Daraba | जिभेवर ठेवताच विरघळणारा लोण्यासारखा मऊ लुसलुशीत दराबा बनवायची पारंपारिक खान्देशी पद्धत

  Рет қаралды 134,956

Jalgaon Tadka Recipe

Jalgaon Tadka Recipe

Күн бұрын

नमस्कार,
Jalgoan Tadka Recipe मध्ये आज आपण दिवाळी विशेष दराब्याचे लाडू कसे तयार करायचे? ते बघणार आहोत ..या लाडूंना दळाचे लाडू..ओलावलेल्या गव्हाचे लाडू असे सुद्धा म्हणतात..दराब्याचे लाडू हि एक पारंपरिक खांन्देशी रेसिपी आहे..दिवाळीच्या फराळासाठी तसेच लग्न कार्यामध्ये रुखवत देण्यासाठी हे लाडू बनवले जातात... दराब्याचे लाडू तीन ते चार महिने अजिबात खराब होत नाही ..हे लाडू खायला सुद्धा खूप स्वादिष्ट लागतात... व्हिडिओमध्ये मी गव्हाची पिठी /सुजी कशी तयार करायची? ती साठवायची असेल तर कशा पद्धतीने साठवायची ?दराबा कसा तयार करायचा? संपूर्ण दाखवलेल आहे ..तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा.. रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा.. कॉमेंट्स करा..चॅनेलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ..शेजारील बेल 🔔आयकॉनवर प्रेस करा ..आणि आॅल वर क्लिक करा..
Daraba | जिभेवर ठेवताच विरघळणारा लोण्यासारखा मऊ लुसलुशीत दराबा बनवायची पारंपारिक खान्देशी पद्धत | Dalache ladu | ओलवलेल्या गव्हाचे लाडू
👉 साहित्य -
गहू - 3 शेर
पिठी / सोजी - 2.5 शेर
पिठी साखर - २ शेर( आवडीप्रमाणे कमी जास्त करता येईल )
साजूक तूप - 1 किलो
बारीक रवा - १ वाटी ( कमी जास्त घेता येईल)
वेलदोडे किंवा वेलची पूड
जायफळ पुड
💠किलोचे प्रमाण -
२ किलो - गहू
१ किलो - सोजी ( पिठी )
१ किलो - पिठी साखर
३ पाव ( ७५०ग्रॅम ) - साजूक तूप
रवा - १ वाटी ( आवडीनुसार कमी अधिक करता येईन )
१). शक्यतोवर रात्रीच्या वेळेस गहू ओले करावे.. म्हणजे ते रात्रभर व्यवस्थित ओलवले जातात.. आणि गव्हाचा कोंडा निघून पांढरी स्वच्छ सोजी किंवा गव्हाचे पीठ तयार मिळते..
२). आंबवले गेलेले गहू जर जास्त ओले असतील तर कपड्यावर ते पसरत ठेवावे आणि कोरडे करून घ्यावे.‌‌ हे गहू खूप जास्त कोरडेही नसावे आणि खूप जास्त ओले ही नसावे.. दमट असावेत..
३). गहू जर खूप जास्त ओले असतील तर गव्हाचा कोंडा खूप निघतो.. रवा जास्त पडतो.. आणि गव्हाची पिठी किंवा सोजी खूप कमी तयार होते .
३). गहू कसे आंबवले गेले (गहू जास्त ओले) दळून आणले तर त्यानुसार पिठी /सुजीचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते..
४). गव्हाची पिठी दोन ते तीन वेळा व्यवस्थित चाळून घ्यावी म्हणजे त्यातला गव्हाचा कोंडा किंवा ताम निघून जाते ..गव्हाचे ताम जर राहिली तर दराब्याचे लाडू लालसर होतात..
५). गव्हाची पिठी तयार झाल्यानंतर ती सहा ते सात तास किंवा एक दिवस मोकळी ठेवावी आणि वाळवून घ्यावी..मग लाडू करायला घ्यावे.. कारण गव्हाची ही पिठी थोडी ओलसर असते त्यामुळे तिला आधी वाळवून घ्यावी..
६). जर लाडू वळून ठेवायचे असतील तर तूप कमी घेतलं तरी चालेल..आणि लाडू न वळता दराबा तसाच डब्यामध्ये भरून ठेवायचा असेल तर जास्त तूप घ्यावे लागते ..म्हणजे दराबा लुसलुशीत तयार होतो..
