची उत्तरे तर शतकावर शतके झळकवलीयत . दिवाळी , रंगपंचमी , गणेशोत्सव यांचे सगळे स्वरूप बदललेय . अशा वेळी , ते पुणे राहिले नाही असे वाटतेच . खूप लिहावेसे वाटतेय . असो धन्यवाद आणि शुभेच्छा . पुणे .
@chetanghotikarАй бұрын
Ganeshosthav....perfect maat vyakta kelat. Hopefully konitari hyatun bodh gheil
@happy8882024 күн бұрын
वाडा संस्कृती आणि आत्ताचे फ्लॅट मधील आयुष्य यातला फरक प्रत्येक वेळी जाणवतो. प्रश्नही छान विचारले गेले आणि मिलिंद जींची उत्तरेही वैचारिक आणि समर्पक
@shripadvaidya463525 күн бұрын
अत्यंत समर्पक शब्दात पुणे डोळ्यासमोर उभे केले त्याबद्दल मिलींदजी यांचे खूप खूप आभार.
@neelakadam166926 күн бұрын
खरचं छान,जुन्या पुण्याची आठवण येतेच, गर्दी काही भागात अस्वछता हे नको वाटते सणांचे स्वरूप व तिथी बदलेले आहे गणेश उत्सव स्वरूप नकोस झाले आहे,शित्रे सरांनी वास्तवता दाखवली आहे.
@vinitapatwardhan321928 күн бұрын
खूपच मजा आली ऐकताना!👌👍😂
@rutujashinde62621 күн бұрын
सुरेख मुलाखत 👌👌 पुणेकर म्हणून छान वाटले
@vineetakshirsagar580727 күн бұрын
अगदी खरे स्पष्ट ,परखड ,छान मत about ganeshotsov
@sandhyahasnale996127 күн бұрын
मी पण पुणेकर लग्ना नंतर मुंबई ते आले सरांनी जे सांगितले ते अगदी बरोबर आहे लक्ष्मी रोडवरील आमची सेवा सदन शाळेचे नाव विसरलात खूप खूप सुंदर दिवसाची आठवण करून दिली 😢 असे वाटते पुन्हा तेच दिवस यावे . खूप सुंदर पुणे. गणपती बाप्पा विषयी अगदी बरोबर बोललात.
@bindumadhavbhure5465 күн бұрын
मी कसबा पेठेतील वाड्यात अनेक वर्षे रहात होतो. त्यामुळे वाडा संस्कृतीवरील विवेचनाने, वर्णनाने आपसूकच खूप भावूक झालो, अनेक जुन्या आठवणी, वाड्यातील प्रसंग डोळ्यासमोर तरळून गेले. तो वाडा अजूनही आहे. घरमालकांना भेटायला गेलो होतो त्याला आता ८ वर्षे उलटली. परत जायला मन धजावत नाही. घरमालकांबरोबरच वाड्याच्या वार्धक्याच्या खूणा पाहून मन गलबलून येते. त्या वार्धक्याची सावली माझ्या मनातल्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणींच्या खजिन्यावर पडू नये अस वाटत असाव कदाचित ! सोन्याच्या भावात कितीही वाढ होऊ दे पण या आठवणींच्या सोन्याचा भाव ???
@pradeepshinde589014 күн бұрын
ईतीहास संशोधन मंदीर.ग्रेट
@madhuritakalkar70921 күн бұрын
माझे तांबडी जोगेश्वरी पाशी माहेर आहे. अगदी असेच माझे अनुभव आहेत.हे सर्व ऐकताना फार मजा वाटत होती.खरेच आता खूप हसायला येत होतं.
@satishdeshpande247021 күн бұрын
मुलाखत काराने उच्चार सुधारावेत. मिलिंद खूप छान मुद्देसूद व समर्पक बोलून सर्व प्रश्न/ आरोप/वावड्या विफल ठरवल्या. गेले ते दिन गेले , समदूःखी.
@SachinDevkar-tu2bj27 күн бұрын
54:05 हा विषय खरंच लक्ष देण्याची खूप गरज आहे
@medhadikshit876614 күн бұрын
I am Punekar but frankly speakig Mumbaikar are 100% better in all the things than punekars ! They are good at heart, down to earth and helping nature ! I have experienced it in my foreign trip !
