Рет қаралды 30,542
अंड्याचे ऑम्लेट, हाफ फ्राय, भुर्जी हे पदार्थ बरेच जणांना आवडतात. नॉनव्हेज न खाणारे अनेकजण अंड्याचे पदार्थ आवडीने खातात. काही वेळा डॉक्टरांनी सांगितल्यामुळेही काही जणांना अंड्याचे पदार्थ खावेच लागतात. पुण्यात सदाशिव पेठेत अथर्व एग्ज कॉर्नरमध्ये अंड्याचे विविध प्रकार मिळतात. त्यातही इथला अंडा घोटाळा आणि अंडा मोगलाई हे पदार्थ ग्राहकांना विशेष आवडतात. कसे तयार करतात हे पदार्थ, काय आहे त्याची खासियत, हेच या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. फूडी आशिष तर या पदार्थांच्या प्रेमातच पडला आहे.