७). लुसलुशीत दराबा तयार करण्यासाठी तुम्ही एक किलो सुजी साठी एक किलो तूप घेऊ शकता.
८). एक किलो सुजी /पिठी साठी ६०० ग्रॅम तूप आणि ६०० ग्रॅम साखर हे प्रचलित प्रमाण आहे..
९).सुजी कमी भाजली गेल्यास लाडू चिकट होतात..मंद आचेवर अगदी तूप सुटेपर्यंत सुजी व्यवस्थित भाजून घ्यावी.. सुजी जास्त भाजली गेल्यास लाडू लालसर होतात.. म्हणून सुजी मंद आचेवरच योग्य पद्धतीने भाजावी..
१०). भाजून घेतलेली पिठी दहा ते बारा तास तुपामध्येच राहू द्यावी.. म्हणजे ती छान मूरते आणि लाडू स्वादिष्ट तयार होतात.‌( वेळ नसेल तर पूर्ण गार झाली की साखर घालू शकता.)
११). भाजून घेतलेली पिठी/ सोजी पूर्णपणे थंड झाल्यावरच साखर घालावी.? गरम सोजी मध्ये साखर घातल्यास ती वितळून सुजी पातळ होते‌. आणि लाडू कडक तयार होतात...
१२).पिठी भाजून झाली की अल्यूमिनीयम कढई मध्ये जास्त वेळ ठेवू नये ..आणि दडबा रगडण्यासाठी सुद्धा अल्यूमिनीयम चे भांडे वापरू नका ...त्यामुळे दराबा थोडा सावळा दिसतो.. पांढराशुभ्र दिसत नाही..
👉गव्हाची पिठी किंवा सोजी कशी साठवावी?
१). सुजी आधी वाळून घ्यावी नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रिज मध्ये तुम्ही एक ते दोन महिना साठवून ठेवू शकता‌‌ अजिबात खराब होत नाही..
२). गव्हाची पिठी ओलवलेल्या गव्हाची असल्यामुळे ती फ्रीजच्या बाहेर लवकर काळी पडते म्हणून आधी वाढवून घ्यावी आणि मग साठवावी...
लिंक ✔️ चेक करा.👇🏼
बेसनाचे लाडू |Besan Ke Ladoo| How to make Besan Laddu | Diwali special Recipe |Jalgaon Tadka Recipe
• बेसनाचे लाडू |Besan Ke...
Anarsa Recipe Marathi |विदर्भातील पारंपारिक साखरेचे जाळीदार अनारसे |Anarse Recipe |Diwali Faral
• Anarsa Recipe Marathi ...
अनारसे रेसिपी |१/२ किलो तांदळाचे अचूक प्रमाण या टिप्स वापरून करून बघा,अनारसे फसणार नाही|Anarse
• अनारसे रेसिपी |१/२ किल...
मैद्यामध्ये मिसळा ही एक वस्तू आणि बनवा जिभेवर ठेवताच विरघळणारी खुसखुशीत शंकरपाळी | shankarpali
• मैद्यामध्ये मिसळा ही ए...
शंकरपाळी | Shankarpali By Jalgoan Tadka Recipe |Diwali Faral | Tea Time snack
• शंकरपाळी | Shankarpali...
झटपट तांदळाच्या पिठाची खुसखुशीत चकली | बिना भाजणीची चकली 😋| Instant Rice Flour Chakli😍
• झटपट तांदळाच्या पिठाची...
या दोन वस्तू घालून शेवांचे पीठ तयार कराल तर शेव संपेपर्यंत कुरकुरीतच राहतील| spicy Shev|Diwali snack
• या दोन वस्तू घालून शेव...
दिवाळी फराळासाठी फक्त बेसनाचे ठिसूळ,कुरकुरीत तिखट शेव |Lasun shev |Diwali Faral
• दिवाळी फराळासाठी फक्त ...
रव्याची मठरी
• दिवाळी स्पेशल १० मिनिट...
खुसखुशीत करंजी रेसिपी | पिठात घाला हि एक वस्तू आणि बनवा संपेपर्यंत खुसखुशीत करंजी |Karanji recipe
• खुसखुशीत करंजी रेसिपी ...