@SM-kd9iw4 күн бұрын
होय ताई तुमचे बरोबर आहे. नोकरीनिमित्त संपूर्ण भारत फिरल्यानंतर प्रत्येक शहराची वैशिष्ट्य लक्षात आली. पण हेच पुणेकरांचं वैशिष्ट्य आहे की त्यांना जे योग्य आहे, ते चांगलं आहे त्याची जाण असते. ते पुण्याबद्दल बोलत राहतील पण कोणाला नाव ठेवणार नाहीत. पुण्याचे कितीही दोष काढले तरी बाहेर गेल्यावर पुणेकरांकडे आजही आदराने बघितले जाते .आपल्या पुण्याचा आपणच अभिमान ठेवायचा तर पुढे देशाचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगला जाईल
@jayashreedeshpande4509Ай бұрын
मिलिंद जी खूप छान बोलले, सगळ्याच गोष्टी पटल्या. त्यांची भाषा समृद्ध, शुद्ध मराठी, ऐकताना आनंद, अभिमान वाटला.👌👍💐❤😊
@mangeshabhyankar932325 күн бұрын
फारंच अप्रतिम मुलाखत. मिलींद शिंत्रे यांच्याबरोबर गप्पा मारणे, हा एक वेगळाच आनंद असतो.
@kakasahebsuryawanshi843129 күн бұрын
मला सार्थ अभिमान आहे पुणेकर असल्याचा. जय शिवराय.❤❤
@virendravaidya771416 күн бұрын
मुलाखत छान झाली.पुण्याला जाऊन आल्यासारखं वाटलं. अजून काही जाणून घेण्यास आवडेल, धन्यवाद😅
@Vjkk176925 күн бұрын
पुण्यात मला बहुतांशी चांगलेच लोक भेटले, मला पुण्याबद्दल प्रेमच वाटतं, पण काही कमी जास्त असणारच.. ते तसं सगळीकडेच अस्त.. पेठेतील काही लोकांचं वागणं खटकू शकेल, पण त्यांचं बाकी बरेच गुण घेण्यासारखे आहेत. काही विक्षिप्त लोक हे सगळीकडेच असतात, ते पुण्याचं वैशिष्ट नाही आणि पुणे त्याला अपवाद पण नाही
@shashigokhale835926 күн бұрын
मुलाखत छान झाली, बाकरवडी आता पहिल्या सारखी राहीली नाही.गणेशोत्सोबद्दलचमत आता सर्वच ठिकाणी असाच तमाशा आहे तरी खरच खूप वाईट वाटत.पण पूण्यांच्या पाट्या सुद्धा फार प्रसिद्ध आहे त्याबद्दल बोलायला हवं होतं.
@milind909820 күн бұрын
वाडा संस्कृती फार सुंदर आठवणी सांगितल्या.....आम्ही ह्या बाबी हरवून बसलो आहोत.. ❤❤❤❤❤❤❤❤😂
@sandhyavhatkar490421 күн бұрын
मी पक्की मुंबईकर. पुण्यात वाडे गेले तसे आमच्या मुंबईतील चाळी गेल्या. तीही आमची मुंबईची संस्कृतीची श्रीमंती होती. चाळी गेल्या आणि मुंबईचा मराठी माणूस हरवला आणि मराठी संस्कृती सुद्धा. आता मन नाही लागत... आता ते दिवस पुन्हा येणार नाहीत याची खंत वाटते 😢
@smitasathe380827 күн бұрын
पु. ल . देशपांडे यांनी बरोब्बर सांगितलं आहे
@deeptiwalunjkar490023 күн бұрын
मिलिंद शिंत्रेंची मुलाखत म्हणजे पर्वणी
@abhijitghate6042Ай бұрын
पुणे “overrated” नाहीये. इतिहासातील पुणेकरसुद्धा महानच. सांप्रतकालिन पुणेकर (जे बव्हंशी अत्यंत सुमार असतात) इतिहासाचं बाड बिस्तार घेऊन “greatness“ची टिमकी वाजवतात आणि इतरांना पाण्यात पाहतात ते खरे अडचणीचा विषय आहेत.
