Gavar lal bhopala bhaji | गवार लाल भोपळा भाजी | Leena's Sugrankatta

  Рет қаралды 1,213

Leena's Sugrankatta

Leena's Sugrankatta

Күн бұрын

#गवारलालभोपळाभाजी #श्राद्धाचामेनू
#लीनाजसुगरणकट्टा #लालभोपळागवारभाजी #भाजी #पितृपंधरवडाजेवण #श्राद्धाचीभाजी #लीनाजोशी
गवार लाल भोपळ्याची भाजी
श्राद्धाच्या मेनू मध्ये जनरली ही भाजी असते. पण एरवी पण ही भाजी करतात. करायला पण सोपी आहे. या भाजीला काही वाटण वगैरे लागत नाही. साधी सरळ आणि सात्विक भाजी. बघुया काय लागते ते या भाजीसाठी.
निवडलेली गवार ३ वाट्या
लाल भोपळ्याच्या फोडी १ वाटी
हळद १ चमचा
तिखट दीड चमचा
गोडा मसाला - दीड चमचा
मीठ चवीनुसार
नारळ कोथिंबीर वरुन सजवण्यासाठी
फोडणीसाठी - तेल, मोहरी, जिरे, ओवा, हिंग.
पातेल्यात मध्यम आचेवर फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग व ओवा घालावा. मग गवार आणि लाल भोपळ्याच्या फोडी टाकून नीट परतून घ्यावे. यात हळद, तिखट, गोडा मसाला, मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे. आता झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी. मधे मधे झाकण काढून भाजी वरखाली हलवून घ्यावी. गरज वाटली तर अर्धी वाटी पाणी घालावे. पण खूप घालू नका. भाजी वाफेवर शिजली तर जास्त चविष्ट लागते. आणि लाल भोपळ्याला पाणी सुटते, त्या पाण्यात भाजी शिजते. साधारणपणे १०-१२ मिनीटात भाजी शिजते. भाजी पूर्ण शिजली की वरुन नारळ कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
टीप:
१) आम्ही श्राद्धाच्या वेळी या भाजीत कांदा घालत नाही. पण एरवी कधी करायची असेल तर फोडणी झाली की एक बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या आणि मग गवार आणि लालभोपळा टाका.
२) गवार आणि लालभोपळा या दोन्ही भाज्या वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040

Пікірлер: 3
@varshapingle4548
@varshapingle4548 12 күн бұрын
खरंच खूप छान ताई तुम्ही सुगरण उत्तम सुरेख रेसिपी ❤
@laxmandesai9829
@laxmandesai9829 12 күн бұрын
ताई गुळ। का। नाहीत घातला
@leenasugran68
@leenasugran68 12 күн бұрын
नाही पण आपण घालू शकतो.