स्वस्तात मस्त 15 मिनिटात तयार होणार कुरकुरीत चविष्ट मुरमुरा चिवडा | murmuryacha chivda| Diwali faral
/ alank3ty
#khandeshirecipe
#Darabarecipe
#Darabyacheladoo
#Diwalifaral
#JalgoanTadkaRecipe
#दराबा
#दळाचेलाडू
Please like share and Subscribe with bell icon 🔔
Thanks For Watching 🙏

Пікірлер: 203
@meenawankhede2441
@meenawankhede2441 3 ай бұрын
आता शेराचे माप नाही. कृपया किलोच्या मापात सांगा
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
गहू - २ कीलो १ किलो - सोजी ( पिठी ) १ किलो - पिठी साखर ३ पाव ( ७५०ग्रॅम ) - साजूक तूप रवा - १ वाटी ( आवडीनुसार कमी अधिक करता येईन ) Thank you stay connected 😊
@chetanjadhav6379
@chetanjadhav6379 2 ай бұрын
Vicharla tar barobar sadha soppa . Uttar milala tar thank you Hari bolat ja
@nakshtravlogs6584
@nakshtravlogs6584 9 күн бұрын
मी पण जळगावकर आहे तुमची रेसीपी मस्त 👌
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 9 күн бұрын
अरे व्वा ! धन्यवाद ताई 😊
@anitabahurupe283
@anitabahurupe283 7 ай бұрын
खूप छान सउजई ओल्या गव्हाची कशी करतात हे बघायचे होते मी रवा बेसनाचे लाडू करते
@anitabahurupe283
@anitabahurupe283 7 ай бұрын
सुजीचे लाडू
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 7 ай бұрын
खूप खुप धन्यवाद 😊
@agrchannel6653
@agrchannel6653 10 күн бұрын
खूप वेळ खाऊ काम आहे, पण तेवढेच टेस्टी पण!मी पहिल्यांदाच बघितली hi रेसिपी. बघूनच कळतंय किती छान लागत असेल 👌👍👍
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 10 күн бұрын
धन्यवाद 😊
@MinAnandKitchen
@MinAnandKitchen 11 ай бұрын
खूपचं मस्त झाला आहे व्हिडिओ आणि दराबा पण.
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 11 ай бұрын
धन्यवाद 😊
@anitabahurupe283
@anitabahurupe283 22 күн бұрын
खूप छान
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 22 күн бұрын
धन्यवाद ताई 😊
@lalitaattarde949
@lalitaattarde949 2 ай бұрын
मी सुद्धा जळगावचे आहे ताई मी सुद्धा असेच लाडू करते पण तुमचे लाडू खूपच सुंदर झाली आहे खूप खूप धन्यवाद ताई खूपच छान झाले लाडू
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
मनापासून धन्यवाद ताई 😊
@sskulkarni3004
@sskulkarni3004 2 ай бұрын
प्रथमच ऐकली आणि पहिली ही रेसिपी धन्यवाद दाखवल्याबद्दल🙏
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
Most Welcome 🤗
@divyakogade1596
@divyakogade1596 16 күн бұрын
Chan aahe tai maza favarate aate
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 16 күн бұрын
Thank You dear 😊
@renumamdi3545
@renumamdi3545 2 ай бұрын
खुप छान.. माझ्या माहेरी येवला येथे दिवाळीला हेच लाडू बनवता. दराबा एवजी त्याला पिढीचे लाडू म्हणतात.👌
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
अरे व्वा ! आमच्या कडे पण दिवाळी म्हणजे दराबा हवाच... धन्यवाद 😊
@swatichaudhari7056
@swatichaudhari7056 11 ай бұрын
Apratim...me kalach ladu kele...chhan zale...tumhi khup ushira recipe takli
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 11 ай бұрын
Thank you 😊
@KiranChaudhari-t7e
@KiranChaudhari-t7e 11 ай бұрын
छान माहीत दिली
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 11 ай бұрын
धन्यवाद 😊
@S2sSos
@S2sSos 2 ай бұрын
Aajji la khub dhanyabad asi recipe sathi khupas chan❤
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
Thank you so much 😊
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 11 ай бұрын
Very nice recipe
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 11 ай бұрын