@sandhyakulkarni676527 күн бұрын
Mi punekr nahi pn punekr etranna panyat vgaire pahat nahi
@rahuldivekar129 күн бұрын
पुण्यातील निवांतपणाचे केलेले वर्णन तंतोतंत मी पण अनुभवलेले आहे, तसेच वाड्याचे अनुभव पण एकदम सारखे, मी त्या पाच नंबर शाळेशेजारील बोळात राहत होतो
@dr.bharathideo40828 күн бұрын
100% correct about Ganesh Utchav. Even during weddings eveyone dancing looks very odd.
@Talash8816 күн бұрын
शिवाजी महाराज सर्व महाराष्ट्राचे भारताचे आणि आतातर संपूर्ण जगाचे आहेत पुणेकर.. या छोट्याशा वर्तुळात त्यांंना घेऊ नये फक्त किरकोळ मुद्दा पटवून देण्यासाठी
@vishwajeetdahiphale354012 күн бұрын
one of the best question to be asked in next podcast : what does the native Punekar People expects from a non punekar to keep this city beautiful and best as always
@साहित्यसहवास-य1ख27 күн бұрын
अतिशय सुरेख मुलाखत झाली . सर्वच प्रश्नाना समर्पक शब्दात उत्तर दिलेत. भाषेचा आणि पुण्याचा दोन्हींचाही अभिमान पदोपदी जाणवला.तुमच्या सारख्या विद्वानामुळेच आज थोडेफार पुणेरी पण टिकून आहे ..याचा आम्हालाही जाज्वल्य अभिमान आहे.
@archanalakhe433622 күн бұрын
सर म्हणतात ते खर आहे
@ajitnadgouda6079Ай бұрын
पुण्यात बाहेरच्या लोकांना ते लगेच स्वीकारत नाहीत. परंतु मुंबईत मात्र बाहेरच्या लोकांना लगेच स्वीकारतात.
@DCBat_Mobile29 күн бұрын
mhanunach Mumbai chi aaj kahi olakh nahi rahili Naa marathi culture naa original identity. aata sarva UP Bihari bhaiyye lok bharlet tithe ekdum down market filthy pathetic uncivilized zombies aahet te north wale. Marathi manus rahilach nahi Mumbai madhye
@yogeshkale66429 күн бұрын
@@ajitnadgouda6079 पुण्यातील लोक स्वतःला खूप शहाणे समजतात
@yogeshkale66429 күн бұрын
व मुंबई म्हणजे काय,आओ जाओ घर तुम्हारा, सार्वजनिक भोजनालय
@vijaypawar405529 күн бұрын
कारण मुंबईत स्थानिक आहेच कोण? सर्व बाहेरच्या लोकांची भरती झाली आहे.
@vanitapatil789929 күн бұрын
@@yogeshkale664 Ugichch punyach kautuk Nako. Mumbai hi Mumbai aahe. Nahitari dusryanna naav thevnyashivay tumcha divas sampat nahi😏
@deepakjagtap381828 күн бұрын
पुण्यात येऊन शिक्षण घेणे यात काही गैर नाही पण त्या नावाखाली काय काय थेर करतात ते एकदा रात्री फिरून पहा मग कळेल .
@snehalatamalegaonkar341526 күн бұрын
तुम्ही मांडलेले सर्वच मुद्दे गहन आणि महत्वाचे आहेत.
@swatidedge386518 күн бұрын
Amche ekte milindsirch pure saglyana punyabaddal bolayla, ase khup ahot
@shailendraborate695428 күн бұрын
पुणे कर व्हायचा क्राइटरिया म्हणजे अर्धवट ज्ञानावर शहाणपण पाजळत बसणे!
@dilipdeshmukh775825 күн бұрын
प्रत्तेक सार्वजनिक उत्सव हा ओण्गाळपणे साजरा केला जातो ही गोष्ट दुर्दैवानं म्हणावस वाटते .
@shubhadalikhite188229 күн бұрын
पुणेकर असल्याचा सार्थ अभिमान आहे. अतिशय शुद्ध आणि पवित्र सात्विक शहर आहे. जे पुण्याला नावं ठेवतात ते शेवटी त्यांचं सर्व विकून पुण्यातच रहायला येतात यातच काय ते समजून घ्या.😂😂
@h_a-www29 күн бұрын
मी तेच करणार आहे. लंडन to पुणे.
