मिलिंदसर तुमचे अनुभव अतिशय अद्भुत होते. ते अनुभव तसेच कलाविष्कारांविषयीचे तुमचे विचार सखोल आणि स्वतंत्र असे होते. खूप सुंदर झाली मुलाखत. आदित्यजी स्मृतिगंध वरील सगळ्याच मुलाखतीत योग्य प्रश्न विचारून समोरच्याला बोलतं करतात. या वेगळ्या मालिकेबद्दल स्मृतिगंधचे मनपूर्वक आभार.
@neelimasant6426Күн бұрын
मिलिंद विचार प्रवृत्त , अंतर्मुख करणारी मुलाखत💐 गंभीर विषय असूनही मनोरंजक पद्धतीने मांडण्याचे कौशल्य अप्रतिम👌
@musicmilindКүн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद नीलिमा 😊🙏
@subinamdar2 күн бұрын
मिलिंद जोशी यांच्याशी संवाद ऐकताना स्तिमित झालो..एखादा स्वामी ज्या स्थितीत होता..त्याच स्थितीत जोशी आम्हाला सहज घेऊन गेले...आमच्याच त्या दिव्यत्वाचे दिवे त्यानी लावले..पेटवले..जागे केले.. आदित्य तुम्ही कलेचा सुदंर प्रवास किती उत्तम वाक्यातून बोलत राहिला. नवा आनंद लाभला..स्थिती शांत होऊन गेली. शब्दातून मन माझे भरून गेले..
@musicmilind2 күн бұрын
या प्रतिक्रियेला सादर प्रणाम 🙏
@prajaktadhere74854 күн бұрын
अद्भुत आहे हे मिलिंद! तुझ्या कलेला परिस स्पर्श झालाय !
@neetavalvekarpansare42317 сағат бұрын
अप्रतिम 👌👌
@ArvindSathe-o7s2 күн бұрын
विश्लेषण आवडल . कठीण विषय ,खूप संयमाने समजून घ्यावा लागतो. आपले अनुभव खूपच उद्बोधक आणि आपण एका जाणिवेच्या अनुभूती कडे श्रोत्यांना नेऊ शकलात. धन्यवाद
@kvbapat4 күн бұрын
अप्रतिम मुलाखत सरत्या वर्षाच्या संध्याकाळी एक फारच विचाराला चालना, प्रवृत्त करणार आणि कधीही कुठच्या ही गोष्टी वर किंवा बातमी वर ताबडतोब व्यक्त न होता शांत व्हावं, ती गोष्ट, बातमी किंवा कुठचीही घटना आपल्या मध्ये sink किंवा मुरायला योग्य वेळ द्यावी. याच्या साठी तुम्ही जे वाक्य बोललात किंवा तुमचा विचार तुम्ही जो मांडला आणि जो तुम्ही आचरणात आणत आहात. त्याबद्दल धन्यवाद कारण याच्या मुळे मला स्फूर्ति मिळाली, की मी हे आचरणात आणू शकतो. *ऐकू येणार्या गंधाचा स्पर्श दिसू लागतो* श्री. आदित्य ओक यांना सुद्धा अनेक धन्यवाद
@musicmilind4 күн бұрын
इतक्या सूक्ष्म विषया वरची चर्चा इतक्या उत्तम पणे ऐकून दिलेल्या या प्रतिक्रिये बद्दल मनःपूर्वक आभार 🙏
@asmitamaydeo62464 күн бұрын
मिलींद कमाल आहे तुझी 🙏🏻🙏🏻एरवी हसत हसत कविता ऐकवणारा तू आज वेगळ्याच विश्वात नेणाऱ्या तुझ्या कविता ऐकायला मिळाल्या❤ कविता खुप सुंदर आहेत 👌🏻 फारच आवडल्या मला... ऐकू येणाऱ्या गंधाचा स्पर्श दिसू लागतो ❤कमाल...तुझे लडाख चे अनुभव जबरदस्त आहेत रे ....नीराग्र होणे🙏🏻 ग्रेट आहेस तू 🙏🏻
@hemant-df8txКүн бұрын
काही विचार निवांत आणि एकांतात रवंथ करायचे असतात त्याशिवाय त्यातील मूलभूत आशयसंपन्न असे सार आपल्या अंतर्मनात झिरपत नाही.असेच काही मौलिक विचार या आपल्या मुलाखतीतून जाणवले. तुमचे तीन अनुभव अलौकिक आहेत.मनातील संवेदनशीलतेची frequency निसर्गातील सात्विक उर्जेशी मॅच झाल्याशिवाय असे अनुभव येणे शक्य नाही.. धन्यवाद 🙏💐 हेमंत चित्रकार
@vinayakdabke94224 күн бұрын
आदित्य आणि मिलिंद, दोघेही कमाल आणि कमाल!🙏 एखादा विचार, किंवा जाणीव, किंवा अनुभूती, ते, त्याचं व्यक्त प्रकटीकरण, आणि तेही कलाविष्काराच्या माध्यमातून होणं, हा अतिशय सूक्ष्म, नाजूक, खोल आणि संवेदनशील असा प्रवास असतो. या प्रवासाचं फळ म्हणजे प्रत्यक्ष तो कलाविष्कार असतो, ज्याची प्रचिती सर्व प्रेक्षक, श्रोते वा उपभोक्ते घेतात. परंतू या 'फळा'ची चर्चा न करता 'त्या' प्रवासाचा उहापोह करून, त्यातला निरामय आनंद, गुंतागुंत आणि प्रसंगी वेदना उलगडून दाखवावी, ही कल्पनाच आधी भन्नाट आहे. कारण हा प्रवास आणि त्याची अनुभूती ही कठोरपणे व्यक्तीसापेक्ष असते, जी पूर्णपणे 'त्या' व्यक्तीच्या बौद्धिक, वैचारिक, भावनिक आणि सांस्कारीक जडणघडणीवर अवलंबून असते. आणि म्हणूनच "हा इतका खूप व्यक्तिगत