Thank you😊😊
@sanaparab6073
@sanaparab6073 2 ай бұрын
खूप सुंदर डिश..मी नक्की बनवून पाहीन,अश्याच पारंपरिक रेसिपी बनवून पोस्ट करा,धन्यवाद🙏
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
Thanks dear 😊 नक्की करून बघा ..आणि मी पण पारंपरिक recipe पोस्ट करेल नक्की 😄
@nikitakhopde4024
@nikitakhopde4024 22 күн бұрын
Mi he ladu maza aajoli MP buhranpura yethe khale aahet lahan astani. Aadhi Khup sodhali he recipe pan nahi bethali aaj you tube scroll karat astani recipe samor aali chan vatli nakki try karen mala ye ladu khup aadatat. धन्यवाद 🙏
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 22 күн бұрын
Nakki try kra ani aplya mitra parivasobat recipe share kra .. मनापासून धन्यवाद ताई 😊
@MinalMali-h4x
@MinalMali-h4x 11 ай бұрын
Chan kelet tai ladoo
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 11 ай бұрын
Thank you 😊
@meenakshimahajan4601
@meenakshimahajan4601 21 күн бұрын
खूप छान 👌🏻
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 21 күн бұрын
Thank you
@rekhamahatukade8519
@rekhamahatukade8519 Ай бұрын
Mi kolhapur chi aahe pn Pune yethe jalgaon chya maitrinmule hi recipe mahit zali khup chan lagate,me banavaleli aahe,pn tumachi mehanat zast aahe, apratim 🎉🎉❤
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 Ай бұрын
मनापासून धन्यवाद ताई 😊😊
@savitapatil6490
@savitapatil6490 11 ай бұрын
Kupach Chan tai
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 11 ай бұрын
धन्यवाद 😊
@surekhaashoksonawane1679
@surekhaashoksonawane1679 2 ай бұрын
ताई अतिशय सुंदर आणि मुलायम लुसलुशीत दराबा दाखविला. धन्यवाद
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
You most welcome tai 😊
@litalistar
@litalistar 2 ай бұрын
Unique recipe yummy 😋
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
Thank you
@litalistar
@litalistar 2 ай бұрын
@@jalgaontadkarecipe7381 wc tc 😊
@supriyamane4883
@supriyamane4883 3 ай бұрын
वाह.. खूपच छान recipe दाखवलीत.. नवीन आहे आमच्यासाठी..
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद ताई 😊
@sandhyadeshmukh4102
@sandhyadeshmukh4102 2 ай бұрын
मी पण जळगाव चे आहे याचे लाडू नेहमी बनवतो❤❤
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
धन्यवाद ताई 😊
@zahedashaikh4116
@zahedashaikh4116 2 ай бұрын
खूपच मस्त!!!
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
Thank you 😊
@leelamhetre2915
@leelamhetre2915 2 ай бұрын
Bahut tasty rahta hai .❤
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
Ha...bahut Thank you 😊
@nayanamalekar4029
@nayanamalekar4029 2 ай бұрын
Bapre kiti hi मेहनत
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
😊😊
@kalpanaakre3670
@kalpanaakre3670 2 ай бұрын
विदर्भात ह्याला पिठीचे लाडू म्हणतात, वस्त्रगाळ् केल्याने quality आणी रंगात मध्ये खूप चांगला फरक पडतो. माझ्या आत्ये-सासूबाईंची खासियत आहे. थँक यु
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
अरे व्वा !! छान Welcome 🤗
@vaishalirane8234
@vaishalirane8234 2 ай бұрын
Aaplyakade padhat khup chhan aste g tai chav pn khup chhan yete.......
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
हो... धन्यवाद ताई 😊
@sanjivanimankar6318
@sanjivanimankar6318 2 ай бұрын
छान आहे!
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
धन्यवाद
@mohinibhavsar6364
@mohinibhavsar6364 11 ай бұрын
Khupach mast......