@vanitapatil789929 күн бұрын
@@h_a-www 😂😂😂😂
@Maharashtra-wn1ff29 күн бұрын
Baher che lok aalet mhnun khayla milaty nhitr 1to 4 😂😂
@kumudgadgil41023 күн бұрын
मी पुण्याची.शाळा कॉलेज सगळे कॅम्प मधे झाले.M A मात्र पुणे युनिव्हर्सिटीत
सर्वांना माझी एक विनंती आहे की तुम्ही पूर्ण episode नाही पाहिलात तरी हरकत नाही पण शेवटचे 10 min नक्कीच पाहा, विचार करण्यास भाग पडाल. 🙏🏻
@shaukathakim960922 күн бұрын
हे गृहस्थ साठीच्या आतले दिसतात, त्यामुळे खरे पुणे बद्दल त्याना अल्प माहिती आहेत.
@PRASADGURUJI7726 күн бұрын
अतिशय उत्तम
@sujatatambe35563 күн бұрын
छान मुलाखत
@umeshbelsare697821 күн бұрын
मी एक अस्सल पुणेकर आहे उत्तम मुलाखत, अस्सल पुणेकराची व्यथा मांडली आहे
@deoyanibharaswadkar107517 күн бұрын
चिखलदरा येथील दही रबडी भारी चविष्ट आहे..
@shaukathakim960922 күн бұрын
सदाशिव पेठेतील कट्टर ब्ब्राह्मन्या बद्दल वर्णन खूप आकर्षक झाले असते.
@rupalijoshi324021 күн бұрын
Milindji khup chan vatale
@pratibhapurohit955626 күн бұрын
वाडे पडले ते पानशेतच्या पुरात...सर्व पेठा कसबा ,मंगळवार सगळे रस्ते मुळातून विस्कटले , मातीच माती आम्ही अनुभवली . मग वाडे लयास गेले आणि बिल्डिंग जन्मास आल्या.संस्कृती विलय पावली ....
@vineetakshirsagar580727 күн бұрын
Pan आम्हाला त्रास होतो ह्या सगळया मुलांमुळे ,अतिशय गचाळ,गलिच्छ आणि बकाल झाले आहे पुणे ,फरत्रास होतो ह्या मुलांमुळे..पण rent परवडत नाही .म्हणून पेठेत राहावे लागते नाईलाजाने..खूप घाण झाले आहे पुणे.
@rohanutep8112 күн бұрын
Perfectly said
@jaswandiseikdar76024 күн бұрын
मजा आली।..... I thoroughly enjoyed this episode.
@AaryanDeshmukh-g4h11 күн бұрын
जगात भारी पुणेकर
@ashutoshpendse427325 күн бұрын
ही बहुधा जुनी गोष्ट आहे. १५-२० वर्षांपूर्वी पुणेकर कौतुकाने आणि आवर्जून मुंबईला बॉंबे म्हणायचे. मुंबईकर स्वतः आम्ही मुंबईत राहतो म्हणायचे पण पुणेकर मात्र "काय बॉंबेत असता का?" असे विचारायचे. आता काय म्हणतात कल्पना नाही.
@geetagohad585229 күн бұрын
1च नंबर सर ,मला ही जाज्वल्य अभिमान आहे पुणेकर असल्याचा
@aparnasaptarshi277129 күн бұрын
Wah😊😊❤❤❤❤
@RavindraKhandve12 күн бұрын
56.11 "आम्हाला जाज्वल्य अभिमान आहे." एका वाक्यात विषयच संपवला..!!
@manjireesathaye589223 күн бұрын
अतिशय रंजक, माहितीपूर्ण मुलाखत! अस्सल भाषा, विचार, ते सुद्धा निर्भिडपणे मांडलेता नर्म विनोद, हलकासा तिरकसपणा... मजा आली. ही मुलाखत तरुण पुणेकरांसाठी आणि नवागतांसाठी खूप महत्वाची आहे. आपल्याकडे काय आहे याचा साक्षात्कार होतो आहे. धनवाद🙏🙏😊
@nandansaptarshi288229 күн бұрын
मूळ पुणेकर आता गणपती किंवा विसर्जन मिरवणुकी साठी जात नाहीत बाहेरचे जातात त्यांना याचे अप्रूप वाटते