Рет қаралды 231,546
आगरी धवला.. आगरी समाजातील लग्न समारंभात धवलारीनला महत्त्वाचं स्थान असतं. लग्न समारंभात या समाजातील पारंपारिक गीते अर्थात धवला म्हणजेच धवलगीतांतून आगरी समाजाने आपला सांस्कृतिक वारसा आजतागायत अभिमानाने जपला आहे. आणि अशी ही धवलगीत म्हणणाऱ्या महिलांना धवलारीन अस म्हंटल जात. धवलारीन पारंपारिक धवल्याच्या माध्यमातून लग्नातील वेगवेगळ्या विधी पार पाडत असते. लग्न समारंभातील प्रत्येक विधीवर आधारित धवल्यातील गाणी धवलारीन अचूक क्रमाने गात असते. ही गाणी कुणी लिहली, कुणी रचली, केव्हा कोणाला सुचली हे निश्चित सांगता येत नसलं तरी शब्दोल्लेख समजून घेतल्यास ही वर्षानुवर्षांपूर्वीची असल्याची दिसून येतात. पनवेलमधील ढोंगऱ्याचा पाडा येथील धवलारीन सुंदराबाई ढोंगरे यांच्याशी चर्चा करून या धवल्याविषयी जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न...
#PrabhatParvNews
#Dhavla
#Dhavlarin
#AagriCulture
#धवलारीन
#आगरी