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 11 ай бұрын
धन्यवाद😊
@anitapatil2491
@anitapatil2491 2 ай бұрын
गुजर समाजात हा लाडु खुब खास आहे, मुली च्या लगनात हे लाडु आम्ही सोबत देतो ।❤
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
धन्यवाद ताई 😊
@smitapatil5983
@smitapatil5983 2 ай бұрын
पश्चिम महाराष्ट्रात राहत असल्याने ही रेसीपी माहिती नव्हती पण संपुर्ण रेसीपी पाहिली खुप छान सोप्या भाषेत सांगितले आहेत तुम्ही, नक्की ट्राय करेन, व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
मनापासून धन्यवाद ताई 😊 नक्की करून बघा.. You most Welcome 🤗
@nitakulkarni6354
@nitakulkarni6354 2 ай бұрын
खुप मेहनती चे काम आहे
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
आहे खरं.....पण छान होतात लाडू धन्यवाद ताई 😊
@simik4981
@simik4981 2 ай бұрын
Wow! Where can I get this in India?
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
This is famous recipe in Jalgoan ( khandesh ) district in Maharashtra.. Thank you...
@sarikawagh4699
@sarikawagh4699 11 ай бұрын
Very very nice
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 11 ай бұрын
Thank yoi
@MangalaChaudhari-m9p
@MangalaChaudhari-m9p 3 ай бұрын
Good Recip
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
Thank you 😊
@swativaze1242
@swativaze1242 3 ай бұрын
😊 mastach
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
Thank you 😊
@bvnvsn
@bvnvsn 2 ай бұрын
Chan 👌, aamcha kutch madhe pan ha banavte, pan summer madhe banvata, aamhi yala dariya kinva finiya ladu manhta, thodi banvaychi padhat vegli aahe, aamcha kade , pahlanda ghee aani sakar la mix karun khub fetaychi, matlab tyanchi size duppat , tripatt hote nantar ghavacha lot thoda jad pisvun , tyala bhajun sagle mix karayche.
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
Wow..nice....Navin paddhat samjli Thank you so much 🤗
@manishakulkarni2320
@manishakulkarni2320 3 ай бұрын
Thanks for recipe ❤
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 Ай бұрын
My pleasure 😊
@manishasali7242
@manishasali7242 3 ай бұрын
खुप छान 👌👌😋
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
धन्यवाद ताई ☺️
@ashamore7969
@ashamore7969 2 ай бұрын
Sakhar aiwaji gul wapru shkto?
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
Paramparik recipe madhe tri साखरच ghaltat ताई.. Thank you 😊
@akshatajaware4376
@akshatajaware4376 10 ай бұрын
खूप छान...
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 10 ай бұрын
धन्यवाद 😊
@jeevantigarg9203
@jeevantigarg9203 3 ай бұрын
Nice
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
Thank you
@anjalibakane9060
@anjalibakane9060 26 күн бұрын
❤मस्त
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 26 күн бұрын
धन्यवाद ताई 😊
@nandkishorkhupse3476
@nandkishorkhupse3476 3 ай бұрын
Khup ch chan amhi mukttainagar varun ghet asato...
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
Ho milto readymade pn... Thank you 😊
@nandkishorkhupse3476
@nandkishorkhupse3476 3 ай бұрын
@@jalgaontadkarecipe7381 aata tumchi recipe baghun ghari pn karun baghu... Thank you so much recipe share kelya baddal..
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
@nandkishorkhupse3476 nakki karal tai...ghari kelala daraba parvdto vikatpeksha ..😊
@nandkishorkhupse3476
@nandkishorkhupse3476 3 ай бұрын
Mirchi chi pn bhaji share kara plz..
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
@nandkishorkhupse3476 nakki 😊
@seemavyavahare8785
@seemavyavahare8785 2 ай бұрын
आमच्याकडे ओले गहू दळून मिळत नाहीत. मैदा व रवा घैतला तर चालेल का
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
हो...करतात मैदा नी रव्याचे लाडू पण... Thank you tai... रेसिपी बनवून बाघ आणि शेअर करा..
@Anuradha.choudhary1959
@Anuradha.choudhary1959 2 ай бұрын
खूपच छान दराबा लाडू,मला खूप आवडतात,पण प्रोसिजर खूप कठीण वाटते या लाडूची, पण छान सांगितले
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
अजिबात कठीण नही...पूर्ण टिप्स फॉलो करून बनवा तुम्हाला पण छान दराबा बनवता येईन... Thank you so much😊
@rahulmarathe7349
@rahulmarathe7349 15 күн бұрын
ऑर्डर दिली तर बनऊन देणार का ताई???
