Рет қаралды 96,888
‘ईशा डे’ महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेमधून घराघरात पोचलेलं नाव. लहानपणी अत्यंत मस्तीखोर असणारी ईशा, वयाच्या चौथ्या वर्षापासून कथ्थक शिकत होती. त्यात पुढे तिने मास्टर्स देखील केले. रुईया महाविद्यालयात बी. ए. पॉलिटिकल सायन्स शिकताना अभिनयाची आवड लागली. कॉलेज मध्ये असताना अनेक एकांकिका स्पर्धा तिने केल्या. आपल्याला अभिनय आवडतो आहे हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने पूर्णवेळ या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.
अभिनयाचं शाश्त्रशुद्ध शिक्षण घ्यायला हवं असं तिला सतत वाटत होतं. त्यातून तिने थेट Drama Studio London मध्ये प्रवेश घेतला आणि तिचा या क्षेत्राबद्दलचा दृष्टिकोन अधिक व्यापक आणि समृद्ध झाला.
तिने आसोवा, BHADIPA अशा अनेक मराठी KZbin चॅनेलच्या विविध मालिकांमधून काम केले. काही चित्रपटात आणि वेब सिरीज मध्ये लहान मोठ्या भूमिका केल्या. परंतु आज प्रामुख्याने ओळखली जाते ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेतील विविधांगी भूमिकांमुळे.
अभिनयाच्या प्रशिक्षणाने नेमका काय बदल घडतो? कलाकार आणि माणूस म्हणून आपल्यात काय बदलतं? एक यशस्वी कलाकार होण्यासाठी आणि कलाक्षेत्रात स्वतःला अजमावू पाहणाऱ्या प्रत्येकासाठीचा, या क्षेत्रातील खाचखळग्यांची, मेहनतीची आणि यशाची जाणीव करून देणारा हा महत्वाचा संवाद ऐकुया, गुणी अभिनेत्री ईशा डे आणि मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबत ‘हसरे गांभीर्य’ या वेध मालिकेत.
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
• Bharat Jadhav, Actor |... - Bharat Jadhav, Actor | Inspiring Journey of Marathi Star
• Jitendra Joshi | Actor... - Jitendra Joshi | Actor (Marathi films & theatre)
• Vibhavari Deshpande | ... - Vibhavari Deshpande | actress
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - KZbin - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #eshadey #Indian #actress #mhj #comedy #dramastudio #performer #kathak #iph #mentalhealthforall