असलेला आणि शिवाय गहन, जटील आणि क्लिष्ट असलेला विषय चर्चेसाठी घ्यावा" या धाडसी कल्पनेलाच सलाम. ही चर्चा खूप बौद्धिक, तत्वचिंतनात्मक आणि दुर्बोध होण्याचा असलेला धोका पत्करूनही, ही चर्चा - समर्पक ओघाने येणारे अचूक, नेमके, आवश्यक आणि सूचक प्रश्न, आणि त्यांना दिली गेलेली तितकीच समर्पक, स्वाभाविक, प्रामाणिक आणि सोप्या शब्दांतली उत्तरं - यांच्या सहाय्याने अतिशय सहज, सोपी आणि सुगम ठेवण्यात आदित्य आणि मिलिंद पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. त्यासाठी दोघांना सलाम. सृजनाच्या प्रक्रियेचं निमित्त हूडकणं, त्याचा जन्मक्षण ओळखणं, त्याचं माध्यम ठरवलं जाणं आणि यातली त्याची प्रत्यक्ष विचार प्रक्रिया तपासणं... यासारखे अनेक, शब्दात मांडण्यासाठी खरंच जवळजवळ अशक्य असलेले पदर, या दोघांनी कमालीच्या सहजतेने उलगडले आहेत. थोडक्यात म्हणजे "झपूर्झा" च्या आंतरिक उन्मनी अवस्थेचा मागोवा अतिशय सुंदरपणे घेतला आहे. त्यासाठी दोघांना सलाम!! आदित्य, मिलिंद, स्मृतिगंध आणि संपूर्ण चमूचे मनःपूर्वक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!!🌹
@musicmilind4 күн бұрын
इतकी सविस्तर आणि नेमकी प्रतिक्रिया वाचून फार आनंद झाला. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@aniltambe33925 күн бұрын
(आम्हाला) प्रिय हा मिलिंद, गुंजनात दंग!
@musicmilind5 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
@sangitagore83794 күн бұрын
खूपच छान
@chiraiyyacreativessvati5225 күн бұрын
What a deep dive, Milind! So enriching!
@musicmilind4 күн бұрын
Thank you 🙏
@musicmilind4 күн бұрын
Thank you 🙏
@nedivalifestyle27544 күн бұрын
Hey Milind …. ❤
@AmrutaGangakhedkar5 күн бұрын
Kya Baat Hai Milind Sir🤩🤩🤩 Dil Khush !!!!
@anteshtenkale64075 күн бұрын
Woooooow wonderful
@Marathi_gazal_Jayesh_Pawar5 күн бұрын
सुंदर मांडणी❤
@shaileshdatar5 күн бұрын
एक फारच अद्भुत अनुभव आहे हा.मिलिंद माझा मित्र आहेच... पण आपल्याच माणसात वसलेला हा मिलिंद, फारच अद्भुत आहे... व्यावहारिक कलेबद्दल न बोलता ,कलेच्या प्रयोजना बद्दल, अमूर्तते बद्दल... इतके सुंदर आणि सहज बोलणारे मी तरी कुणी पाहिले नाहिये. निर्मात्यांना विनंती: हा केवळ thumb nail झालाय... अजून किमान 3,4 एपिसोड व्हायला हवेत... आदित्य अजून बोलते करेलच... आदित्य, smrutigandh ,rajesh gadgil aani ajay veena gokhle यांचे ही विशेष अभिनंदन aani आभार!
@musicmilind5 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद शैलेश 🙏
@avinashoak7524 күн бұрын
'ऐकू येणाऱ्या गंधाचा स्पर्श दिसू लागतो' हे सगळच अफलातूनआहे. मिलिंद आणी तुला बोलतं करणारा आदित्य दोघांनाही माझा दंडवत.
@musicmilind4 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏
@shirish_singing4 күн бұрын
परत परत विचार करायला लावणारी आणि अजून ऐकायला आवडलं असतं, असं वाटणारी मुलाखत.... भाग २ आल्यास अजून आवडेल 😄
@smitamalpure96692 күн бұрын
🍃🍃 जाणीवेची जाणीव समृद्ध करणारं असं काही!! पुन्हा पुन्हा ऐकावं अस काही!! हेडफोन न लावता खऱ्या खऱ्या नीरव शांततेत ऐकावं असं काही!! स्वतःलाचं नव्याने सापडाव असं काही!! काहीच बोलू नये.. आणि न बोलता खूप काही सांगाव असं काही!! 2025 जे काही देणार आहे.. त्यातलं पहिलं सुंदर... असं काही!! Thank you so much ..!!
@dr.vijaypandharipande50685 күн бұрын
अतिशय सुंदर मंत्रमुग्ध करणारा अनुभव.निरागस भाव..कलासक्त व्यक्तीची रंगलेली नाद मधुर मैफिल
@musicmilind5 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@aniltambe33925 күн бұрын
वयाची ८४ वर्ष धडपडून एकदाही एकाग्र होता आलं नाही; बहुतेक काही वर्षात आपोआप 'निराग्र' होण्याची वाट पहायला लागणार याची जाणीव करून दिलीत मिलिंदजी.