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 15 күн бұрын
माफ करा... मी ऑर्डर नाही घेत. मनापासून धन्यवाद 😊
@kiraningle3842
@kiraningle3842 2 ай бұрын
गूळ घालून करता येईल काय?
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
पारंपरिक पद्धतीने तर साखरच घालतात...गुळाचा दारबा कधी बनवलाच नाही.... Thank you 😊
@pritarajadhyax6090
@pritarajadhyax6090 3 ай бұрын
मंद गॅसवर साधारण किती वेळ भाजावे,दराबा किती वेळ रागडवा...गव्हाचे बारीक दळलेले पीठ जे चपाती साठी वापरतो ते चालेल का....
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
जोपर्यंत पिठीला छान तूप सुटूत नाही तोपर्यंत भाजावे... दराबा जर हिवाळ्यामध्ये रगळत असाल तर तो अगदी तूप सुटून लुसलुशीत होत नाही तोपर्यंत रगडावा लागतो... उन्हाळा असेल तर लवकर तूप सुटून मऊ होटो व कमी रगडवा लागतो... चपातीसाठी हे पीठ वापरत नाही..( मी तरी कधी वापर नाही केला.. ) Thank you...stay connected 😊
@rohitkadam8962
@rohitkadam8962 2 ай бұрын
दीदी मला आधी वाटलं की व्हॅनिला आईस्क्रीम आहे की काय😅❤ खूप मस्त रेसिपी नक्की ट्राय करेन ❤❤ Mrs shital patil कराड
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
😄😄 नक्की करून बघा ताई.. धन्यवाद
@smitachaudhari890
@smitachaudhari890 4 ай бұрын
मस्त
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 4 ай бұрын
धन्यवाद 😊
@harshabharambe9764
@harshabharambe9764 3 ай бұрын
खर तर अगदी पारंपरिक पदार्थ पण असे ओले गहू गिरणीत दळून देत नाहीत त्यामुळे कार्य येत नाही.पण पुन्हा एकदा प्रयत्न करून बघीन
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
नक्कीच करून बघाल पण खूप ओले नसतात ताई हे गहू...दलता येतात गिरणीवर... मनापासून धन्यवाद ताई 😊
@harshabharambe9764
@harshabharambe9764 3 ай бұрын
@@jalgaontadkarecipe7381 करून बघणार आहे माझे Mr aani मी आम्हाला दोघांना खूप आवडतो दराबा
@harshabharambe9764
@harshabharambe9764 3 ай бұрын
@@jalgaontadkarecipe7381 खानदेशातील
@swatimhatre4395
@swatimhatre4395 3 ай бұрын
हो पण मुंबई ला चक्कीवर दळून देत नाहीत चक्की खराब होईल सांगतात मिक्सर वर दळले तर चालेल का ​@@jalgaontadkarecipe7381
@bhaktipendse1392
@bhaktipendse1392 3 ай бұрын
आमच्या घराकडे ओल्याची गिरणी आहे. चौकशी करा‌ मिळेल.
@शीतलशिंदे-ट7म
@शीतलशिंदे-ट7म Ай бұрын
गिरणी वाल्या ला दळण कसे दळून मागायचे?
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 Ай бұрын
बारीकच दळायचे ताई... Thank you 😊
@sandhyajarwal5906
@sandhyajarwal5906 23 күн бұрын
याला आमच्या मराठवाडात सोजीचे लाडू म्हणतो
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 23 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई 😊
@meenakshimahajan4601
@meenakshimahajan4601 21 күн бұрын
तुम्ही लेवा पाटील आहात का
@arundhatizantye1081
@arundhatizantye1081 2 ай бұрын
Hyala pithi sakhar lladu mhantat
@aparnakhare8792
@aparnakhare8792 3 ай бұрын
माझी आज्जी करायची खायला अप्रतिम लागतात खूप मेहनत आहे पण
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
हो मेहनत आहे...पण नंतर फळ फार गोड मिळत 😄 धन्यवाद ताई 😊
@sandhyajarwal5906
@sandhyajarwal5906 23 күн бұрын
फक्त नावाचा फरक आहे आम्ही रवा नाही टाकत
@RupaliDongre
@RupaliDongre 2 ай бұрын
😊❤️👌👌
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
Thank you
@smitapatil4093
@smitapatil4093 3 ай бұрын
🙏ताई मला तेल गुळाचे लाडू दाखवा ताई पाक कसा करायचा ते सांगा सोजीचे लाडू तेल पाणी चे मोहन देऊन करतात ते लाडू दाखवा. दराबा लाडू खूपच छान आलेले आहेत ताई मला आवडले
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
Sorry tai ...pramanik pane sangaych tr mi kadhi kele nhi ase ladu...
@smitapatil4093
@smitapatil4093 3 ай бұрын
थॅकयू ताई रिपलाय दिल्या बद्दल 🙏🙏ओके
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
@smitapatil4093 welcome dear
@rohinipande
@rohinipande 2 ай бұрын
व्वा तूप पण विकास चे. मस्त दाखवली दराब्याची कृती. जळगावकर😀
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😄
@VanitaBehere
@VanitaBehere 2 ай бұрын
👌👌
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
Thank you
@VarshaPenchalwar-jr3yd
@VarshaPenchalwar-jr3yd 2 ай бұрын
Chan mala avadali recipe amchyakade nahi karat pan mi karun bagjen
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
Nakki krun bagha 👍🏼 Thank you so much dear
@lovepeace29981
@lovepeace29981 2 ай бұрын
थोडक्यात पिठाचा किंवा मैद्याचा लाडू म्हणू शकतो.
@MayaNichal
@MayaNichal 2 ай бұрын
आम्ही अशा प्रकारे पिढीचे लागु करतो 😮
@bhavanapawar7836
@bhavanapawar7836 2 ай бұрын
😋👍
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
Thank you
@aherraofamily3919
@aherraofamily3919 11 ай бұрын
मैदा वापरला तर चालेल का
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 11 ай бұрын
मैद्याला ती ओरिजनल चव नाही येणार नाही...
@renukathombare2516
@renukathombare2516 2 ай бұрын
खूप गोड असतो म्हणून मला फार नाही आवडत.... पण माझ्या घरी सगळे खातात
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
साखर कमी घातली तरी छान होतो ताई दाराबा...एकदा करून बघा.. Thank you 😊
@archanapatil7991
@archanapatil7991 3 ай бұрын
ताई किलो चे प्रमाणात सांगा प्लिज
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
गहू - २ किलो १ किलो - सोजी ( पिठी ) १ किलो - पिठी साखर ३ पाव ( ७५०ग्रॅम ) - साजूक तूप रवा - १ वाटी ( आवडीनुसार कमी अधिक करता येईन ) Thank you stay connected 😊
@happybunny1021
@happybunny1021 3 ай бұрын
Aamhi Yala sapitache ladoo mhantat
@pinkyukey3662
@pinkyukey3662 7 ай бұрын
Ye aataa shop me milta hai kya?
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 7 ай бұрын
Nhi milega...Ghar pe banana padega Thank you
@sangeetassareescreationfor5082
@sangeetassareescreationfor5082 3 ай бұрын
Pithi sakhareche ladoo
@ahpc9901
@ahpc9901 2 ай бұрын
Yala khaych kas aste
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
Laducha prakar ahe... ladu sarkhach khaycha 😄 Thank you 😊
@vasundharakhadke7485
@vasundharakhadke7485 3 ай бұрын
Aamhala gahu pasun nako, rava, maida che dakhawa
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
Nakki prayatna krel dakhavaycha.... Thank you 😊
@mahadeobhiste8123
@mahadeobhiste8123 9 күн бұрын
आम्ही या लाडू ला सुजीचे लाडू म्हणतो.
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 9 күн бұрын
धन्यवाद 😊
@superlicious1775
@superlicious1775 2 ай бұрын
या काळात इतकं गोड खाल्ले,तेही साखरेचे तर किती danger आहे.
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
😊
@ashwinipednekar6830
@ashwinipednekar6830 3 ай бұрын
👌👌👌👌👌
@kanchanpatil9345
@kanchanpatil9345 4 ай бұрын
पिढी साखर टाकण्या अगोदर खुप वेळ रगडावे ❤😂🙏🌹
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 4 ай бұрын
दराबा छान मऊ लुसलुशीत होतो मग ...🤓
@nachiketlathi7683
@nachiketlathi7683 2 ай бұрын
......
@RutaMulekar
@RutaMulekar 2 ай бұрын
Ayaka galun manatee nahi chalone ase mahantat
@vidyarawool8254
@vidyarawool8254 3 ай бұрын
विकत कुठे मीळतात
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
कुठल्याही मिठाईच्या दुकानात मिळू शकतात ... Thank you
@dishantsactivities6711
@dishantsactivities6711 2 ай бұрын
मधुरम sweet ता. शहादा, जि. नंदुरबार
@vidyarawool8254
@vidyarawool8254 2 ай бұрын
@@dishantsactivities6711 ओके
@dancekamood
@dancekamood Ай бұрын
He maidyche ladoo aahet
@vidyakulkarni2952
@vidyakulkarni2952 3 ай бұрын
साखरे च्या जागी गूळ वापरला तर
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
Sorry पण...पारंपारिक पद्धतीने तरी साखरच घालतात ताई... गुळाचा दरबा कधी बनवला नाहि...
@soumyajadhav
@soumyajadhav 3 ай бұрын
Mla icecream vatl
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
😄
@archana2905
@archana2905 2 ай бұрын
रवा घातला पाहिजे का थोडी कचकच वाटेल ना
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करता येतो रवा .... Thank you 😊
@smitapatil4093
@smitapatil4093 3 ай бұрын
ताई मला रिपलाय दया मी वाट पहाते आपल्या रिपलाय ची वाट पहाते आहे
@shantaramsisode3469
@shantaramsisode3469 2 ай бұрын
रावेर.यावल 1972 मधे हॉस्टेलात प्युअर गावरान तूप घालून दराबा व तारखाटी शेव नविन प्रकार हा नास्ता .ह
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
धन्यवाद 😊
@kalpanapawar9930
@kalpanapawar9930 3 ай бұрын
माझी आई गहू ओलवताना त्यात थोडेसे खडे मिठ आणि अगदी जरासे गोडेतेल लावून गहू बांधून ठेवत असे.
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
त्यामुळे गव्हाचा कोंडा चांगला निघून जातो ...पिठी पांढरीशुभ्र पडते Thanks tai
@Gandharv999
@Gandharv999 3 ай бұрын
Khandesh madhe yala pithhiche ladu boltat😊
@drawingwithatharv
@drawingwithatharv 3 ай бұрын
Please speak in Hindi also
@nilimapatil5191
@nilimapatil5191 2 ай бұрын
ताई ,खर तर हा दळा चा लाडू असतो,दराबा थोडा जाडसर असतो,करकरीत पीठ घ्यावं लागतं दराबा साठी आणि त्यात तूप जास्तीचं असतं ,आम्ही गुजर लोक 12 महिने बनवतो .
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
धन्यवाद ताई
@dishantsactivities6711
@dishantsactivities6711 2 ай бұрын
Daraba ladu asa नसतो याला दळ चा लाडू सांगतात
@surekharane5077
@surekharane5077 2 ай бұрын
Tai Tumcha Daraba kachha aahe Soji ajun bhaja
@kanchanpatil9345
@kanchanpatil9345 4 ай бұрын
रवा खुपच कमी टाकला
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 4 ай бұрын
जास्त घातल्याने जरा चरचरीत होतो ना म्हणून.. Thank you😊
@latachaudhari2220
@latachaudhari2220 Ай бұрын
ऊडदाची डाळ धुऊन सुकवून दळून सोजी ऐवजी हे पीठ वापरुन त्याचा दराबा सुद्धा खूप चवदार होतो. माझे सावदा हो माहेर असत्य मुळे मी बालपणापासून दराबा खाल्लेला आहे. पुण्यातील जळगाव ची मंडळी हा लाडू आर्डर घेवून बनवून देतात.
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 Ай бұрын
अरे व्वा ! खूप छान मनापासून धन्यवाद ताई 😊
@deepalipimpale5060
@deepalipimpale5060 2 ай бұрын
खूप छान
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 2 ай бұрын
Thanks tai 😊
@sarikawagh4699
@sarikawagh4699 11 ай бұрын
👌👌👌👌
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 10 ай бұрын
Thank you
@nayanamahajan2843
@nayanamahajan2843 3 ай бұрын
खुपच छान
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 3 ай бұрын
धन्यवाद 😊
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 11 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 126 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 30 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 11 МЛН